एक्स्प्लोर

माणचा आमदार उर्मट, त्याच्याविरोधात 'तुतारी'वर निवडणूक लढवणार; अनिल देसाई विधानसभेच्या रिंगणार

Man Assembly Constituency Election : सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी शरद पवारांची भेट घेतली असून मान खटाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. 

पुणे : माणचा आमदार हा उर्मट आहे, तो घरे पेटवण्यासाठी काम करतो तर मी चुली पेटवण्यासाठी कामे करेन असं सांगत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अनिल पाटील यांनी माण-खटाव विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. इथल्या आमदाराने पाण्याचं राजकारण केलं, आता परिवर्तन अटळ आहे असंही अनिल देसाई म्हणाले. अनिल देसाई यांनी शरद पवार यांची भेट घेतली असून मान खटावमधून तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली.

अनिल देसाई म्हणाले की, माण आणि खटाव मतदारसंघातील कार्यकर्ते घेऊन आलो आहे. शरद पवार साहेबांकडे मी उमेदवारीची मागणी केली आहे.  या आधी 15 वर्षे मी थांबलो आहे. त्यामुळे यंदा मला उमेदवारी पाहिजे. 

अनिल देसाई म्हणाले की, गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये 17 जण इच्छुक होते, आता तर चारच जण इच्छुक आहेत. प्रभाकर देशमुख हेदेखील मला साथ देतील. जयकुमार गोरे यांनी पाण्याचे राजकारण केलं आहे. पण पाणी शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे. आमचा आमदार घरे पेटवण्यासाठी काम करतो, मी चुली पेटवण्यासाठी कामे करेन. मान खटावमधून शरद पवार मला संधी देतील हा माझा विश्वास आहे. 

अनिल देसाई यांची राजकीय कारकीर्द कशी आहे? 

  • सातारा जिल्हा बँकेवर 22 वर्षे संचालक म्हणून काम.
  • दोन वेळा सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष.
  • 5 वर्षे पंचायत समिती सदस्य. 
  • 15 वर्षे जिल्हा परिषद सदस्य. 
  • 2014 सालच्या विधानसभेत अपक्ष उमेदवार - 19,700 मते 
  • लोकसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीत प्रवेश.
  • माण खटावमधून धैर्यशील मोहिते पाटलांना मोठे मताधिक्य.

कोविड उपचारात गैरव्यवहाराबद्दल जयकुमार गोरे यांच्याविरुद्ध गुन्हा

कोरोना काळात सातारा जिल्ह्यातील मायणी येथील वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना उपचार केंद्र सुरू करण्यात आलं होतं. या वेळी त्याठिकाणी हजारो लोकांवर उपचार करण्यात आले होते. वेळी 35 रुग्ण मृत असतानाही उपचार केल्याचे दाखवून शासनाचा निधी हडप केल्याची तक्रार करण्यात आली होती.

या प्रकरणी उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचा आदेश देताना आमदार जयकुमार गोरे (jaykumar gore) यांच्यासह याचिकाकर्ते दीपक देशमुख हे संस्थेचे उपाध्यक्ष असल्याने त्यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांविरुद्धही गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. या आदेशानुसार महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्यचे अधिकारी देविदास बागल यांनी वडूज (ता. खटाव) पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही बातमी वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech Andheri| भाजपवर निशाणा, शिदेंचा घेतला समाचार, अंधेरी मेळाव्यात ठाकरे कडाडलेEknath Shinde BKC Full Speech : उठाव ते विधानसभेचा निकाल; एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजीUddhav Thackeray on BJP | नामर्दाची औलाद, तुमच्याकडून आम्ही हिंदूत्व शिकायचं का? उद्धव ठाकरेUddhav Thackeray on BJP | जयश्री रामनंतर जय शिवराय बोलावच लागेल- उद्धव ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
Embed widget