एक्स्प्लोर
पहलगाम हल्ल्यानंतर हाय अलर्ट; मिरज रेल्वे स्टेशनवर श्वान पथक, नालासोपारात कोम्बिंग ऑपरेशन
पहलगाम हल्ल्यानंतर देशभरातील महत्त्वाच्या ठिकाणांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला असून मुंबईसह अनेक ठिकाणी पोलिसांकडून चेकींग आणि कोम्बिंग ऑपरेशन सुरू असल्याचे दिसून येते.
Sangli railway junction dog squad
1/8

पहलगाम हल्ल्यानंतर देशभरातील महत्त्वाच्या ठिकाणांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला असून मुंबईसह अनेक ठिकाणी पोलिसांकडून चेकींग आणि कोम्बिंग ऑपरेशन सुरू असल्याचे दिसून येते.
2/8

हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे सुरक्षा दल अलर्ट मोडवर आले आहेत. उन्हाळी सुट्ट्यामुळे रेल्वेमध्ये प्रवाशांची वाढ झाली असून सर्व रेल्वेगाड्या हाउसफुल आहेत.
3/8

सर्व रेल्वे गाड्यांमध्ये रेल्वे सुरक्षा दलाने सुरक्षा रक्षकांची वाढ केलीये. तसेच संवेदनक्षम असणाऱ्या मिरज जंक्शनची श्वानपथकाकडून तपासणी करण्यात येत आहे.
4/8

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या अखत्यारीत येणारे मिरज जंक्शन हे देखील संवेदनक्षम जंक्शन आहे. तसेच हे जंक्शन महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर येत असल्यामुळे या जंक्शन मध्ये रेल्वे सुरक्षा दलाने सुरक्षेत वाढ केलीये.
5/8

मिरजमार्गे उत्तर भारत आणि दक्षिण भारतात जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांमध्ये सुरक्षा जवानांची संख्या वाढविण्यात आली आहे.
6/8

दुसरीकडे जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या असून, त्याच पार्श्वभूमीवर मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 26 एप्रिल रोजी सायंकाळी 5.30 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत व्यापक ऑल आऊट कोबिंग ऑपरेशन आणि नाकाबंदी राबवण्यात आली होती.
7/8

या मोहिमेचा भाग म्हणून नालासोपारा पोलीस ठाण्याने नालासोपारा पश्चिमेकडील इमारतींमध्ये तसेच झोपडपट्टी आणि कामगार वसाहतींमध्ये संशयित नागरिक आणि मजुरांविरोधात शोधमोहीम सुरू केली होती.
8/8

या कारवाईदरम्यान जवळपास 40 ते 50 संशयित नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी करण्यात आली आहे. पोलिसांनी संबंधितांकडून आधारकार्ड आणि वास्तव्याचे पुरावे जमा करून त्यांची पडताळणी सुरू केली आहे. या तपासात नागरिकांची ओळख, त्यांचे वास्तव आणि त्यांचा भारतात राहण्याचा कायदेशीर हक्क याची बारकाईने चौकशी करण्यात येणार आहे.
Published at : 29 Apr 2025 09:02 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























