Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 19 May 2024 : तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
Horoscope Today 19 May 2024 : पंचांगानुसार, आज 19 मे 2024, रविवारचा दिवस. आजचा दिवस काही राशीच्या लोकांसाठी फायद्याचा तर काही राशींच्या लोकांसाठी तोट्याचा असणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
एखाद्या गोष्टीचे निरीक्षण परीक्षण खूप चांगल्या पद्धतीने कराल. आणि त्याचा उपयोग तुम्हाला निश्चित होईल.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
भरपूर कष्ट करण्याची तयारी ठेवावी लागेल परंतु त्याचे फळही चांगले मिळेल.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
घरामध्ये दुरुस्तीचे काम निघू शकते त्यासाठी पैशाची तजवीज करावी लागेल.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
प्रेम प्रकरणात जोडीदाराच्या मनासारखे वागण्याचा आटापिटा करावा लागेल तरीसुद्धा मानसिक समाधान मिळणार नाही.
सिंह रास (Leo Horoscope Today)
कुटुंबामध्ये नेहमीपेक्षा वातावरण जरा नरम गरमच राहील. त्यामुळे महिलांना सामोपचाराचे धोरण स्वीकारणे भाग पडेल.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कीर्ती प्रसिद्धीच्या मागे धावण्याचा मोह होईल त्यामुळे जशी संधी मिळेल तसे वागण्याचा प्रयत्न राहणार आहे.
तुळ रास (Libra Horoscope Today)
कृती ऐवजी वैचारिक गोंधळ जरा जास्तच होतील त्यामुळे चांगली बुद्धी असूनही केवळ या गोष्टीमुळे मागे पडण्याची शक्यता आहे.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वडिलोपार्जित इस्टेटिसंबंधी घेतलेले निर्णय लांबणीवर पडतील. घरामध्ये मंगल कार्य ठरेल.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
जवळच्या प्रवासाचे योग येतील. नको त्या ठिकाणी पैसा खर्च झाल्यामुळे थोडी तारांबळ आणि चिडचिड ही होईल.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
जोडीदाराला समजून घेतले तरी त्याच्या मनाचा थांग पत्ता लागणार नाही. विद्यार्थी जरा मू डी बनतील .
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
औषधोपचार घेताना वेगवेगळ्या प्रकारचे औषधे घेतल्यामुळे गुण लवकर येणार नाही. महिलांना जरा नमस्ते घ्यावे लागेल.
मीन रास (Pisces Horoscope Today)
आपल्या आवडत्या गोष्टीचा सखोल अभ्यास चांगला कराल. याचा उपयोगही तुम्हाला होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: