Shani Vakri 2024 : शनीची सुरु होतेय वक्री चाल! पुढचे 135 दिवस 'या' 5 राशींसाठी अत्यंत धोक्याचे, एकामागोमाग वाढतील संकटं
Shani Vakri 2024 : शनीचं वक्री होणं काही राशींसाठी शुभ नसतं. या दरम्यान, काही राशींच्या आयुष्यात चढ-उतार पाहायला मिळतात.
Shani Vakri 2024 : शनी महिन्याच्या शेवटपर्यंत वक्री चाल करणार आहे. या दरम्यान काही राशींना याचा फायदा तर काही राशींना तोटा होणार आहे. 29 जून रोजी शनी कुंभ राशीत वक्री होणार आहे. तब्बल पाच महिने शनी याच राशीत स्थित असणार आहे. त्यानंतर 15 नोव्हेंबरनंतर तो मार्गक्रमण करणार आहे.
असं म्हणतात की, शनीचं वक्री होणं काही राशींसाठी शुभ नसतं. या दरम्यान, काही राशींच्या आयुष्यात चढ-उतार पाहायला मिळतात. त्यांच्या आरोग्यावर, करिअरवर आणि कुटुंबावर याचा वाईट परिणाम होतो. शनीच्या या वक्री चालीचा कोणकोण्त्या राशींवर परिणाम होणार आहे याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
कर्क रास
कर्क राशीच्या लोकांसाठी शनीची वक्री चाल काहीशी संकटाची असणार आहे. या राशीच्या लोकांना करिअरमध्ये प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे. आजारपणात तुमचे पैसे खर्च होऊ शकतात. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. तुमचा थोडासा निष्काळजीपणाही तुम्हाला भारी पडू शकतो. त्यामुळे अनुभवी लोकांशी सतत संपर्कात राहा.
वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शनीची वक्री चाल फार कष्टदायक आणि आर्थिक परिस्थितीचा सामना करणारी असू शकते. या दरम्यान जोडीदाराबरोबर तुमचे काही कारणावरून वाद होऊ शकतात. तसेच, तुमच्या आयुष्यात देखील गोष्टी सुरळीत न झाल्यामुळे तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागू शकतो.तसेच, तुम्हाला पैशांची चणचण देखील भासू शकते.
मकर रास
शनीचं वक्री होणं तुमच्यासाठी संकटाचं असू शकते. या दरम्यान तुमच्या आयुष्यात तुम्हाला तणावाचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या आयुष्यात तुम्ही खुश नसणार तसेच, मनात वाईट विचार येण्याची शक्यता आहे. तुमच्या आयुष्यात एकामागोमाग संकटं येतील. तसेच, तुमच्या आर्थिक स्थितीचा परिणाम तुमच्या आयुष्यावर होऊ शकतो. वैवाहिक आयुष्यात देखील थोडे खटके उडतील.
कुंभ रास
कुंभ राशीसाठी शनीचं वक्री होणं हे फार अशुभ परिणाम देणारं आहे. या काळात तुमच्यावर शनीच्या साडेसातीचा प्रभाव असणाऱ आहे. शनीच्या उलट्या चालीने तुमच्या करिअमध्ये तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.त्यामुळे या काळात कोणतंही काम करताना सावध राहा. तसेच, या काळात कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करू नका. नोकरी बदलीचा विचार जर तुमच्या मनात असेल तर तो काढून टाका.
मीन रास
मीन राशीच्या लोकांना या काळात करिअरमध्ये चढ-उताराचा सामना करावा लागू शकतो.तुम्ही आखलेल्या योजनांचा तुम्हाला या काळात लाभ होणार नाही. तुम्हाला करिअमध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांबरोबर तुमचे वाद होऊ शकतात. मतभेद वाढू शकतात. वैवाहिक लोकांचे संबंध बिघडू शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :