Sarpanch Santosh Deshmukh Case : धनंजय देशमुख आणि संतोष देशमुख यांची पत्नी आज CID कार्यालयात जाणार; नेमकं कारण काय?
Sarpanch Santosh Deshmukh Case : सरपंच संतोष देशमुख आणि धनंजय देशमुख यांच्या पत्नी आज (15 फेब्रुवारी) CID कार्यालयात जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

Sarpanch Santosh Deshmukh Case : बीड (Beed) जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Sarpanch Santosh Deshmukh) हत्या प्रकरणातील आणखी एक अपडेट पुढे आली आहे. सरपंच संतोष देशमुख आणि धनंजय देशमुख यांच्या पत्नी आज (15 फेब्रुवारी) CID कार्यालयात जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे. सीआयडीला धनंजय देशमुख आणि अश्विनी देशमुख यांच्याकडून प्रकरणाशी संबंधीत काही माहितीची खात्री करायची आहे. म्हणूनच आज दुपारी केज विश्रामगृहातील सीआयडी कार्यालयामध्ये धनंजय देशमुख आणि अश्विनी देशमुख या जाणार आहेत.
सीआयडीच्या अधिकार्यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही माहिती यावेळी दिली जाणार असल्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे या प्रकरणात आणि या भेटीमध्ये नेमकं काय झालं हा तपशील नंतरच कळू शकणार आहे.
CID कार्यालयात जाण्यामागचं नेमकं कारण काय?
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातनंतर बीड सातत्यानं चर्चेत आहे. दरम्यान राज्याच्या राजकारणात देखील या घटनेचे पडसाद पडताना दिसत आहे. तर दुसरीकडे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी सातत्याने या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी लावून धरली आहे. मात्र अद्याप यातील मुख्य सूत्रधार मोकाटच असल्याचे धनंजय देशमुख यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रकरणाचा जलद गतीने तपास करून मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी ही मागणी आता सर्व स्थरातून होत आहे. त्यामुळे प्रकरणाच्या चौकशी साठी नेमण्यात आलेली समिती सर्व बाबींची कसून चौकशी करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून धनंजय देशमुख आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख या जाणार CID कार्यालयात जाणार असल्याची दाट शक्यता आहे.
सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीबद्दल परळीकरांच्या भावना काय?
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट झाल्याचे सांगितलं आणि तब्बल साडेचार तास चर्चा झाल्याचे सांगितल्यानंतर अनेक उलट सुलट चर्चा होत होत्या. याचे परिणाम बीड जिल्ह्यात होताना पाहायला मिळत आहेत. विशेषतः आता सगळं मिटला आहे, असं काही लोकांना परळी शहरातील वाटत आहे. तर राजकारणी लोक एकच असतात असा सुद्धा सूर परळी मधले नागरिक काढत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
