“उदयनराजे दिलखुलास, मोकळ्या मनाचा माणूस”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून वाढदिवशी राजांवर स्तुतीसुमने, म्हणाले…
दिलखुलास, मोकळ्या मनाचा माणूस म्हणून राजेंची ओळख आहे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एकनाथ शिंदेंवर स्तुतीसुमने उधळली.
सातारा : श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosle) यांचा वाढदिवस म्हणजे सातारा जिल्ह्याला पर्वणीच असते. अशा या दिलदार नेत्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून लगबग सुरू आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा फलकांनी माहोल बदलून गेला आहे. त्यानिमित्त त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी, चाहत्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.आज आनंदाचा दिवस आहे. दयनराजे कायम उत्साहात असतात. दिलखुलास, मोकळ्या मनाचा माणूस म्हणून राजेंची ओळख आहे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एकनाथ शिंदेंवर स्तुतीसुमने उधळली. ते साताऱ्यात माध्यमांशी बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आज आनंदाचा दिवस आहे. उदयनराजे याचा आज वाढदिवस आहे. तसे उदयनराजे कायम उत्साहात असतात. तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले. राज्यसभेवर देखील गेले. उदयनराजेंकडून अनेक विकासाची कामे झाली. दिलखुलास, मोकळ्या मनाचा माणूस म्हणून राजेंची ओळख आहे. आज राज्याचा कारभार छत्रपतीना डोळ्यासमोर ठेऊन करत आहे.
मराठा आरक्षण प्रक्रियेत उदयनराजे अग्रभागी : मुख्यमंत्री
मराठा आरक्षण प्रक्रियेत राजे अग्रभागी होते. आरक्षण देण्याची शपथ घेतली होती आणि ती शपथ पूर्ण केली. काहीजण म्हणतात आरक्षण टिकणार नाही, पण ते का टिकणार नाही हे कुणी सांगत नाही. ज्यावेळी सत्ता होती त्यावेळी काहींनी आरक्षण दिले नाही, असे म्हणत मराठा आरक्षणावरून होत असलेल्या टीकेला देखील एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिले आहे.
मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी जलमंदिर पॅलेस निवासस्थानी आले असता त्यांच्या शुभहस्ते श्री भवानीमाता मंदिरात महापूजा संपन्न झाली.@mieknathshinde pic.twitter.com/4P1Po1nm9l
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) February 24, 2024
केक कापून वाढदिवस साजरा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांच्या साताऱ्यातील जलमंदिर पॅलेस निवासस्थानी भेट दिली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भवानीमाता मंदिरात महापूजा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी जलमंदिर पॅलेस निवासस्थानी आले असता त्यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस म्हणजे सातारा जिल्ह्याला पर्वणीच असते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोनज करण्या येते.
हे ही वाचा :
जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांची फटकेबाजी