एक्स्प्लोर

Sangli Crime news: सांगलीत माजी महापौर सुरेश पाटील यांच्याकडून आत्महत्येचा प्रयत्न, राजकीय वर्तुळात खळबळ

Suresh Adgonda Patil in Sangli: माजी महापौर असलेल्या सुरेश पाटील यांनी साडीने गळफास घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचा जीव वाचला.

Sangli Crime News: सांगलीमधील राष्ट्रवादीचे नेते, माजी महापौर सुरेश आदगोंडा पाटील यांनी निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. सुरेश पाटील (Suresh Patil) यांना तातडीने येथील उषःकाल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची प्राथमिक नोंद विश्रामबाग पोलिस ठाण्यात करण्यात आली असून सुरेश पाटील यांनी हे आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण  मात्र अद्याप अस्पष्ट आहे. सुरेश पाटील यांनी त्याच्या निवासस्थानी साडीने गळफास लावण्याचा प्रयत्न केला. कुटुंबीयांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. तेथे अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले.

सुरेश पाटील यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. मात्र, सुरेश पाटील यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. गेल्या तीन दशकांपासून सांगली जिल्ह्यातील राजकारण, व्यापार, शिक्षणक्षेत्र आणि समाजकारणात सुरेश पाटील यांना मानाचे स्थान आहे. त्यामुळे सुरेश पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येताच सांगलीकरांना मोठा धक्का बसला. 

सुरेश पाटील हे गेल्या वर्षभरापासून काही कारणास्तव राजकारण आणि सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होते. त्यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या सुरश्री संगीत महोत्सवाच्या उद्घाटनाला गेल्या रविवारी ते उपस्थित होते. त्यानंतर सोमवारी सकाळी त्यांनी नेमीनाथनगर येथील घरी साडीने गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने ही गोष्ट वेळीच कुटुंबीयांच्या लक्षात आल्याने त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.  काल रात्री रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आता सुरेश पाटील यांनी प्रकृती स्थिर आहे.

‘तो’ फोन आल्यानंतर बाबासाहेब मनोहरेंनी गोळी झाडून घेतल्याचा दावा

लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी शनिवारी रात्री डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. याप्रकरणात आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शनिवारी रात्री बाबासाहेब मनोहरे यांना एक फोन आला होता. या फोनवर बोलल्यानंतर बाबासाहेब मनोहरे यांनी त्यांच्या खोलीत जाऊन स्वत:वर गोळी झाडून घेतली, असा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केला. त्यामुळे हा फोन नक्की कोणाचा होता, याबाबत पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

आणखी वाचा

डोक्याची कवटी फोडून गोळी आरपार, तुकडे मेंदूत पसरले, लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांची प्रकृती चिंताजनक

