Sangli News : सांगली मार्केट यार्डात मुहूर्ताच्या सौद्यात हळदीला झळाळी, राजापुरी हळदीला क्विंटलला 10 हजार 100 रुपये दर
सांगली मार्केट यार्डात नवीन हळद सौद्यास प्रारंभ झाला. मुहूर्ताच्या सौद्यामध्ये 862 पोती राजापुरी हळदीची आवक झाली. हळदीला प्रति क्विंटल 10 हजार 100 रुपये ते सात हजार 500 रुपये दर मिळाला.
Sangli News : सांगली मार्केट यार्डात (Sangli News) मंगळवारी नवीन हळद सौद्यास प्रारंभ झाला. मुहूर्ताच्या सौद्यामध्ये 862 पोती राजापुरी हळदीची आवक झाली. हळदीला प्रति क्विंटल 10 हजार 100 रुपये ते सात हजार 500 रुपये दर मिळाला. पहिल्याच सौद्यात चांगला दर मिळाल्यामुळे शेतकरी समाधानी झाले. भविष्यातही दर तेजीत असेल, असा व्यापाऱ्यांनी अंदाज वर्तवला आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी आशीष बारकुल यांच्या हस्ते नवीन राजापुरी हळद शेतीमाल सौद्याचा शुभारंभ यांचे शुभहस्ते करण्यात आला.
नवीन हळद सौद्याचा शुभारंभ मे. गणपती जिल्हा कृषि औधेगिक सह सोसायटी प्लॉट नं. 1 या दुकानातून झाला. या दुकानामधील हळद सौद्यामध्ये तासगाव तालुक्यातील पेड गावचे शेतकरी शेतकरी विनोद शिवाजी शेंडगे यांच्या राजापूरी हळदीला क्विंटनला 10 हजार 100 इतका दर मिळाला. सदरची हळद मनाली ट्रेंडींग कंपनी यांनी खरेदी केली. सदरच्या हळद सौद्यासाठी क्विंटलला कमीत कमी पाच हजार आणि 10 हजार 100 व सरासरी 7 हजार 500 इतका दर मिळाला. सदर सौद्यामध्ये 862 पोती नविन स्थानिक हळदीची आवक व विक्री झाली.
सदर हळद सौद्यासाठी बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण, शरद शहा अध्यक्ष चेंबर ऑफ कॉमर्स, अमर देसाई अध्यक्ष अडत संघटना, सतिश पटेल, अध्यक्ष हळद खरेदीदार संघटना, अडते/व्यापारी, मनोहर सारडा, शीतल पाटील, गोपाळ मर्दा, सत्यनारायण अटल, मधूकर काबरा, अभय मगदूम, एन बी पाटील, इत्यादी आडते व्यापारी हळद सौदे विभाग प्रमुख सी. एम. शिंदे व आडते / व्यापारी, हमाल बांधव तोलाईदार व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हळद उत्पादक शेतकऱ्यांनी आपली हळद जास्तीत जास्त विक्रीसाठी सांगली कृषि उत्पन्न बाजार समिती सांगली येथे घेऊन यावे व शेतकऱ्यांसाठी चालू असणारी शासनाची हळद/बेदाणा शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समितीचे प्रशासक मंगेश सुरवसे व सचिव महेश चव्हाण यांनी केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या