Sangli News : कृष्णा नदी पात्रात मृत माशांचा खच, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; आयुक्तांच्या निवासस्थानासमोर फेकले मृत मासे
Sangli News : कृष्णा नदीच्या (Krishna River) पात्रात हजारो मासे (Fish) मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली आहे. यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.
Sangli News : कृष्णा नदीच्या (Krishna River) पात्रात हजारो मासे (Fish) मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली आहे. सांगली (Sangli) जिल्ह्यातील अंकलीमध्ये कृष्णा नदीच्या (Krishna River) पात्रामध्ये हजारो मासे तडफडून मरत आहेत. नदीमध्ये मोठ्या प्रमाणात दूषित पाणी मिसळत असल्यानं मासे मृत झाले आहेत. दरम्यान, या घटनेनंतर संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Sanghatana) कार्यकत्यांनी सांगली मिरज कुपवाड महापालिका (Sangali-Miraj-Kupwad Municipal Corporation) आयुक्तांच्या निवासस्थानासमोर मृत मासे फेकले आहेत.
आयुक्तांच्या निवासस्थानावर चार ते पाच पोती मासे फेकले
दरम्यान, रात्री 10 वाजण्याच्या सुमारास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जवळपास 10 ते 15 कार्यकर्ते आयुक्तांच्या निवासस्थानी येऊन घोषणा देत होते. यावेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानावर जवळपास चार ते पाच पोती मासे फेकले आहेत. दरम्यान, प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या भोंगळ कारभारामुळं हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. गनिमी काव्यानं येत्या दोन दिवसात प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि प्रशासनाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते तीव्र आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे. साखर कारखान्याचे मळी मिश्रित आणि सांगली शहरातील सोडण्यात येणारे दुषित पाण्यामुळं हे मासे मृत पडत असल्याचं बोलले जात आहे. त्यामुळं आता प्रदूषण महामंडळ याबाबत काही निर्णय घेणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मृत माशामुळं नदी मोठ्या प्रमाणात प्रदुषित
गेल्या दोन दिवसापासून सांगली महापालिकेच्या शेरी नाल्यातून आणि वसंतदादा साखर कारखान्यामधून मळीमिश्रीत आणि प्रदुषित पाणी सोडल्यानं कृष्णा नदीत पाण्याचा खच पडला आहे. यामुळं हरिपूर संगमापासून ते नृसिंहवाडीपर्यंत कृष्णा नदीत मासे तरंगू लागले आहेत. मृत माशामुळं नदी मोठ्या प्रमाणात प्रदुषित झाली आहे. याचा फटका जयसिंगपूर शहरासह मिरज अंकली आणि शिरोळ तालुक्यातील 20 हून अधिक गावांना बसणार आहे. प्रदुषण विभागाचे अधिकाऱ्यांची मिलीभगत असल्यानं सर्वसामान्य जनतेला याचा त्रास सहन करावा लागत आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी याप्रकरणी मुग गिळून गप्प असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं म्हटलं आहे.
जानेवारीत कोल्हापूर ते शिरोळपर्यंत पडला होता माशांचा खच
जानेवारी महिन्यात कोल्हापूर शहरापासून ते पार शिरोळपर्यंत मृत माशांचा खच पडला होता. पोकळ आश्वासने, प्रदुषणमुक्तीची गुलाबी स्वप्ने, कारखान्यांकडून सांडपाणी थेट पाण्यात सोडले जात असल्याने नदीच्या पाण्यात अक्षरश: विष तयार होत आहे. पाण्यातील ऑक्सिजनचा अंश कमी होत चालल्याने लाखो मासे तडफडून मृत्यूमुखी पडत आहेत. तेरवाड बंधाऱ्याजवळ लाखो मासे मृत्युमुखी पडले होते.
महत्त्वाच्या बातम्या: