एक्स्प्लोर

Sangli News : शेताच्या बांधावरून फाडफाड इंग्रजी बोलले अन् महावितरणने वीज कनेक्शन सन्मानाने जोडले!

आटपाडी तालुक्यातील य.पा.वाडी गावचे इंग्रजीत संवाद साधणारे (sangli farmer english speaking video) शेतकरी येताळा चव्हाण यांच्या शेतीपंपाचे वीज कनेक्शन आज महावितरणकडून (Mahavitaran) जोडून देण्यात आले.

Sangli News : सांगलीच्या (Sangli News) आटपाडी तालुक्यातील य.पा.वाडी गावचे इंग्रजीत संवाद साधणारे (sangli farmer english speaking video) शेतकरी येताळा चव्हाण यांच्या शेतीपंपाचे वीज कनेक्शन आज महावितरणकडून (Mahavitaran) जोडून देण्यात आले. वीज तोडणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांशी शेतकरी येताळा चव्हाण यांनी वीज जोडणीबाबतची व्यथा इंग्रजीत बोलून मांडली होती. वृद्ध शेतकरी चव्हाण यांचा इंग्रजी संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. रातोरात सोशल मीडियावर चव्हाण यांच्या व्हिडीओचा बोलबाला झाला. यावरून महावितरण कंपनीला ट्रोल देखील करण्यात आले. अखेर महावितरण कंपनीकडून चव्हाण यांची वीज कनेक्शन जोडण्यात आले आहे. त्याचबरोबर त्यांचा सत्कार वीज वितरण कर्मचाऱ्यांनी केला.

फाडफाड इंग्रजीतील व्हिडीओ झाला व्हायरल

आटपाडी तालुक्यातील येताळा चव्हाण यांनी महावितरणचे भरारी पथक शेतात आल्यानंतर थेट इंग्रजी भाषेत सुनावल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला होता. शेतकरी येताळा चव्हाण यांनी कनेक्शन मिळत नसल्याने आपली व्यथा भरारी पथकातील अभियंत्याकडे इंग्रजीतून मांडली. वीज चोरी पकडण्यासाठी आल्यानंतर दोघांमध्ये संवाद झाला. यावेळी ते आपली व्यथा सांगताना दिसून येत होते. 

आटपाडी तालुक्यामध्ये महावितरण विभागाने वीज चोरी रोखण्यासाठी पथके नियुक्त केली आहेत. या पथकाच्या माध्यमातून शेती पंपासाठी होणारी वीजचोरी पकडण्यासाठी आटपाडी महावितरण कार्यालयातील सहाय्यक अभियंता सुनील पवार हे पथकासोबत आटपाडी तालुक्यात य.पा वाडी गावी मंगळवारी दुपारी गेले होते. यावेळी य.पा.वाडी गावचे वेताळ चव्हाण शेतामध्येच होते.

त्यांच्या विहिरीवरील विद्युत पंपासाठी आकडा टाकून वीज घेतल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. यावेळी वेताळ चव्हाण यांनी सहाय्यक अभियंता सुनील पवार याच्याशी इंग्रजीमधून संवाद साधत (sangli farmer english speaking video) आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी अधिकारी सुनील पवार यांनीही वयस्कर शेतकरी चव्हाण यांच्याशी इंग्रजीमधून उत्कृष्ट संभाषण करत त्यांची बाजू ऐकून घेत वस्तुस्थिती समजून सांगितली. दोघांमध्ये संवाद होत असताना इंग्रजीमध्ये झालेले संभाषण पथकातील कर्मचाऱ्यांनी रेकाॅर्ड केल्यानंतर सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले होते. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?

Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय

Embed widget