एक्स्प्लोर
Sangli Rain Update: सांगलीतील चांदोली परिसरात सलग तिसऱ्या दिवशी अतिवृष्टी; 24 तासात 99 मिलिमीटर पावसाची नोंद
गतवर्षीच्या तुलनेत यंदा जूनमध्येच 169 मिलीमीटर अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरण लवकर भरण्याची स्थिती आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा धरणामध्ये जून महिन्यातच 16 टक्के अधिक पाणीसाठा झाला आहे.
Sangli Rain Update
1/10

सांगलीतील चांदोली धरण परिसरात सलग तिसऱ्या दिवशी अतिवृष्टी झाली.
2/10

गेल्या 24 तासात 99 मिलिमीटर पाऊस पडला.
3/10

चांदोली परिसरात सलग तिसऱ्या दिवशी अतिवृष्टी झाल्यामुळे चांदोली करण्यात 11 हजार 939 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे.
4/10

त्यामुळे चांदोली धरणात झपाट्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे.
5/10

चांदोलीत 17.15 टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून धरण 49.84 टक्के भरलं आहे.
6/10

धरणातून 1 हजार 219 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
7/10

शासकीय नियमानुसार 65 मिलिमीटर पाऊस पडला की अतिवृष्टीची नोंद होते.
8/10

एक जूनपासून धरणाचे तांत्रिक वर्ष सुरू होते. यंदाच्या तांत्रिक वर्षातील ही पहिलीच अतिवृष्टीची नोंद आहे.
9/10

आजअखेर 359 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, गतवर्षीच्या तुलनेत हा पाऊस अधिक आहे.
10/10

गतवर्षी आजच्या तारखेपर्यंत 190 मिलिमीटर पाऊस पडला होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 169 मिलीमीटर अधिक पावसाची नोंद झाली आहे.
Published at : 19 Jun 2025 01:24 PM (IST)
आणखी पाहा






















