एक्स्प्लोर

Paetongtarn Shinawatra: अवघ्या 38 वर्षीय महिला पंतप्रधान फोनवर असे काय बोलल्या की ते लीक होताच थेट खूर्ची अन् सरकार सुद्धा धोक्यात!

Paetongtarn Shinawatra: 17 मिनिटांचे हे कॉल रेकॉर्डिंग थायलंडचे पंतप्रधान पतोंगटार्न शिनावात्रा आणि कंबोडियन नेते हुन सेन यांच्यातील संभाषणाचे आहे. हा एक हाय प्रोफाइल फोन कॉल होता जो लीक झाला.

Paetongtarn Shinawatra: थायलंडमध्ये एका फोन कॉल रेकॉर्डिंग (Thai PM Phone Call) लीक झाल्याने राजकीय वादळ निर्माण झाले आहे. 17 मिनिटांचे हे कॉल रेकॉर्डिंग थायलंडचे पंतप्रधान पतोंगटार्न शिनावात्रा आणि कंबोडियन नेते हुन सेन यांच्यातील संभाषणाचे आहे. हा एक हाय प्रोफाइल फोन कॉल होता जो लीक झाला. आता थायलंडच्या पंतप्रधानांची खुर्ची धोक्यात आहे आणि त्यांचे सरकार पडण्याची शक्यता देखील आहे.

थायलंडचे सरकार धोक्यात

38 वर्षीय शिनावात्रा यांनी यासाठी माफी देखील मागितली आहे. असे असूनही, 'फु थाई पार्टी'च्या नेतृत्वाखालील युती सरकार धोक्यात आहे. युतीतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष 'भूमजैथाई पार्टी'ने सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला आहे. यानंतर, शिनावात्रा यांच्याकडे काठावरील बहुमत शिल्लक आहे. युतीची परिस्थिती नाजूक आहे, कारण उर्वरित घटक पक्षांनीही बैठका सुरू केल्या आहेत. सत्तेचे गणित असे आहे की जर इतर कोणत्याही पक्षाने युतीचा पाठिंबा काढून घेतला तर सरकार पडेल. विरोधी पक्ष पीपल्स पार्टीच्या नेत्या नथाफोंग रुएंगपान्यावुत यांनी संसद बरखास्त करण्याची मागणी केली आहे. इतर विरोधी पक्षांनीही नव्याने निवडणुका घेण्याची मागणी केली आहे.

वादाचे मूळ काय आहे?

कंबोडिया आणि थायलंडमध्ये दशकांपासून सीमा वाद आहे, तरी या प्रकरणाची मुळे गेल्या महिन्यात झालेल्या एका घटनेशी जोडलेली आहेत. 28 मे 2025 रोजी सीमावर्ती भागात लष्करी चकमक झाली, ज्यामध्ये एका कंबोडियन सैनिकाचा मृत्यू झाला. निषेध म्हणून कंबोडियाने थायलंडवर अनेक निर्बंध लादले. तणावाच्या या परिस्थितीत, शिनावात्रा आणि हुन सेन यांनी चर्चा केली. टीकाकारांचे म्हणणे आहे की शिनावात्रा या कॉलमध्ये हुन सेन यांना 'अंकला' म्हणून संबोधत आहेत आणि त्यांना अनावश्यकपणे अतिरिक्त आदर देत आहेत. त्या सीमा वाद हाताळणाऱ्या त्यांच्याच एका लष्करी कमांडरवरही टीका करत आहेत.

कॉलवर, त्यांनी हुन सेन यांना असेही सांगितले की, 'जर तुम्हाला काही सांगायचे असेल तर मला थेट सांगा, मी ते हाताळेन.' थायलंडच्या आतापर्यंतच्या सर्वात तरुण पंतप्रधान शिनावात्रा यांनी त्यांच्या बचावात म्हटले की ही त्यांची वाटाघाटीची पद्धत होती, पण कुटुंबातील आणि कंबोडियावर राज्य करणाऱ्या हुन कुटुंबातील जुन्या संबंधांमुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या. हुन सेन शिनावात्रा यांचे कौटुंबिक मित्र मानले जातात. थाई पंतप्रधानांचे वडील थाक्सिन शिनावात्रा आणि हुन सेन हे बऱ्याच काळापासून एकमेकांचे सहकारी आहेत. दोघेही एकमेकांना 'गॉडब्रदर्स' म्हणतात.

