एक्स्प्लोर

Satara News : घरगुती काढ्याने घात केला, बाप-लेकाचा मृत्यू, फलटण हादरले

Satara Latest News Update : सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे.

Satara Latest News Update : सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. घरगुती बनवलेल्या काढ्यामुळे बाप आणि लेकाचा मृत्यू झाला आहे. अवघ्या काढ्याच्या औषधामुळे येथील पोतेकर कुटुंबाचा मोठा घात झाला आहे. या प्रकरणाची जिल्ह्यात चर्चा सुरु आहे. या घटनेची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे. पोलिस याचा तपास करत आहेत. 

सातारा जिल्ह्यातील फलटण नारळी भागात पोतेकर कुटुंब राहते. या कुटुंबाचा काढ्याने घात केला. पुण्याला नोकरीनिमित्त असलेल्या या पोतेकर कुटुंबातील अमित हा दुपारी घरी येणार होता. आठवड्यातून एकदा येणाऱ्या या मुलासाठी आई-वडिलांनी बाजारातून कोंबडा आणला. कोंबडा संपूर्ण कुटुंबाने खाल्ला. संपूर्ण दिवस एकमेकांशी गप्पा टप्पात गेला. संध्याकाळी भाजी चपाती आणि त्यासोबत आर्धी पोळी खाली. झोपण्याची वेळ आली. त्यावेळी मुलाचा थोडा घसा खवखव होता म्हणून आईने सर्वांसाठी नेहमीप्रमाणे घरगुती काढा बनवला. काड्यामध्ये आलं-लसूण पुदिना गूळ याचा वापर केला. या सर्वाचं नेहमीप्रमाणे मिश्रण करून या कुटुंबातील तिघांनी तो पिला. यात पुण्याहून आलेला मुलगा अमित, वडिल हणमंतराव आणि मुलगी श्रध्दा या तिघांचाही समावेश होता. मुलाची आई संगिताने काढा पिला नाही. काढा पिल्यानंतर अवघ्या काही वेळातच बाप-लेकाला मळमळणं, जुलाब, उलट्या असा त्रास होऊ लागला. आई संगीता यांना काय करावे सुचेना. त्यांना तातडीने जवळच्या लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी रात्री 12 वाजता सर्वांना दाखल केले...उपचार सुरू असताना सकाळी साडेसहा वाजता संगिताच्या पतीने प्राण सोडला तर पंधरा मिनिटानंतर यांच्या मुलानेही प्राण सोडला. मुलीला वाचवण्यात डॉक्टरांना यश आले.

बापलेकाच्या जाण्याने पोतेकर मायलेकी हडबडल्या आहेत. काढ्याने घात केला असलातरी यात अॅडमिट केल्यापासून ते सकाळपर्यंत यांना एक सलाईन लावन्याव्यतरिक्त काहीच उपचार दिले नाहीत. तसेच त्यांच्यावर उपचार उपस्थित एका नर्सकडून करण्यात आले. सकाळी डॉक्टर आले तेव्हा सर्व संपले होते, अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान, फूडपॉइझन हे या काढ्यामुळे झाले असावे का? असा प्रश्न सध्या अनेकांना भेडसावत आहे. या प्रकरणाची सध्या साताऱ्यात चर्चा सुरु आहे. 
 
 या घटनेची नोंद फलटण शहर पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलिस सखोल तपास करत आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुनिल शेळके यांनी दिली. दरम्यान, वेळेवर उपचार मिळाले नाहीत असे जरी सांगितले जात असले तरी हा त्रास नेमका काढ्याने झाला की आणखी काही कारण असू शकते,  हे शवविच्छेदन अहवालानंतरच समजणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Mumbai Weather: मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट
मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Maitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रींच्या प्रवचनाची पर्वणी,आध्यात्मिक अनुभव :19 मे 2024TOP 70 : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 19 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 8 AM : 19 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सJ. P. Nadda : RSS ही सांस्कृतिक, सामाजिक संस्था मात्र भाजप राजकीय पक्ष : जे.पी. नड्डा : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Mumbai Weather: मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट
मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
RCB vs CSK : पाच पराभवानंतर आरसीबीचा विजयाचा षटकार, बंगळुरुच्या प्लेऑफमधील एंट्रीचं जंगी सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ
आरसीबीकडून होम ग्राऊंडवर चेन्नईचा हिशोब पूर्ण, प्लेऑफमध्ये एंट्री, बंगळुरुच्या चाहत्यांची दिवाळी
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
Embed widget