एक्स्प्लोर

सांगलीच्या जतमधील एकाच कुटुंबातील तीन जण ओमानमधील समुद्रात बेपत्ता

Sangli News : वडील आणि दोन मुले ओमानच्या समुद्रात वाहून गेल्याची दुर्देवी घटना घडली. हे तिघे मूळचे सांगलीच्या जत तालुक्यातील होते.

Sangli News : ओमान (Oman) देशातील समुद्रात सांगलीतील (Sangli) तीन जण बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. समुद्रात बेपत्ता झालेले तीन जण हे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील रहिवासी आहेत. अभियंता शशिकांत म्हमाणे आणि त्यांची दोन मुले ओमानमधील लाटांच्या तडाख्यात वाहून गेले. या घटनेने जतमध्ये शोककळा पसरली आहे. 

वडील आणि दोन मुले ओमानच्या समुद्रात वाहून गेल्याची दुर्देवी घटना रविवारी 12 जुलै रोजी घडली आहे. या दुर्देवी घटनेत जत येथील शशिकांत म्हमाणे, त्यांची नऊ वर्षाची मुलगी श्रुती आणि सहा वर्षाचा मुलगा श्रेयस हे समुद्राच्या लाटेत वाहून गेले आहेत. अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही. या घटनेला शशिकांत म्हमाणे यांचे बंधू अॅड. राजकुमार म्हमाणे यांनी दुजोरा दिला आहे. 

मूळचे जत येथील शशिकांत म्हमाणे हे मागील अनेक वर्षांपासून दुबई येथील एका कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत होते. पत्नी सारिका, मुलगा श्रेयस, मुलगी श्रुती आणि अन्य एक मुलगी (नाव समजू शकले नाही) यांच्यासह दुबई येथे राहण्यास होते. बकरी ईदमुळे सुट्टी असल्याने शशिकांत, पत्नी, मुले आणि मित्रांसह दुबईजवळ असलेल्या ओमान या देशात फिरायला गेले होते. याबाबतचा एक व्हिडीओही त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला आहे. त्यावेळी ही घटना घडली आहे. मग ते ओमानच्या समुद्रकिनाऱ्यावर गेले, तिथे प्रचंड लाटा होत्या. त्याचा व्हिडीओ शूट करतानाच मोठी लाट आली आणि त्यात काही जण ओढले गेले.

या दुर्घटनेत शशिकांत म्हमाणे, त्यांचा मुलगा श्रेयस आणि श्रुती हे समुद्रात बेपत्ता झाले. तर त्यांच्या पत्नी सारिका आणि एका मुलीची सुटका करण्यात आली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शशिकांत म्हमाणे यांचे बंधू तात्काळ दुबईला गेल्याची कुटुंबीयांनी सांगितलं. परंतु आनंद लुटण्यासाठी म्हणून समुद्रकिनारी गेलेल्या या कुटुंबावर काळाने घात केला. या घटनेमुळे कुटुंबावर आणि मूळ गाव जतमध्ये शोककळा पसरली आहे