कॉल कसा लीक झाला?

शिनावात्रा ज्याला वाटाघाटीचा मार्ग म्हणत आहेत, तो हुन सेन यांनी वेगळ्या पद्धतीने वापरला. हुन सेन यांनी जवळजवळ चार दशके कंबोडियावर राज्य केले आहे. त्यांचा मुलगा हुन मानेट 2023 पासून तेथे पंतप्रधान आहे. असे असूनही, हुन राजकीयदृष्ट्या शक्तिशाली आहे. हुन यांनी या रेकॉर्डिंगचा एक भाग सुमारे 80 कंबोडियन नेत्यांसोबत शेअर केला. यामुळे थायलंडमध्ये गोंधळ निर्माण झाला. यानंतर, थायलंडच्या परराष्ट्र मंत्रालयाने कंबोडियन राजदूताला बोलावून कॉल लीक झाल्याबद्दल तक्रार करणारे निषेध पत्र सादर केले. त्यांनी हे प्रकरण सोडवण्याची मागणी केली. यानंतर, हुन सेन यांनी संपूर्ण 17 मिनिटांची क्लिप फेसबुकवर अपलोड केली. ती बाहेर येताच शिनावात्रा यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

थायलंडच्या पंतप्रधानांनी माफी मागितली

या प्रकरणावरून झालेल्या गोंधळानंतर, थायलंडच्या पंतप्रधानांनी पत्रकार परिषद घेतली. त्या म्हणाल्या की, कंबोडियन नेत्यासोबतच्या माझ्या संभाषणाच्या लीक झालेल्या ऑडिओबद्दल मी माफी मागू इच्छितो. यामुळे जनतेत नाराजी पसरली आहे. शिनावात्रा पंतप्रधान होऊन जेमतेम एक वर्ष झाले आहे. थायलंडमध्ये अनेक सत्तापालट झाले आहेत. आता शिनावात्रा ज्या प्रकारच्या विरोधाचा सामना करत आहेत, त्यामुळे त्यांचे सरकार वाचवणे त्यांच्यासाठी सोपे राहणार नाही.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : अमेरिका-इराण डील रखडली, इकडे डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एक धक्का, ट्रम्प यांनी लावलेलं 10 टक्के टॅरिफ रद्द कोर्टाचा मोठा निर्णय
अमेरिका-इराण डील रखडली, इकडे डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एक धक्का, ट्रम्प यांनी लावलेलं 10 टक्के टॅरिफ रद्द, कोर्टाचा मोठा निर्णय
धमक्यांवर धमक्या देत सुटलेल्या ट्रम्पकडून दिलासा; पाकिस्तानच्या विनंतीनंतर इराण युद्धावर मोठी घोषणा; गेल्या 24 तासांतील 5 प्रमुख घडामोडी
धमक्यांवर धमक्या देत सुटलेल्या ट्रम्पकडून दिलासा; पाकिस्तानच्या विनंतीनंतर इराण युद्धावर मोठी घोषणा; गेल्या 24 तासांतील 5 प्रमुख घडामोडी
US Iran War : इराणचा अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरुन आरपारची लढाई, युद्ध भडकणार?
इराणचा अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरुन आरपारची लढाई, युद्ध भडकणार?
Gujarat Maharashtra Day 2026: सातासमुद्रापार मराठी आणि गुजराती संस्कृतीचा संगम; न्यू यॉर्कमध्ये 'गुजरात-महाराष्ट्र दिन' दिमाखात साजरा
सातासमुद्रापार मराठी आणि गुजराती संस्कृतीचा संगम; न्यू यॉर्कमध्ये 'गुजरात-महाराष्ट्र दिन' दिमाखात साजरा