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain Updates: मान्सून केरळमध्ये दाखल, महाराष्ट्रात कधी?; हवामान विभागाने तारीख सांगितली, पावसाचे A टू Z अपडेट्स
मान्सून केरळमध्ये दाखल, महाराष्ट्रात कधी?; हवामान विभागाने तारीख सांगितली, पावसाचे A टू Z अपडेट्स
Vidhan Parishad Election 2026: सातारा-सांगलीत शरद पवार गटाची 'डबल' खेळी! विधान परिषद निवडणुकीसाठी दोन उमेदवार अर्ज भरणार; नेमकं कारण काय?
सातारा-सांगलीत शरद पवार गटाची 'डबल' खेळी! विधान परिषद निवडणुकीसाठी दोन उमेदवार अर्ज भरणार; नेमकं कारण काय?
Vidhan Parishad Election 2026: सातारा-सांगली विधानपरिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट, देवेंद्र फडणवीसांच्या 'त्या' व्हिडिओमुळे खळबळ; शेखर गोरेंना लॉटरी लागणार?
सातारा-सांगली विधानपरिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट, देवेंद्र फडणवीसांच्या 'त्या' व्हिडिओमुळे खळबळ; शेखर गोरेंना लॉटरी लागणार?
तू मागच्याजन्मी नागीन; कडेश्वर धाममधील भोंदूबाबाकडून लैंगिक अत्याचार, सांगलीतील धक्कादायक घटना
तू मागच्याजन्मी नागीन; कडेश्वर धाममधील भोंदूबाबाकडून लैंगिक अत्याचार, सांगलीतील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Bal Mane Konkan Vidhan Parishad Election 2026: ठाकरेंनी विश्वास दाखवला, राणेंनी उमेदवार फोडला
WhatsApp Scam Alert Special Report : मेसेजवरील एका क्लिकवर स्कॅम मेसेज ओळखणं होणार सोपं
Shashikant Shinde : सरकारचे भांडवलधार्जिणे निर्णय घेल्याने महागाई वाढतेय- शशिकांत शिंदे
Raosaheb Danve on Abdul Sattar : अब्दुल सत्तार चार तारखेला अर्ज मागे घेतील - रावसाहेब दानवे
Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cockroach Janata Party: कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा धसका? केंद्र सरकारकडून कारवाईचा पहिला हातोडा, दोघांची उचलबांगडी!
कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा धसका? केंद्र सरकारकडून कारवाईचा पहिला हातोडा, दोघांची उचलबांगडी!
Jodhpur Social Media Influencer Anita Bishnoi: ड्रेसवरून ट्रोलिंग, जीवे मारण्याच्या धमक्या; इन्स्टा लाईव्हमध्येच विष प्राशन करत इन्फ्लुएंसरनं उचललं टोकाचं पाऊल
ड्रेसवरून ट्रोलिंग, जीवे मारण्याच्या धमक्या; इन्स्टा लाईव्हमध्येच विष प्राशन करत इन्फ्लुएंसरनं उचललं टोकाचं पाऊल
Shivsena UBT On Bal Mane : बाळ माने यांची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी, संजय राऊतांनी दिली माहिती, उद्धव ठाकरेंकडून पहिली कारवाई, विधान परिषदेतून ऐनवेळी घेतली होती माघार
बाळ माने यांची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी, संजय राऊतांनी दिली माहिती, उद्धव ठाकरेंकडून पहिली कारवाई, विधान परिषदेतून ऐनवेळी घेतली होती माघार
Konkan Vidhan Parishad Election 2026: उद्धवसाहेबांनी उमेदवारी दिली, पण राणेसाहेबांनी...., कोकणात विधानपरिषदेची उमेदवारी मागे घेताच बाळ माने काय काय म्हणाले?
उद्धवसाहेबांनी उमेदवारी दिली, पण राणेसाहेबांनी...., कोकणात विधानपरिषदेची उमेदवारी मागे घेताच बाळ माने काय काय म्हणाले?
Nagpur Crime News : गर्लफ्रेंडला आयफोन भेट देण्यासाठी गोदामात मारला डल्ला; टिनपत्रे फोडून आत शिरले अन्... 2 अल्पवयीनसह 3 आरोपी अटकेत, नागपुरातील घटना
गर्लफ्रेंडला आयफोन भेट देण्यासाठी गोदामात मारला डल्ला; टिनपत्रे फोडून आत शिरले अन्... 2 अल्पवयीनसह 3 आरोपी अटकेत, नागपुरातील घटना
Rajesh Exports and LIC : सेबीचा राजेश एक्सपोर्टसला दणका आणि एलआयसीला फटका,राजेश एक्सपोर्टसला लोअर सर्किट लागलं, LIC कडे किती टक्के भागिदारी?
सेबीचा राजेश एक्सपोर्टसला दणका आणि एलआयसीला फटका,राजेश एक्सपोर्टसच्या शेअरला लोअर सर्किट लागलं
Vastu Tips : काय सांगता! पोपटाकडे असते तुमचं भाग्य बदलण्याची क्षमता? जाणून घ्या पोपटाशी संबंधित मान्यता आणि परिणाम
काय सांगता! पोपटाकडे असते तुमचं भाग्य बदलण्याची क्षमता? जाणून घ्या पोपटाशी संबंधित मान्यता आणि परिणाम
Sangli Satara Vidhan Parishad : महायुतीसाठी साताऱ्यातून गुड न्यूज, शंभूराज देसाई- उमेदवार धैर्यशील कदम एकाच वाहनातून सांगलीकडे रवाना, सेनेच्या तानाजीराव पाटील यांच्या माघारीचे संकेत  
शंभूराज देसाई- भाजप उमेदवार धैर्यशील कदम एकाच वाहनातून सांगलीकडे रवाना, सेनेच्या तानाजीराव पाटील यांच्या माघारीचे संकेत
Embed widget