Sangli : संभाजी भिडेंना कुत्र्याचा चावा, सांगलीतील भटक्या कुत्र्यांचा विषय चव्हाट्यावर
Stray Dog Attack on Sambhaji Bhide : गेल्या आठ वर्षांमध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील भटक्या कुत्र्यांचे सर्व्हेक्षणही झाले नसल्याची माहिती समोर आली आहे.

सांगली : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली. सांगली शहरातील माळी गल्ली या ठिकाणी हा प्रकार घडला. जखमी झालेल्या भिडे गुरूजींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर महापालिकेकडून तात्काळ ज्या भागांमध्ये भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याने हल्ला केला त्या भागामध्ये भटकी कुत्री पकडण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली. या घटनेमुळे सांगली-मिरज-कुपवाड या तीन शहरातील भटक्या कुत्र्यांचा विषय पुन्हा चव्हाट्यावर आला.
सांगली, मिरज, कुपवाड या तिन्ही शहरांत मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेगाणिक वाढतीच आहे. रस्त्यावरुन कुत्र्यांची टोळकी फिरताना भीती वाटते. गेल्या वर्षभरात 4,044 नागरिकांना या मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद आहे. दरवर्षी एक हजाराच्या जवळपास कुत्र्यांची नसबंदी केली जात आहे, तरीही मोकाट कुत्र्याची संख्या थांबण्याचे नाव नाही. त्यामुळे हा आकडा शहरवासियांची चिंता वाढवणारा आहे.
भटकी कुत्री पकडण्याचे मिशन सुरू
संभाजी भिडे यांना कुत्रा चावल्यानंतर महापालिकेडून ज्या भागात ही घटना घडली त्या भागात डॉग व्हॅनच्या मदतीने तात्काळ ऑपरेशन राबत त्या भागातील भटकी कुत्री ताब्यात घेतली गेली. शिवाय ज्या ज्या भागात भटक्या कुत्र्याचा त्रास आहे तेथील भटकी कुत्री तात्काळ पकडण्यात येतात असा दावा मनपा अधिकाऱ्यांकडून केला जातोय
मात्र या घटनेनंतर महापालिकेने भटकी कुत्री पकडण्याची मोहीम राबवली तसे सर्वसामान्य नागरिकांच्यावर देखील आणि शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वर ज्यावेळी भटके कुत्रे हल्ले करतात त्यावेळीही कारवाई करावी. या घटना सतत सांगलीत घडत असतात. त्यामुळे भटके कुत्र्यांचा विषय मुळापासून संपवण्याची गरज नागरिक व्यक्त करत आहेत.
तीन महिन्यात किती जणांना चावा?
- जानेवारी - 331
- फेब्रुवारी- 303
- मार्च- 327
सन 2017 मध्ये मोकाट कुत्र्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यावेळी 14 हजार मोकाट कुत्री आढळून आली होती. ही संख्या नियंत्रणात आणण्यासाठी मोकाट कुत्र्यांची नसबंदी सुरु केली. 1 एप्रिल 2024 ते 8 जानेवारी 2025 पर्यंत 868 कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली.
गेल्या आठ वर्षात मोकाट कुत्र्यांचे सर्वेक्षण झाले नसले तरी, 22 ते 25 हजारांवर ही संख्या गेली असल्याचा अंदाज पालिका प्रशासनातर्फे वर्तविण्यात आला आहे. 1 एप्रिल 2024 ते 29 मार्च 2025 यावर्षी एकूण 1,380 मोकाट श्वानावावर नसबंदी केली. तितकेच ॲन्टीरेबीज लसीकरण झालेले आहे.
आठ वर्षांपूर्वी भटक्या कुत्र्यांचे सर्व्हेक्षण
सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेच्या हद्दीत सन 2016 मध्ये मोकाट कुत्र्यांचा प्रश्न प्रकर्षाने जाणवला. त्यावेळी कुत्र्यांच्या हल्ल्यात एका बालिकेचा मृत्यू झाला होता. याची दखल घेत मनुष्य आणि कुत्रा संघर्ष टाळण्यासाठी नगरविकास विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक राज्यस्तरीय देखरेख समिती स्थापन करण्यात आली होती. त्यानंतर मोकाट कुत्र्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यावेळी 14 हजार मोकाट कुत्री आढळून आली होती. त्यामुळे आता तरी नागरिकांनी भटक्या कुत्र्यांचा प्रश्न मुळापासून सोडवावा अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतायात.
अलीकडे महापालिका हद्दीत लोकांना कुत्र्यांनी चावा घेतलेल्यात एकही मृत्यू झालेला नाही. ही जरी जमेची बाजू असली तरी हजारो नागरिकांना एका वर्षात चावा घेतल्याचा आकडा विचार करायला लावणार आहे. त्यामुळे महापालिकेने हा भटक्या कुत्र्यांचा विषय मुळापासून सोडवायला हवा अशी मागणी केली जात आहे.
ही बातमी वाचा:


















