एक्स्प्लोर
Sanjay Raut in Belgumn | हे युद्ध कौरव पांडवांचं नाही, दोन्ही बाजूला पांडवच, संजय राऊत यांची संयत भूमिका
नाथ पै व्याख्यानमालेचं उद्घाटन शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या हस्ते झालं. त्यावेळी त्यांची मुलाखत घेण्यात आली. गोगटे रंगमंदिरात राऊतांची ही मुलाखत झाली. कार्यक्रमस्थळी कर्नाटक पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. संजय राऊत यांच्या बेळगाव दौऱ्यामुळे तणाव निर्माण झाल्याची माहिती आहे.
![Sanjay Raut in Belgumn | हे युद्ध कौरव पांडवांचं नाही, दोन्ही बाजूला पांडवच, संजय राऊत यांची संयत भूमिका shivsena leader Sanjay raut in Belgumn Karnataka Sanjay Raut in Belgumn | हे युद्ध कौरव पांडवांचं नाही, दोन्ही बाजूला पांडवच, संजय राऊत यांची संयत भूमिका](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/01/18193951/Sanjay-IV-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बेळगाव : हे युद्ध कौरव पांडवांचं नाही, दोन्ही बाजूला पांडवच आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी सीमाप्रश्नावर संयत भूमिका घेतली आहे. ते बेळगावात नाथ पै व्याख्यानमालेत घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते. या मुलाखतीत बोलताना ते म्हणाले की. संजय राऊत यांच्या कर्नाटक दौऱ्यासाठी बेळगावात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर कर्नाटक नवनिर्माण सेनेकडून राऊतांना रावणाची उपमा दिली होती. त्यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तसेच या मुलाखतीत ते काय बोलणार याकडे देखील लक्ष लागले होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, इथे दोन्ही बाजूने येथे पांडव आहेत. थोडा आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा झगडा आहे. मात्र न्यायालयाच्या मार्गाने यांचा निर्णय होईल. ते म्हणाले की, मी एका विचित्र परिस्थितीत इथं आलोय. भाषा वाद जरी झाला असला तरी भाषेत वाद नसू नये. कारण आपला देश एक आहे. कानडी बांधव महाराष्ट्रात जिथे जिथे राहतात तिथे कानडी शाळांना अनुदान देण्याचं काम आमचं सरकार करतं. कन्नड भाषिकांची गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो, असेही ते म्हणाले.
राऊत म्हणाले, कर्नाटकतले लेखक साहित्यिक कलावंत यांचं सुद्धा मराठीसाठी मोठं कार्य आहे. रजनीकांत सुद्धा इकडचे आहेत ते सुद्धा बेळगावी मराठी बोलतात. मल्लिकार्जुन खर्गे हे सुद्धा इकडचे आहेत. त्यांचा सरकार स्थापन करताना मोठा वाटा आहे ते मराठीत बोलतात, असे ते म्हणाले.
राऊत यांनी आपल्या संवादाची सुरुवात सर्वप्रथम बेळगावकरांना नमस्कार, जय महाराष्ट्र अशी केली. वाचन संस्कृती टिकविण्यासाठी ही संस्था काम करते त्यासाठी मी खास आलो, असे ते म्हणाले. राज्यात मराठीचा लढा सुरू आहे. नाथ पै यांचं यात मोठं योगदान होतं. ते उत्तम वक्ते होते. आजच्या घडीला नाथ पै यांच्या तोडीचा कोणताही संसदपटू दिसत नाही. पंडित नेहरूंना नाथ पै यांच्या बोलण्याने घाम फुटत होता, असे ते म्हणाले.
राऊत यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
भाजप आणि सेनेचं मूलभूत हिंदुत्व असं काही नाही
प्रबोधनकार ठाकरे यांनी खऱ्या अर्थाने काम केलं. त्यांनी रूढी परंपरेविरोधात काम केलं
सरकार चालविण्यासाठी धर्माचा आधार नसतो
धर्मचा आधारावर सरकार चालवाल तर हिंदुस्थानचा पाकिस्तान, इराण व्हायला वेळ लागणार नाही
आमचं हिंदुत्व हे गाडगेबाबाचं हिंदुत्व आहे
हिंदू आणि मुस्लिम यांच्यात दरी आणून आमही निवडणूक कधीच जिंकणार नाही
नागरिकत्व कायद्याबाबत राज्यात कुठेही काही झालं नाही
जातीय आणि धार्मिक तणाव राज्यात निर्माण होऊ देणार नाही
370 हटविल्यानंतर आम्ही स्वागत केलं पण आताची स्थिती पहा
काश्मिरी पंडित निर्वासित आहेत ते अजून घरी जाऊ शकले नाही मग तुम्ही काय केलं
ईशान्य कडील राज्य बघा काय परिस्थिती आहे
हिंदूना कौन्सिलिंगची गरज आहे
मला भीती वाटते आपल्यात फाळणी होणार नाही ना?
संसदीय कामकाजाचा दर्जा घसरतोय
या देशात विरोधी पक्षचा आवाज मोठा केला पाहिजे
आपले सत्ताधारी म्हणतात विरोधी पक्षच नको
आम्ही आमच्या तरुण काळात भाषण ऐकायला जायचो
संबंधित बातम्या
संजय राऊत कन्नडिगांचा विरोध झुगारुन बेळगावात दाखल, मराठी भाषिकांवरच्या दडपशाहीवर काय बोलणार?
मी बेळगावात जाणारच, कर्नाटक पोलिसांनी कायद्याने रोखून दाखवावं : संजय राऊत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
बातम्या
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)