एक्स्प्लोर

Sangli Loksabha : सांगली लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल

चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) उपस्थित होते. 

सांगली : फक्त सांगलीच नव्हे, तर अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली लोकसभेसाठी (Sangli Loksabha) महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray Faction) उमेदवार चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांनी आज (19 एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल केला. चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), आमदार सुमनताई पाटील आणि काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत उपस्थित होते. 

अर्ज भरण्यापूर्वी नेत्यांच्या भेटीगाठी

सांगलीमध्ये चंद्रहार पाटील हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, यावर आता जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे. दरम्यान, आज चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी संजय राऊत सांगलीमध्ये पोहोचल्यानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या. काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत संजय राऊतांच्या भेटीसाठी पोहोचले. संजय राऊत हॉटेलवर उतरल्यानंतर त्यांच्या भेटीसाठी विक्रम सावंत यांच्यासह जयंत पाटील हे सुद्धा पोहोचले. त्यामुळे मनोमिलनाची चर्चा सुद्धा रंगली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना उपनेते संजय पवार, नितीन बानुगडे पाटील आणि विक्रम सावंत आदी नेत्यांमध्ये चर्चा झाली.  

'काँग्रेस प्रदेश पातळीवरून आलेल्या निरोपानुसार आलो'

नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर नेते अर्ज भरण्यासाठी निघाले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सांगलीच्या जागेवरून वाद रंगला होता तो वाद आता शांत झाला आहे का? अशी सुद्धा चर्चा रंगली. राऊतांच्या भेटीनंतर आमदार विक्रम सावंत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सांगलीमधील उमेदवार चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महाविकास आघाडीचे सगळे घटक पक्ष उपस्थित आहेत. काँग्रेस प्रदेश पातळीवरून आलेल्या निरोपानुसार आल्याचे विक्रम सावंत यांनी सांगितले.  आघाडी धर्मा आम्ही पाहणार असल्याचे विक्रम सावंत यांनी नमूद केले. यापूर्वी जी काही प्रक्रिया झाली त्यामध्ये आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याचे विक्रम सावंत म्हणाले. 

दरम्यान चंद्रावर पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विश्वजीत कदम उपस्थित राहणार की नाही? याचीच चर्चा सर्वाधिक रंगली होती. मात्र, विश्वजीत कदम यांच्या मातोश्री आजारी असल्याने ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचू शकले नाहीत. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Navneet Rana: अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
Kalicharan Maharaj : जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
Nora Fatehi: डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 17  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMNS-Shivsena Sewri : प्रतिस्पर्धी अजय चौधरी आणि बाळा नांदगावकरांचा नागरिकांशी दिलखुलास संवादMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  17 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navneet Rana: अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
Kalicharan Maharaj : जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
Nora Fatehi: डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
Amit Thackeray: राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण
राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
शरद पवारांच्या सांगता सभेकडे अख्ख्या देशाचं लक्ष, बारामतीत शेवटच्या सभेत काय घोषणा करणार? अजितदादा चितपट होणार?
शरद पवारांच्या सांगता सभेकडे अख्ख्या देशाचं लक्ष, बारामतीत शेवटच्या सभेत काय घोषणा करणार? अजितदादा चितपट होणार?
×
Embed widget