एक्स्प्लोर

Eknath Shinde : कोयना पात्रातील बोटीसाठी स्वतंत्र नियमावली तयार करा, नवीन पर्यटन विकासासाठीच्या कामांना गती द्या; एकनाथ शिंदेंचे निर्देश

Eknath Shinde Photo : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरे गावी आले असताना त्यांनी कोयना जलाशयाजवळील मुनावळे,वासोटा किल्ला, तापोळा पट्ट्यातील विविध भागांना भेट दिली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरे गावी आले असताना त्यांनी कोयना जलाशयाजवळील मुनावळे,वासोटा किल्ला, तापोळा पट्ट्यातील विविध भागांना भेट दिली.

1/9
सातारा जिल्ह्यात साकारल्या जाणाऱ्या नवीन महाबळेश्वर प्रकल्पाला गती देण्यासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त केलेल्या एमएसआरडिसीचे कार्यालय महाबळेश्वर येथे सुरू करावे असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. शिंदे हे दरे या त्यांच्या मूळगावी आले असता त्यांनी या भागातील पर्यटन वाढीच्या दृष्टीने सुरू असलेल्या विविध विकासकामांचा विशेष बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.

2/9
सातारा जिल्ह्यातील दरे, मुनावळे तसेच कोयना नदीच्या लगत असलेल्या दोनशे चौदा गावात नव्याने विकसित करण्यात येणाऱ्या नवीन महाबळेश्वर विस्तारित प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा शिंदे यांनी या बैठकीत आढावा घेतला.

3/9
नव्याने विकसित केल्या जाणाऱ्या पर्यटन स्थळाचे विकास प्राधिकरण म्हणून एमएसआरडीसीची नियुक्ती केली असल्याने या भागाचा सुनियोजितपणे विकास करण्याची जबाबदारी एमएसआरडीसीची आहे. त्यांचे कार्यालय साताऱ्यात असल्याने स्थानिकांना तिथे वारंवार जाणे अवघड होत होते. स्थानिक ग्रामस्थांची ही अडचण सोडवण्यासाठी  एमएसआरडीसीचे कार्यालय तत्काळ महाबळेश्वरमध्ये सुरू करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले.

4/9
तसेच यावेळी ग्रामस्थांनी कोयना नदीचे पत्रातील पाणी हे स्थिर असल्याने येथे चालवण्यात येणाऱ्या बोटींना समुद्रातील बोटींप्रमाणे नव्हे तर वेगळे नियम लावावेत अशी मागणी केली. या बोटींना लावण्यात येणारे काही नियम दुरुस्त करून नवीन नियम तयार करावे असे सुचवले. त्याबाबत हे नियम तपासून त्यात आवश्यक ते बदल करावे असे शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.

5/9
याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून इथे कोयना नदीवरील पुलाचे तसेच प्रतापगड आणि तापोळा येथे रस्ता रुंदीकरण आणि पर्यटक गॅलरीचे काम सुरू असून या कामांची प्रगती त्यांनी जाणून घेतली. तसेच या कामांचा वेग वाढवून ती लवकरात लवकर पूर्ण करावी असेही सांगितले.

6/9
या गावात नव्याने विकसित होणाऱ्या पर्यटनस्थळी स्थानिक नागरिकांना उपजीविकेचे साधन मिळावे यासाठी त्याना तात्पुरत्या स्वरूपात तंबूमध्ये होम स्टे उभारण्याची परवानगी द्यावी. तसेच त्यासाठी लागणाऱ्या बांधकाम परवानग्या द्याव्यात असेही सांगितले. तसेच कोयना तीरावर बांबू तसेच इतर झाडांच्या लागवडीला प्रोत्साहन द्यावे असेही सांगितले.

7/9
यासोबतच प्रतापगड किल्ल्यावर सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने हे काम तातडीने थांबवण्याचे निर्देश दिले होते.  प्रतापगड हे शिवछत्रपतींची पावनभूमी असल्याने इथे निकृष्ट दर्जाचे काम खपवून घेणार नाही असे शिंदे यांनी स्पष्ट केले. याठिकाणी नव्याने होणारे कामही दर्जेदारच व्हायला हवे असेही निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले. तसेच कोयना जलाशयाजवळील मुनावळे,वासोटा किल्ला, तापोळा पट्ट्यातील विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी उपमुख्यमंत्र्यांनी केली.

8/9
या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी कोयना जलाशयालागत असलेल्या मुनावळे येथील जलपर्यटन प्रकल्प, वासोटा किल्ला परिसर तसेच तापोळा येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी वासोटा येथे लवकरच नाईट टुरिजम सुरू करण्याचे तसेच पर्यटकांसाठी वॉटर ऍम्ब्युलन्सची व्यवस्था करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

9/9
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणाऱ्या नवीन पुलाच्या कामाची देखील पाहणी केली. हा पूल जून महिन्यापर्यंत पूर्ण होणार असून त्याद्वारे तापोळा बामणोली आणि महाबळेश्वर येथील पर्यटनाला मोठी चालना मिळणार असल्याचे शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

Satara फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय

हरयाणात रमजान ईदच्या सुट्टीबाबत सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कार्यालये सुरूच राहणार

मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तस्त्राव  झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ

Shardul Thakur : अनसोल्ड राहिलेल्या शार्दूल ठाकूरचा धमाका, तगडी बॅटींग असणाऱ्या हैदराबादला लागोपाठ दोन झटके, काव्या मारनचा चेहरा पडला
अनसोल्ड राहिलेल्या शार्दूल ठाकूरचा धमाका, हैदराबादचं AI फेल, लागोपाठ दोन झटके, काव्या मारनचा चेहरा पडला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 27 March 2025Santosh Deshmukh News : संतोष देशमुख हत्या प्रकरण, तीन आरोपींनी दिली गुन्ह्याची कबुली; आरोपी घुले काय म्हणाला?Job Majha : बँक ऑफ बडोदा नोकरीची संधी, शैक्षणिक पात्रता काय? किती जागांवर भरती? 27 March 2025Top 100 Headlines : शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : Maharashtra News : 27 March 2025 : 7 PM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
हरयाणात रमजान ईदच्या सुट्टीबाबत सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कार्यालये सुरूच राहणार
हरयाणात रमजान ईदच्या सुट्टीबाबत सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कार्यालये सुरूच राहणार
मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तस्त्राव  झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ
मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तस्त्राव झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ
Shardul Thakur : अनसोल्ड राहिलेल्या शार्दूल ठाकूरचा धमाका, तगडी बॅटींग असणाऱ्या हैदराबादला लागोपाठ दोन झटके, काव्या मारनचा चेहरा पडला
अनसोल्ड राहिलेल्या शार्दूल ठाकूरचा धमाका, हैदराबादचं AI फेल, लागोपाठ दोन झटके, काव्या मारनचा चेहरा पडला
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2025 | गुरुवार

Chinese President Xi Jinping : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
मोठी बातमी ! दीड लाख रुपयांची लाच घेताना क्रीडा अधिकारी कविता नावंदे जाळ्यात, जिल्ह्यात खळबळ

RCB vs CSK : चेन्नईला चेपॉकमध्ये पराभूत कसं करायचं? दोन्ही संघाकडून खेळलेल्या क्रिकेटरचा आरसीबीला महत्त्वाचा सल्ला
चेन्नईला चेपॉकमध्ये पराभूत कसं करायचं? दोन्ही संघाकडून खेळलेल्या क्रिकेटरचा आरसीबीला लाखमोलाचा सल्ला
Embed widget