Santosh Deshmukh Family Meet Namdev Shastri: देशमुख कुटुंबीय भगवानगडावर पोहचले, पुरावेही दिले; नामदेवशास्त्री म्हणाले, तुम्हीही गडाचेच...!
Santosh Deshmukh Family Meet Namdev Shastri: भगवान गड देशमुख कुटुंबियांच्या कायम पाठीशी राहील, असं आश्वासन महंत नामदेवशास्त्री यांनी देशमुख कुटुबीयांना दिले.

Santosh Deshmukh Family Meet Namdev Shastri: बीड: बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी (Santosh Deshmukh Murder Case) आज त्यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी भगवान गडावर जाऊन महंत नामदेवशास्त्री (Namdev Shastri) यांची भेट घेतली.
धनंजय देशमुख यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुरावे महंत नामदेवशास्त्रींपुढे सादर केले. देशमुख कुटुंबियांनी कधीही जातीयवाद केला नाही. माझ्या भावाने दलित बांधवाला वाचवण्याचा प्रयत्न केला, असं धनंजय देशमुख नामदेवशास्त्रींना म्हणाले. यावर आम्ही आरोपींना पाठीशी घालणार नाही. भगवानगड देशमुख कुटुंबियांच्या कायम पाठीशी राहील, असं आश्वासन महंत नामदेवशास्त्री यांनी देशमुख कुटुबीयांना दिले.
देशमुख कुटुंबीय अन् महंत नामदेवशास्त्री यांच्यातील संवाद-
धनंजय देशमुख-
देशमुख कुटुंबीयाने जातीयवाद केला नाही. माझ्या भावाने दलित बांधवाला वाचवण्याचा प्रयत्न केला. शहानिशा केल्याशिवाय बोलणं उचित नाही.
महंत नामदेवशास्त्री-
आरोपींना आम्ही पाठीशी घालणार नाही.. भगवानगड देशमुख कुटुंबियांच्या पाठीशीआहे. तुम्ही देखील गडाचेच आहात...
धनंजय देशमुख-
ज्यांना आरोपीची बाजू घ्यायची आहे ते जातीवाद करतायत...
महंत नामदेवशास्त्री-
हे भगवानगडाला मानणारं कुटुंब आहे..
धनंजय देशमुख-
आमच्या कुटुंबीयवर कधीच कोणता वाद झाला नाही. दलित व्यक्तीने माझ्या भावाला अवादा कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने कॉल केला. दलित बांधवांची अँट्रोसिटीची तक्रार घेतली असती तर संतोष देशमुख यांचा खून झाला नसता...
भगवानगडानंतर देशमुख कुटुंब नारायण गडावर जाणार-
भगवानगडानंतर देशमुख कुटुंब बीडमधील नारायण गडावर देखील जाणार आहे. महंत नामदेव शास्त्री यांच्या भेटीनंतर नारायण गडावरील महंत शिवाजी महाराज यांची देखील देशमुख कुटुंब भेट घेऊन चर्चा करणार आहे. सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील पुरावे घेऊन धनंजय देशमुख, वैभवी देशमुख भगवानगडावर पोहचले होते. यानंतर नारायण गडावरची भेट देखील अतिशय महत्त्वाची आहे.
नामदेवशास्त्रींकडून धनंजय मुंडेंची पाठराखण-
महंत नामदेवशास्त्री यांनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांची पाठराखण केली होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे गुन्हेगार आहेत, त्यांचा शोध घेतला जात आहे. परंतु ज्या लोकांनी हे प्रकरण केले, हत्या केली. त्यांची मानसिकता का बिघडली, हे मीडिया का दाखवत नाही. त्यांना मारहाण का झाली, हेही दखल घेण्याजोगे आहे. मारहाण झाली तो त्यांच्या गावाचा मुद्दा आहे, असे म्हणत नामदेवशास्त्री यांनी भगवानगड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याची भूमिका स्पष्ट केली होती. आरोपींना आधी चापट मारली गेली आणि त्यानंतर हे घडले, त्यामुळे आरोपींच्या मानसिकतेचाही विचार करायला हवा, असेही नामदेवशास्त्री यांनी म्हटले होते. त्यानंतर आज संतोष देशमुखांच्या कुटुबीयांनी नामदेवशास्त्रींची भेट घेतली.
देशमुखांकडून पुरावे, शास्त्रींचा पाठिंबा;भगवानगडावर नेमकं काय घडलं?, VIDEO:
संबंधित बातमी:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
