Tushar Ghadigaonkar Marathi Actor: नैराश्य, कौटुंबिक वाद की आणखी काही; फॅनला लटकलेला मृतदेह, अभिनेता तुषार घाडीगावकरने आयुष्याचा शेवट का केला?
Tushar Ghadigaonkar Marathi Actor: काम मिळत नसल्याने तुषार घाडीगावकर डिप्रेशनमध्ये होता, अशी चर्चा होती. परंतु, या चर्चेमध्ये तथ्य नसल्याची माहिती समोर आली आहे.

Tushar Ghadigaonkar Marathi Actor: छोट्या पडद्यावरील मालिकांमधून घराघरात पोहचलेला चेहरा असलेल्या अभिनेता तुषार घाडीगावकर याने शुक्रवारी राहत्या घरी आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येच्या वृत्ताने मराठी कलाविश्वात एकच खळबळ उडाली आहे. तुषार घाडीगावकर याच्या आत्महत्येचे वृत्त समोर आले तेव्हा त्याने काम मिळत नसल्यामुळे नैराश्याच्या भरात आत्महत्या (Suicide news) केली, असे सांगितले जात होते. मात्र, आता या प्रकरणाचा वेगळा पैलू समोर आला आहे. त्यानुसार तुषार घाडीगावकर (Tushar Ghadigaonkar) याच्याकडे कामाची कोणतीही कमतरता नव्हती. तो सध्या 'सन मराठी' वाहिनीवरील 'सखा माझा पांडुरंग' मालिकेत काम करत होता. तसेच त्याच्या आणखी एका चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होते. त्यामुळे त्याच्या आत्महत्येचे कारण व्यावसायिक नसून कौटुंबिक वाद असल्याची नवीन माहिती समोर आली आहे. (Marathi Television Actors)
तुषार घाडीगावकर याचे बालपण मुंबई उपनगरातील भांडूप परिसरात गेले होते. तो भांडूपच्या हनुमान नगर येथे वास्तव्याला होता. त्याने रुपारेल महाविद्यालयातून एकांकिका स्पर्धांच्या माध्यमातून अभिनयाला सुरुवात केली. त्याने अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये लहानसहान पण लक्षात राहणाऱ्या भूमिका साकारल्या होत्या. त्यामुळे तुषार घाडीगावकर याचे व्यावसायिक जीवन उत्तम सुरु होते. परंतु, काही कौटुंबिक वादामुळे तो तणावात होता. काही वर्षांपूर्वी तो भांडूप सोडून पश्चिम उपनगरातील राम मंदिर येथे भाड्याच्या घरात वास्तव्याला आला होता. तो त्याच्या पत्नीसोबत राहत होता. तर तुषार घाडीगावकर याचे आई-वडील भांडूपलाच राहत होते.
तुषार घाडीगावकर याची पत्नी शुक्रवारी नेहमीप्रमाणे कामावर गेली होती. त्याने दुपारच्या सुमारास पंख्याला लटकून गळफास घेतल्याचा अंदाज आहे. तुषारची पत्नी संध्याकाळी घरी आली तेव्हा तिला त्याचा पंख्याला लटकलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसला आणि हा सगळा प्रकार समोर आला. दरम्यान, तुषार घाडीगावकर याने नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस तपासातून हे कारण समोर येईल. दरम्यान, तुषार घाडीगावकर याचे पार्थिव भांडूप येथील घरी नेले जाणार असून तिकडेच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती आहे.
Tushar Ghadigaonkar Suicide: तुषार घाडीगावकरने कोणत्या मराठी मालिकांमध्ये काम केले होते?
तुषार घाडीगावकर याने छोट्या पडद्यावरील 'लवंगी मिरची', 'मन कस्तुरी रे', 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' या मालिकांमध्ये काम केले होते. तर 'भाऊबळी', 'उनाड', 'झोंबिवली', या मराठी चित्रपटांमध्येही तुषारने भूमिका साकारली होती. तसेच 'संगीत बिबट आख्यान' या नाटकातही तुषार घाडीगावकरने काम केले होते. अलीकडेच 'सन मराठी' वृत्तवाहिनीवर सुरु झालेल्या 'सखा माझा पांडुरंग' मालिकेतही तो झळकला होता.
आणखी वाचा
तू हरलास म्हणजे आम्ही सगळे हरलो, अभिनेता तुषार घाडीगावकार याने आयुष्य संपवल्यानंतर सिनेसृष्टी हळहळली

























