Sanjay Raut : ईडीचा जमालगोटा दिल्यानं शिंदे भाजपसोबत, अमित शाहांच्या टीकेवर त्यांना उत्तर देणाचं काय कारण? संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut : ईडीचा जमलगोटा एकनाथ शिंदेंना देखील मिळाला होता. म्हणूनच ते भाजपसोबत असून लाचार असल्याची घणाघाती टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
मुंबई: जमालगोटा कोण कोणाला देत हे पाहुयात. हाच जमलगोटा एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) देखील मिळाला होता. म्हणूनच ते भाजपसोबत असून लाचार आहेत. महाराष्ट्राला तिसरा मुख्यमंत्री मिळतोय हे मी वारंवार म्हणतो आहे आणि हा मुख्यमंत्री शिंदेंच्याच पक्षातील आहे. त्यामुळे जमालगोटाच्या गोष्टी आम्हाला सांगू नका. ईडीचा (ED)जमाल गोटा दिल्यानेच तुम्ही पक्षातून फुटलात. उद्या ईडी आणि सीबीआय आमच्याकडे आला तर दोन तासात आम्ही या साऱ्यांना जमालगोटा देऊ. त्यामुळे जमालगोटेची भाषा आम्हाला सांगू नका.
मुळात अमित शाह (Amit Shah) यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला केला आहे. अमित शहा महाराष्ट्र तोडायला निघाले आहेत. किंबहुना त्यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर पाय ठेवला आहे. त्यामुळे या विरोधात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं असेल तर एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागतच केले पाहिजे. मात्र ते करणार नाही कारण ते लाचार आहेत. त्यांना दिल्लीतून जमालगोटा दिला जातो त्यामुळे ते बोलणार नाहीत आणि तोंडातून ते उलट्या करत असल्याची टीका करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घणाघाती टीका केली आहे.
एकनाथ शिंदे यांना उत्तर देणाचं काय कारण?
अमित शाह महाराष्ट्रात येतात ते महाराष्ट्रातील नेत्यांवर चिखल फेक करण्यासाठी आणि महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी येतात. अमित शाह हे सहकार मंत्री आहे. पण अमित शाह जन्मला आलेल नव्हते तेव्हा पासून या देशाचं सहकार मोठं आहे. जे काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षात आहे त्यांना फोडण्यासाठी आपल्याकडे असलेल्या सहकार कारखान्याचे संचालक यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आणि दबाव आणला. अनेक कारखानदार या महाराष्ट्रात दिल्लीला बोलविले जातात. कारखानदार यांच्यावर दबाव आणला जात आहे.
किंबहुना कोविड काळात गुजरातमधील सहकार बँकेत घोटाळे झाले, हे जगाला माहित आहे. एक कारखाना बंद पडला तर हजार कुटुंबाचे नुकसान होतं. मुळात अमित शाह यांच्यावर टीका केली म्हणून या टीकेवर एकनाथ शिंदे यांना उत्तर देणाचं काय कारण? उत्तर द्यायला भाजपचे नेते आहे. मात्र हे दिल्ली पुढे लाचार असल्याने त्यांना बोलावं लागत असल्याची टीका ही खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
आक्रोश मोर्चाचे मुंबईत स्वागत, कारण..
हे सरकार अत्यंत गोंधळलेल्या बाजूने आहे. ठाण्याचे मंत्री त्यांचे काय चालू आहे? आपापल्या गटाचा मुख्यमंत्री वेगळा आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांचे सरकार वर नियंत्रण नाही. असे ही संजय राऊत म्हणाले. तर राज्यात सरपंच संतोष देशमुख यांच्या हल्ल्याच्या निषेधात राज्यात मोर्चे निघत आहे.दरम्यान, मुंबईतही हां आक्रोश मोर्चा धडकणार आहे. यावर बोलतांना संजय राऊत म्हणाले की. मुंबई राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी आहे, त्यामुळे या मोर्चाचे स्वागत आहे. अशा घटनेचा आवाज उठविला जात आहे. या घटनेचे शिंतोड उडविले जात आहे. त्यामुळे देशभरात इथून या घटनेचा आवाज जाईल आणि पीडित कुटुंबियांना न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करत संजय राऊत यांनी या प्रकरणी भाष्य केलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या.