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Paetongtarn Shinawatra: अवघ्या 38 वर्षीय महिला पंतप्रधानांनी फोनवर असे काय बोलल्या की ते लीक होताच थेट सरकारच धोक्यात!
अवघ्या 38 वर्षीय महिला पंतप्रधानांनी फोनवर असे काय बोलल्या की ते लीक होताच थेट सरकारच धोक्यात!
Akola Crime News : सोबत दारू प्यायला बसले अन् शा‍ब्दिक चकमक, 'टकल्या'ने काढला जिवलग मित्राचा काटा; अकोला हादरलं
सोबत दारू प्यायला बसले अन् शा‍ब्दिक चकमक, 'टकल्या'ने काढला जिवलग मित्राचा काटा; अकोला हादरलं
Chhagan Bhujbal on Sharad Pawar : मुंबईत उद्धव ठाकरेंची ताकद जास्त, शरद पवारांच्या वक्तव्यावर भुजबळ म्हणाले; शिवसेनेची...
मुंबईत उद्धव ठाकरेंची ताकद जास्त, शरद पवारांच्या वक्तव्यावर भुजबळ म्हणाले; शिवसेनेची...
Sonia Gandhi on Iran-Israel War: इराण आपला जुना दोस्त, अजूनही वेळ गेलेली नाही, इस्त्रायल दुटप्पी, इराणच्या समर्थनार्थ आवाज उठवला पाहिजे; सोनिया गांधींकडून खडे बोल
इराण आपला जुना दोस्त, अजूनही वेळ गेलेली नाही, इस्त्रायल दुटप्पी, इराणच्या समर्थनार्थ आवाज उठवला पाहिजे; सोनिया गांधींकडून खडे बोल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Irak Iran Special Report : भारतानं इस्त्रायलवर दबाव टाकावा, इराणचं आवाहन
Devendra Fadnavis | आळंदीत कुठल्याही परिस्थितीत कत्तलखाना होणार नाही, फडणवीसांचे आश्वासन
Nitin Gadkari on Yoga : स्वास्थ चांगलं राहण्यासाठी योग विज्ञान आपल्यासाठी खूप उपयोगी
BMC Election Special Report पालिकेची निवडणूक उद्धव ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई,कोण कोणाोबत जाणार?
Devendra Fadnavis Pandharpur Palkhi 2025 : मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं माऊलींचं दर्शन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Paetongtarn Shinawatra: अवघ्या 38 वर्षीय महिला पंतप्रधानांनी फोनवर असे काय बोलल्या की ते लीक होताच थेट सरकारच धोक्यात!
अवघ्या 38 वर्षीय महिला पंतप्रधानांनी फोनवर असे काय बोलल्या की ते लीक होताच थेट सरकारच धोक्यात!
Akola Crime News : सोबत दारू प्यायला बसले अन् शा‍ब्दिक चकमक, 'टकल्या'ने काढला जिवलग मित्राचा काटा; अकोला हादरलं
सोबत दारू प्यायला बसले अन् शा‍ब्दिक चकमक, 'टकल्या'ने काढला जिवलग मित्राचा काटा; अकोला हादरलं
Chhagan Bhujbal on Sharad Pawar : मुंबईत उद्धव ठाकरेंची ताकद जास्त, शरद पवारांच्या वक्तव्यावर भुजबळ म्हणाले; शिवसेनेची...
मुंबईत उद्धव ठाकरेंची ताकद जास्त, शरद पवारांच्या वक्तव्यावर भुजबळ म्हणाले; शिवसेनेची...
Sonia Gandhi on Iran-Israel War: इराण आपला जुना दोस्त, अजूनही वेळ गेलेली नाही, इस्त्रायल दुटप्पी, इराणच्या समर्थनार्थ आवाज उठवला पाहिजे; सोनिया गांधींकडून खडे बोल
इराण आपला जुना दोस्त, अजूनही वेळ गेलेली नाही, इस्त्रायल दुटप्पी, इराणच्या समर्थनार्थ आवाज उठवला पाहिजे; सोनिया गांधींकडून खडे बोल
Kolhapur News: हुपरीत चांदी व्यावसायिकाच्या घरावर अन् कार्यालयावर ईडीची छापेमारी, 15 तास कसून चौकशी
कोल्हापूर : हुपरीत चांदी व्यावसायिकाच्या घरावर अन् कार्यालयावर ईडीची छापेमारी, 15 तास कसून चौकशी
Devendra Fadnavis : आळंदीत कत्तलखाना होणार की नाही? मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, 'मी आदेश...'
आळंदीत कत्तलखाना होणार की नाही? मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, 'मी आदेश...'
Sanjay Raut: बोलबच्चन प्रेरणा आम्ही मोदींकडून घेतली, ते समस्त जगातील बोलबच्चन महामंडळाचे अध्यक्ष आहेत; संजय राऊतांचा फडणवीसांच्या वक्तव्यावर पलटवार
बोलबच्चन प्रेरणा आम्ही मोदींकडून घेतली, ते समस्त जगातील बोलबच्चन महामंडळाचे अध्यक्ष आहेत; संजय राऊतांचा फडणवीसांच्या वक्तव्यावर पलटवार
Tushar Ghadigaonkar Marathi Actor: नैराश्य, कौटुंबिक वाद की आणखी काही; फॅनला लटकलेला मृतदेह, अभिनेता तुषार घाडीगावकरने आयुष्याचा शेवट का केला?
नैराश्य की कौटुंबिक वाद? फॅनला लटकलेला मृतदेह, अभिनेता तुषार घाडीगावकरने आयुष्याचा शेवट का केला?
Embed widget