एक्स्प्लोर
Maharashtra Politics Jalgaon जळगावात पाचोरा मतदारसंघात महायुतीला तडा, शिवसेना-भाजप आमनेसामने
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा (Pachora) आणि भडगाव (Bhadgaon) मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच महायुतीमध्ये (Mahayuti) फूट पडली आहे. शिवसेनेचे आमदार किशोर पाटील (Kishor Patil) आणि भाजपचे आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. 'मी माझ्या मतदारसंघात युती करणार नाही, शिवसेना ही स्वबळावर आहे,' असे वक्तव्य आमदार किशोर पाटील यांनी केले आहे. त्यांच्या या घोषणेनंतर, पाचोरा-भडगाव हा राज्यात युती न करण्याचा निर्णय जाहीर करणारा पहिला मतदारसंघ ठरला आहे. याला प्रत्युत्तर म्हणून, भाजपचे स्थानिक आमदार मंगेश चव्हाण यांनीही भाजप पक्ष सर्व जागांवर स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केले. या निर्णयामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर जळगावच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून दोन्ही पक्षांतील स्थानिक पातळीवरील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement

















