(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bigg Boss Marathi Season 5 : 'इतरांना पाण्यात पाहण्यापेक्षा...', अंकिता या आठवड्यात सेफच, बिग बॉसने कानही टोचले अन्...
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरात या आठवड्यात कोणताही स्पर्धक घराबाहेर गेलेला नाहीये.
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनमध्ये (Bigg Boss Marathi new Season) आतापर्यंत चार सदस्यांनी घराचा निरोप घेतला आहे. त्यानंतर पाचव्या आठवड्यासाठी वर्षा उसगांवकर, निक्की तांबोळी, अभिजीत सावंत आणि अंकिता वालावलकर हे सदस्य घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले होते. पण या आठवड्यात वोटिंग लाईन्स बंद असल्यामुळे कोणताही सदस्य घराबाहेर गेला नाही. असं असलं एका प्रोमोने मात्र प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली.
काही वेळापूर्वी कलर्स मराठी वाहिनीकडून बिग बॉस मराठीचा एक प्रोमो शेअर करण्यात आला होता. त्यामध्ये अंकिता या आठवड्यात घराबाहेर जात असल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे प्रेक्षकांना धक्का बसला. वोटिंग लाईन्स बंद असूनही अंकिता घराबाहेर कशी जाते असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. त्यावर अनेकांनी कमेंट्स करत प्रश्नही विचारले होते. पण आता अंकिता घराबाहेर जाणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. असं असलं तरीही बिग बॉसने मात्र तिची चांगली कानउघडणीही केली असल्याचं पाहायला मिळालं.
बिग बॉसकडून अंकिताची कानउघडणी?
अंकिता जेव्हा घराबाहेर पडते, तेव्हा घराबाहेर एक आरसा लावलेला असतो. त्यावर लिहिलेलं असतं की, इतरांना पाण्यात पाहण्यापेक्षा स्वत:खेळ चांगला करा. अपेक्षा आहेत. या आठवड्यात तुम्ही सेफ आहात. त्यामुळे बिग बॉसने अंकिताचे कानही यावेळी टोचले असल्याचं पाहायला मिळालं आहे.
बिग बॉस मराठीच्या प्रोमोमुळे चर्चा
'बिग बॉस मराठी'चा नव्या प्रोमोने सर्वांनाच थक्क केलं. प्रोमोमध्ये रितेश भाऊ म्हणत आहे,"या घरातून बाहेर जाणाऱ्या सदस्याचं नाव आहे अंकिता". त्यानंतर अंकिता तिच्या नावाची पाटी घेऊन सर्व सदस्यांची भेट घेऊन घराबाहेर पडताना दिसली. अंकिताचा प्रवास संपल्याने डीपी दादा आणि सूरजला अश्रू अनावर झालेले पाहायला मिळालं. 'बिग बॉस मराठीच्या घरात आता खेळाला रंगत येऊ लागली आहे. अशातच आता 'बिग बॉस मराठी'च्या घराची पहिली कॅप्टन अंकिता प्रभू-वालावलकर घराबाहेर पडल्याचं या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं. अंकिताने बिग बॉस मराठीचा खेळ चांगल्या खेळण्याचा प्रयत्न केला असला तरी कुठेतरी ती कमी पडल्याचं प्रोमोमध्ये दिसलं. पण आता अंकिता घराबाहेर जाणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
ही बातमी वाचा :
Bigg Boss Marathi Season 5 : वोटिंग लाईन्स बंद तरीही अंकिता घराबाहेर? बिग बॉसमध्ये नवा ट्विस्ट