व्हिडीओ

SSC Result 2026 : भले शाब्बास... दहावीच्या विद्यार्थ्यांची कामगिरी खास! Special Report
Suvendu Adhikari New CM of Bengal : पश्चिम बंगालचे नवे 'अधिकारी'Special Report
MP Jailer Firoza-Prisoner Dharmendra Love Story :जेलर कैद्याची कारगृहातील प्रेमकहाणी Special Report
Nida Khan Arrested Nashik TCS Case : निदा खानची पाठराखण,जलीलांची भूमिका योग्य? Special Report
Chitra Wagh Mumbai : घरातही मुली सुरक्षित राहिलेल्या नाहीत, अत्याचार कोण करतंय तर बाप, मामा, भाऊ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kiran Bidkar: नागपूरच्या 'त्या' RTO अधिकाऱ्याला मोठा दिलासा; 'मॅट'कडून निलंबनाचे आदेश रद्द, नेमकं प्रकरण काय?
नागपूरच्या 'त्या' RTO अधिकाऱ्याला मोठा दिलासा; 'मॅट'कडून निलंबनाचे आदेश रद्द, नेमकं प्रकरण काय?
SSC Result 2026 Marathi: मोठी बातमी: दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात 80 हजारापेक्षा जास्त विद्यार्थी नापास
SSC Result: मोठी बातमी: दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात 80 हजारापेक्षा जास्त विद्यार्थी नापास
केरळमध्ये मुख्यमंत्र्यांबाबत अद्याप निर्णय का झाला नाही? विजयानंतरही काँग्रेसमध्ये कोणती कुरघोडी सुरुय??
केरळमध्ये मुख्यमंत्र्यांबाबत अद्याप निर्णय का झाला नाही? विजयानंतरही काँग्रेसमध्ये कोणती कुरघोडी सुरुय??
EPFO : पीएफ खात्यातील पैसे ATM मधून कधीपासून काढता येणार? पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, नवी अपडेट समोर
पीएफ खात्यातील पैसे ATM मधून कधीपासून काढता येणार? पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, नवी अपडेट समोर
Share Market : अमेरिका आणि इराण पु्न्हा संघर्षाच्या उंबरठ्यावर, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे दीड लाख कोटी बुडाले, स्टेट बँकेचा शेअर क्रॅश
अमेरिका आणि इराण पु्न्हा संघर्षाच्या उंबरठ्यावर, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे दीड लाख कोटी बुडाले, स्टेट बँकेचा शेअर क्रॅश
तमिळनाडूतील राज्यपालांच्या तिढ्यानंतर आता दोन आमदार असलेल्या पक्षांकडून टीव्हीकेकडे मोठी मागणी; बहुमताची जुळवाजुळव झाली की नाही?
तमिळनाडूतील राज्यपालांच्या तिढ्यानंतर आता दोन आमदार असलेल्या पक्षांकडून टीव्हीकेकडे मोठी मागणी; बहुमताची जुळवाजुळव झाली की नाही?
First EVM Election: देशात पहिल्यांदा EVM वर मतदान कधी झालेलं? वेगळ्या कारणानं निवडणूक झालेली रद्द, पराभूत उमेदवार फेरनिवडणुकीत झालेला विजयी...
देशात पहिल्यांदा EVM वर मतदान कधी झालेलं? 99 टक्के लोक चुकीचं उत्तर देतात...
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाचा नफा वाढला, प्रतिशेअर 17.35 रुपयांचा लाभांश जाहीर केला पण शेअर गडगडला, नेमकं काय घडलं?
स्टेट बँक ऑफ इंडियाचा नफा वाढला, प्रतिशेअर 17.35 रुपयांचा लाभांश जाहीर केला पण शेअर गडगडला, गुंतवणूकदारांना धक्का
Embed widget