Gautami Patil : नाच गौतमी पाटीलचा, पण इतर कलाकरांच्या सुपाऱ्या कमी झाल्या का? तमाशा कलावंताना फटका किती??
गौतमी पाटीलचा नांद्रे गावी ऊरुसनिमित्त सांस्कृतिक नृत्यसंगीताचा कार्यक्रम पार पडत आहे. गौतमी पाटीलमुळे नृत्यसंगीताच्या कार्यक्रमामुळे इतर लावणी कलाकारांच्या सुपाऱ्या बंद होत असल्याचा आरोप होत आहे.
Gautami Patil : सोशल मीडिया स्टार सम्राज्ञी गौतमी पाटीलचा (Gautami Patil) नांद्रे गावी ऊरुसानिमित्त सांस्कृतिक नृत्यसंगीताचा कार्यक्रम पार पडत आहे. गौतमी पाटीलमुळे आणि तिच्या नृत्यसंगीताच्या कार्यक्रमामुळे इतर लावणी कलाकारांच्या सुपाऱ्या बंद होत असल्याचा आरोप होत आहे. तथापि, गौतमीच्या नृत्यसंगीताच्या वाढत्या कार्यक्रमामुळे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध अशी लावणी किंवा तमाशा सादर करणाऱ्या कलाकाराच्या सुपाऱ्या कमी झाल्यात असे काही चित्र नसल्याचे कलाकार सांगतात. मात्र ज्या वेशभूषेत गौतमी नृत्य आणि लावणी सादर करते, त्यावरून लावणी सादर करण्याच्या परंपरेत चुकीच्यां प्रथा पडत आहेत यावरून अन्य लावणी, तमाशा कलाकार नाराजी व्यक्त करत आहेत.
गौतमी पाटील दोन महिन्यांनी पुन्हा सांगलीत
सुरुवातीला फारशी चर्चेत नसलेल्या गौतमीवर एका नृत्यादरम्यान केलेल्या अश्लील हावभावाने टीकेची झोड उठली. नंतर तिला अधिकच प्रसिद्धी मिळाली. तिच्या प्रसिद्धीमुळे तिला नृत्याच्या सुपाऱ्या देखील जास्त येऊ लागल्या. कार्यक्रमामध्ये गौतमीच्या अदांनी प्रेक्षक देखील मदमस्त करू लागले. डिसेंबर 2022 मध्ये मिरज तालुक्यातील बेडगमध्ये झालेल्या गौतमीच्या कार्यक्रमात तर जिल्हा परिषदेच्या शाळेच्या छतावरील कौलांचा चुराडा झाला होता आणि मैदान अपुरे पडल्याने झाडावर डान्स पाहण्यास तरुण चढले आणि यात झाडे देखील तुटली असा सगळा दंगा झाला होता. आता दोन महिन्यानंतर पुन्हा मिरज तालुक्यातील नांद्रे या गावी ऊरुसानिमित्त गौतमीचा सांस्कृतिक नृत्यसंगीताचा कार्यक्रम होत आहे. मात्र, गौतमीला मिळणाऱ्या या कार्यक्रमाच्या सुपाऱ्या पाहून इतर लावणी कलाकाऱ्यांच्या सुपाऱ्या कमी किंवा बंद किंवा होतात का असा आरोप होत आहे आणि दुसरीकडे गौतमीच्या कार्यक्रम करण्याला देखील विरोध होत आहे.
गौतमीच्या नृत्यसंगीताच्या वाढत्या कार्यक्रमामुळे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध अशी लावणी किंवा तमाशा सादर करणाऱ्या कलाकाराच्या सुपाऱ्या कमी झाल्यात असे काही चित्र नसल्याचे कलाकार सांगतात. मात्र, ज्या वेशभूषेत गौतमी नृत्य आणि लावणी सादर करते त्यावरून लावणी सादर करण्याच्या परंपरेत चुकीच्यां प्रथा पडत आहेत आणि गौतमी प्रमाणेच नृत्य किंवा लावणी सादर कराव्या अशी अपेक्षा अन्य लावणी नृत्याकडून प्रेक्षक व्यक्त करतोय अशी परिस्थिती असल्याची भावना कलाकार व्यक्त करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या