(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hatkanangle, Sangli Loksabha : हातकणंगले, सांगलीमध्ये उन्हाच्या तडाख्यात मतदानाचा उत्साह
उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन सांगली, मिरज तसेच ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी मंडपात बुथ उभारण्यात आले होते. सांगलीचा पारा आज मतदानाच्या दिवशी चाळिशी पार गेला होता.
सांगली : लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील 11 जागांवर मतदान होत आहे. यामध्ये हातकणंगले, सांगलीमध्ये उन्हामध्ये उत्साह दिसून आला. सांगलीमध्ये पाच वाजेपर्यंत 52.56 टक्के मतदानाची नोंद झाली. हातकणंगलेमध्ये सायंकाळी पाचपर्यंत 62.18 टक्के मतदानाची नोंद झाली. उन्हामुळे मतदानावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसून आले. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन सांगली, मिरज तसेच ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी मंडपात बुथ उभारण्यात आले होते. सांगलीचा पारा आज मतदानाच्या दिवशी चाळिशी पार गेला होता.
Fulfilling their responsibility towards nation building, Divyang voters show the mark of indelible ink after casting their vote during the 3rd Phase of #GeneralElection2024 at Sangli, Maharashtra#IVote4Sure #Elections2024 #LokSabhaElections2024 pic.twitter.com/lV9Ot5Oie3
— PIB India (@PIB_India) May 7, 2024
तिसऱ्या टप्प्यातील एकूण 11 लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे
लातूर - 55.38टक्के
सांगली - 52.56 टक्के
बारामती - 45.68 टक्के
हातकणंगले - 62.18 टक्के
कोल्हापूर - 63.71 टक्के
माढा - 50.00 टक्के
उस्मानाबाद - 52.78 टक्के
रायगड - 50.31 टक्के
रत्नागिरी -सिंधुदूर्ग- 53.75 टक्के
सातारा - 54.11 टक्के
सोलापूर - 49.17 टक्के
आज सांगली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया पार पाडत आहेत. मतदान करण्यापूर्वी आज गणपती मंदिरात जाऊन गणरायाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
— Vishal Prakashbapu Patil (@patilvishalvp) May 7, 2024
.
.
.#Ganpati #Ganpatimandir #sangli#VishalPatil #sangliloksabha #loksabhaelection #loksabha pic.twitter.com/Uq0qzb8dZu
इतर महत्वाच्या बातम्या