Kolhapur News: हुपरीत चांदी व्यावसायिकाच्या घरावर अन् कार्यालयावर ईडीची छापेमारी, 15 तास कसून चौकशी
Kolhapur News: ही चौकशी सुरू असताना महावीर नगर परिसरामध्ये कोणालाही फिरकू दिली जात नव्हते. इतकेच नव्हे तर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील चंदेरीनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हुपरीमध्ये आज (21जून) ईडीची धाड पडल्याने एकच खळबळ उडाली. हुपरीमधील बड्या चांदी व्यावसायिकाच्या घरी ही धाड पडली होती. दरम्यान, या धाडीमध्ये तब्बल 15 तास कसून चौकशी करण्यात आल्याने परिसरातील चांदी व्यावसायिकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. दरम्यान, अशा प्रकारची धाड ही पहिल्यांदाच पडल्याने शहरांमध्ये चांगली चर्चा रंगली. चांदी व्यवसायिकाच्या कार्यालयामध्ये ईडीच्या धाडीमध्ये तब्बल 15 तास चौकशी करण्यात आली. दरम्यान ही चौकशी सुरू असताना महावीर नगर परिसरामध्ये कोणालाही फिरकू दिली जात नव्हते. इतकेच नव्हे तर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दरम्यान, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या निधी बँक संबंधित असलेल्या व्यक्तीची चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. चांदी व्यवसाय, निधी बँक व दुबईमधील शेअर मार्केट आदी व्यवसायामुळे या उद्योजकाच्या आर्थिक व्यवहाराची व्याप्ती मोठी आहे. गेल्या वर्षभराच्या कालावधीत या उद्योजकाच्या दुबईसह अनेक देशांचा प्रवास झाला असल्याने ईडीचे लक्ष यांच्यावर केंद्रित झाले आहे. मात्र, या चौकशीमध्ये नेमकं काय निष्पन्न झालं याबाबत अजून कोणताही तपशील कळू शकला नाही. हुपरी शहर चांदी व्यवसायासाठी ओळखले जाते. त्यामुळे बाजारपेठेत कोट्यधींची उलाढाल होत असते.
इतर महत्वाच्या बातम्या
























