बोगस एफआयआर दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव? भाजप आमदार अडचणीत, काय आहे प्रकरण?
bjp mla jaykumar gore: साताऱ्याचे भाजप आमदार जयकुमार गोरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. बोगस एफआयआर दाखल करण्यासाठी गोरेंनी वडूज पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप करत हायकोर्टात नवी याचिका दाखल करण्यात आली आहे.
सातारा: साताऱ्याचे भाजप आमदार जयकुमार गोरेंच्या (jaykumar gore) अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. बोगस एफआयआर दाखल करण्यासाठी गोरेंनी (jaykumar gore) वडूज पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप करत हायकोर्टात नवी याचिका दाखल करण्यात आली आहे. राजकीय दबावामुळे पोलिसांनी अधिकारक्षेत्र नसतानाही गुन्हा नोंदवल्याचा याचिकेतून आरोप करण्यात आले आहेत. कर्नाटकच्या निपाणी येथील धन्वन्तरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजोग महादेव देशमुख यांनी ऍड. वैभव गायकवाड यांच्यामार्फत फौजदारी रिट याचिका दाखल करण्यात आली आहे.(bogus fir in police new pil against bjp mla jaykumar gore)
कोणतीही वैध कागदपत्रे व अधिकारक्षेत्र नसतानाही वडूज पोलिसांनी आपल्याविरुद्ध गुन्हा नोंदवत अटक केल्याचा आरोप त्यांनी यामध्ये केला आहे. सातारा पोलीस अधीक्षक, दहिवाडी कॅम्प वडूजचे पोलीस उपअधीक्षक, वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि तपास अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे व न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे. कोविडकाळातील घोटाळ्याप्रकरणी जयकुमार गोरेंच्या (jaykumar gore) सहभागाचा आरोप करणारी याचिका हायकोर्टात प्रलंबित आहे. जयकुमार गोरे यांच्यासोबतच सातारा पोलिसांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे.
जयकुमार गोरेंचे कनेक्शन काय आहे?
सतीश पाटलांनी संस्था हडप करण्यासाठी जयकुमार गोरेंच्या (jaykumar gore) दबावतंत्राचा वापर केल्याचा आरोप आहे. त्याचबरोबर सतीश पाटील यांनी अधिकार नसतानाही 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर गोरे यांना वैद्यकीय संस्था विकली. यामुळे दोघांनी खोटा गुन्हा नोंदवण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप आहे. तर गोरेंच्या दबावातून कॉलेजचे बँक खाते गोठवण्यात आल्याचं याचिकेत म्हटलं आहे.
कोविड उपचारात गैरव्यवहाराबद्दल जयकुमार गोरे यांच्याविरुद्ध गुन्हा
कोरोना काळात सातारा जिल्ह्यातील मायणी येथील वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना उपचार केंद्र सुरू करण्यात आलं होतं. या वेळी त्याठिकाणी हजारो लोकांवर उपचार करण्यात आले होते. वेळी 35 रुग्ण मृत असतानाही उपचार केल्याचे दाखवून शासनाचा निधी हडप केल्याची तक्रार करण्यात आली होती.
या प्रकरणी उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचा आदेश देताना आमदार जयकुमार गोरे (jaykumar gore) यांच्यासह याचिकाकर्ते दीपक देशमुख हे संस्थेचे उपाध्यक्ष असल्याने त्यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांविरुद्धही गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. या आदेशानुसार महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्यचे अधिकारी देविदास बागल यांनी वडूज (ता. खटाव) पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.