Bigg Boss Marathi Season 5 : ना बिचुकले ना राखी...बिग बॉसच्या घरात होणार 'या' व्यक्तीची होणार वाईल्ड कार्ड एन्ट्री?
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरात आता कुणाची वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.

Bigg Boss Marathi Season 5 : कल्ला, राडे, भांडणं अशा सगळ्या गोष्टींमुळे बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन (Bigg Boss Marathi New Season) सध्या जोरदार चर्चेत आहे. घरातील सदस्यांचं वागणं, त्यांचे टास्क यावर प्रेक्षकही सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत असल्याचं पाहायला मिळतंय. रितेश भाऊंचा धक्का हा प्रत्येक स्पर्धकासाठी दमदार ठरतोय. त्यामुळे दोन वर्षांनी आलेल्या या सिझनला प्रेक्षकांचीही पसंती असल्याचं चित्र आहे. घरात सुरुवातीला 16 स्पर्धक सहभागी झाले. त्यामधील चार स्पर्धकांनी आतापर्यंत घराचा निरोप घेतला आहे.
दरम्यान आता घरात कुणाची वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. वाईल्ड कार्ड एन्ट्रीसाठी सध्या बरीच नावं चर्चेत आहेत. राखी सावंत, अभिजीत बिचुकले ही नाव प्रत्येकजण घेतोय. पण सध्या आणखी एक नाव बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून जाणार असल्याची चर्चा आहे. हा स्पर्धक बॉडीबिल्डर म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेला संग्राम चौघुले.
कोण आहे संग्राम चौघुले?
संग्राम हा अभिनेता म्हणूनही प्रसिद्ध आहे. इतकच नव्हे तर सोशल मीडियावर त्याचे 1.5 मिलियन्स फॉलोअर्स देखील आहेत. संग्रामने 2016 साली मराठी रुपेरी पडद्यावर दंभ या सिनेमातून आपली झलक दाखवली. या सिनेमाला आणि त्याच्या भूमिकेला समीक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला होता. संग्रमामला अभिनयासोबतच वर्कआऊटचीही खूप आवड आहे. जसा अभिनयामध्ये ठसा उमटवला त्याचप्रमाणे बॉडी बिल्डिंगमध्येही त्याने त्याचा ठसा उमटवला आहे. सहा वेळा मिस्टर इंडिया तर 2012 आणि 2014 या असे दोन वेळा मिस्टर युनिव्हर्स होण्याचा मान संग्रामने मिळवला होता.
यांच्या नावाचीही चर्चा
बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच्या सुरुवातीपासून अभिजीत बिचुकले यांचं नाव चर्चेत होतं. अभिजीत बिचुकले बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड सदस्य म्हणून एन्ट्री घेणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. मीडिया रिपोर्टनुसार, फेमस आरजे वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणार असल्याचं बोललं जात आहे.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
