एक्स्प्लोर

Sanjay Raut: बोलबच्चन प्रेरणा आम्ही मोदींकडून घेतली, ते समस्त जगातील बोलबच्चन महामंडळाचे अध्यक्ष आहेत; संजय राऊतांचा फडणवीसांच्या वक्तव्यावर पलटवार

Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले की, फडणवीस स्वत: ज्युनिअर बोलबच्चन आहेत. त्यांना अजून ते जमत नाही ते उघडे पडतात. मात्र मोदी दररोज उघडे पडत आहेत. लोक त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच पार पडलेल्या शिवसेनेच्या वर्धापन दिनामध्ये बोलताना भाजपला जाहीर आव्हान दिले होते. त्यांनी किल मी म्हणत भाजपला अंगावर येण्याचं ओपन चॅलेंज देत सोबत येताना ॲम्बुलन्स घेऊन या असा सुद्धा आव्हान दिलं होतं. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार करतानाच बोलबच्चनगिरी करणाऱ्यांना उत्तर देत नसल्याचे म्हटलं होतं. यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांच्या बोलबच्चन वक्तव्यावर खोचक टोला लगावला आहे. 

आम्हाला ते बोलबच्चन म्हणत असतील, तर ती मोदींकडून प्रेरणा घेतली 

संजय राऊत म्हणाले की, आम्हाला ते (फडणवीस) बोलबच्चन म्हणत असतील, तर ती मोदींकडून प्रेरणा घेतली आहे. ते समस्त जगातील बोलबच्चन महामंडळाचे अध्यक्ष आहेत. जगाच्या बोलबच्चन करणाऱ्यांच्या ज्या काही संघटना आहेत त्यांचे ते अध्यक्ष आहेत. पूर्वी आमचे त्यांच्याशी संबंध होते, त्यामुळे काही गुण आले असतील, असे म्हणत संजय राऊत यांनी पलटवार केला. मोदी बोलबच्चन असले तरी ट्रम्प यांनी भारत पाक युद्धबंदी आम्ही केली असे 18व्यांदा म्हणूनही त्यांच्या  वक्तव्यांवर अजूनही मोदींची दातखिळी बसली असल्याची टीका सुद्धा संजय राऊत यांनी केली. 

फडणवीस स्वत: ज्युनिअर बोलबच्चन 

संजय राऊत म्हणाले की, फडणवीस स्वत: ज्युनिअर बोलबच्चन आहेत. त्यांना अजून ते जमत नाही ते उघडे पडतात. मात्र मोदी दररोज उघडे पडत आहेत. लोक त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत, असा हल्लाबोलही त्यांनी केला. 

एकनाथ शिंदे हे लिंबू मिरची उपमुख्यमंत्री आहेत 

संजय राऊत पुढे म्हणाले की, मराठी अस्मितेच्या खपली काढण्यासाठी अमित शाह येथे येतात आणि बोलतात. मराठी एकजुटीचा आणि मराठी माणसाचा अपमान अमित शाह यांनी केला. एकनाथ शिंदे हे लिंबू मिरची उपमुख्यमंत्री आहेत.  त्यांच्या गटाने स्पष्ट केलाय की आम्ही अमित शाहांचे बूट चाटे आहोत. एकनाथ शिंदे यांचा परिचय अमित शाह यांच्यापेक्षा आम्हाला जास्त माहिती असल्याचा टोलाही राऊत यांनी लगावला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

LPG Booking Rule : LPG सिलेंडरच्या बुकिंग कालावधीमध्ये 'इतक्या' दिवसांची वाढ, इराण युद्धाचा फटका भारताला
LPG सिलेंडरच्या बुकिंग कालावधीमध्ये 'इतक्या' दिवसांची वाढ, इराण युद्धाचा फटका भारताला
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला

व्हिडीओ

BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Embed widget