Shani Dev : 2025 सुरु होण्याआधीच 'या' राशींच्या लोकांचं भाग्य उजळणार; शनी देणार बक्कळ यश, धन-संपत्तीत होणार प्रचंड वाढ
Shani Dev : शनीची वक्री शुभ आणि अशुभ असे दोन्ही परिणाम देणारी आहे. काही राशीच्या लोकांना तर यामुळे सोन्याचे दिवस येणार आहेत.
Shani Dev : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनीला (Shani Dev) न्यायाची देवता आणि कर्मफळदाता म्हणतात. याचाच अर्थ शनी (Lord Shani) प्रत्येकाला आपापल्या कर्मानुसार फळ देतो. त्यामुळे वाईट कर्म करणाऱ्यांना शनी शिक्षा देतो तसेच चांगलं कर्म करणाऱ्यांना आशीर्वादही देतो. शनी लवकरच कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. 29 जून 2024 पासून शनी आपली चाल बदलणार आहे. त्यामुळे याचा कोणत्या राशींवर (Zodiac Signs) परिणाम होणार आहे ते जाणून घेऊयात.
शनीची वक्री शुभ आणि अशुभ असे दोन्ही परिणाम देणारी आहे. काही राशीच्या लोकांना तर यामुळे सोन्याचे दिवस येणार आहेत. या राशीच्या लोकांवर धन-संपत्तीची भरभराट होईल. त्यामुळे शनीच्या वक्री चालीचा कोणत्या राशींवर सकारात्मक परिणार होणार आहे ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
शनीच्या वक्री चालीचा मेष राशीवर शुभ परिणाम होणार आहे. या राशीच्या लोकांच्या पगारात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते. तसेच, तुम्हाला नवीन मार्गाने पैशांचा लाभ होईल. तुमचा बॅंक बॅलेन्स वाढेल. तसेच, तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला चांगलं यश मिळेल. मित्रांचं सहकार्य मिळेल.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी शनीची वक्री चाल फार शुभदायक ठरणार आहे. या राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी मोठं पद, प्रतिष्ठा आणि भरपूर पैसा मिळेल अशी आशा आहे. तसेच, जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना या दरम्यान चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तसेच, व्यापारी वर्गातील लोकांना आपल्या करिअरमध्ये चांगला नफा मिळेल. एकूणच तुमचा हा काळ फार चांगला जाणार आहे.
मकर रास (Capricorn Horoscope)
शनीची उलटी चाल मकर राशीच्या लोकांसाठी फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुम्हाला धनलाभाचे एकामागोमाग चांगले योग जुळून येतील. तुमची आर्थिक परिस्थिती अधिक चांगली होईल. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला यश मिळेल. तसेच, प्रमोशन देखील मिळण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :