Sangli News : सांगलीमध्ये कृष्णा नदी पात्रात प्रदूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत्यूमुखी; मृत मासे गोळा करण्यासाठी झुंबड
सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पात्रात हजारो मासे मृत्यूमुखी पडले आहेत. सांगलीजवळ असलेल्या अंकलीमध्ये कृष्णा नदीच्या पात्रामध्ये हजारो मासे तडफडून मरत आहेत. यामुळे नदीकाठी मृत माशांचा खच पडला आहे.
Sangli News : सांगलीमध्ये (Sangli News) कृष्णा नदीच्या (Krishna River) पात्रात हजारो मासे मृत्यूमुखी पडले आहेत. सांगलीजवळ असलेल्या अंकलीमध्ये कृष्णा नदीच्या पात्रामध्ये हजारो मासे तडफडून मरत आहेत. यामुळे नदीकाठी मृत माशांचा खच पडला आहे. नदीमध्ये मोठ्या प्रमाणात दूषित पाणी मिसळत असल्याने हे मासे मृत झाले आहेत. मृत मासे गोळा करण्यासाठी अंकलीमध्ये झुंबड उडाली आहे. मोठे मासे देखील या ठिकाणी मृत पडले आहेत. साखर कारखान्याचे मळी मिश्रित आणि सांगली शहरातील सोडण्यात येणारे दुषित पाणी यामुळे हे मासे मृत पडत असल्याचं बोलले जात आहे. प्रदूषण महामंडळ याबाबतीत नेमकी काय भूमिका घेणार? हे बघावं लागणार आहे.
शिरोळ तालुक्यातही मृत माशांचा खच
दरम्यान कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील उदगावमध्येही कृष्णा नदीपात्रात रासायनिक मळीचे पाणी सोडल्याने लाखो मासे मृत्युमुखी पडले आहेत. नागरिकांनी हे मृत मासे गोळा करण्यासाठी गर्दी केली होती. उदगावमध्ये कृष्णा नदीची गेल्या आठ दिवसांपासून पाण्याची पातळी घटली आहे. रासायनिक मळीचे दूषित पाणी नदीत सोडण्यात आलं आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. लाखो मृत माशांचा खच नदीपत्रात येऊन पडला आहे.
पंचगंगेच्या पात्रात माशांचा तडफडून मृत्यू
दरम्यान, जानेवारी महिन्यात जानेवारी महिन्यात कोल्हापूर शहरापासून ते पार शिरोळपर्यंत मृत माशांचा खच पडला होता. पोकळ आश्वासने, प्रदुषणमुक्तीची गुलाबी स्वप्ने, कारखान्यांकडून सांडपाणी थेट पाण्यात सोडले जात असल्याने नदीच्या पाण्यात अक्षरश: विष तयार होत आहे. पाण्यातील ऑक्सिजनचा अंश कमी होत चालल्याने लाखो मासे तडफडून मृत्यूमुखी पडत आहेत. तेरवाड बंधाऱ्याजवळ लाखो मासे मृत्युमुखी पडले होते.
इतर महत्वाच्या बातम्या