एक्स्प्लोर

बीड तुझ्या बापाची जहांगिरी आहे का? लक्ष्मण हाके यांची गंगाधर काळकुटेंवर जळजळीत टीका; तर मंत्री भुजबळ म्हणाले, असे खूप बघितलेत

Beed : मंत्री भुजबळ यांनी, काळकुटेंसारखे भरपूर बघितले असे म्हणत टीका केली. 'बीड जिल्हा काय यांच्या बापाची जाहंगिरी आहे का?' असा संतप्त सवाल करत लक्ष्मण हाके यांनी पुन्हा डिवचल्याचं पाहायला मिळाला.

Beed OBC Morcha : बीड (Beed) जिल्हा मराठा (Maratha) आणि ओबीसी (OBC) आरक्षणाच्या वादामुळे पुन्हा एकदा पेटला आहे. मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे (Gangadhar Kalkute) यांनी 1994 चा जीआर जाळल्यानंतर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी ओबीसी महाएल्गार सभेतून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 'उडवाच मान माझी माझा नकार नाही, इतकीच शर्त आहे मी वाकणार नाही', अशा शब्दात छगन भुजबळ यांनी आव्हान देणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहे. काळकुटे यांनी भुजबळांनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊनच बीडमध्ये यावे असे आव्हान दिले होते, ज्यावर भुजबळ यांनी, काळकुटेंसारखे भरपूर बघितले असे म्हणते टीका केली आहे.

तर 'बीड जिल्हा काय यांच्या बापाची जाहंगिरी आहे का?' असा संतप्त सवाल करत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुन्हा डिवचल्याचं पाहायला मिळाला. ही केवळ राजकीय लढाई नसून सामाजिक न्यायाची लढाई आहे आणि ती रस्त्यावर तसेच कोर्टातही लढली जाईल, असे दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले आहे.

Chhagan Bhujbal : 'उडवाच मान माझी माझा नकार नाही, इतकीच शर्त आहे मी वाकणार नाही'

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राज्य सरकारने काढलेला जीआर रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी का (17ऑक्टॉबर ) बीडमध्ये महाएल्गार सभेचे (OBC Mahaelgar Sabha) आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या प्रमुख उपस्थित शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर हि सभा पार पडली. या महाएल्गार सभेच्या (Beed OBC Morcha) मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीला मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे (Gangadhar Kalkute) यांच्यासह इतर समन्वयकानी कडाडून विरोध केला होता. तसेच सभेपूर्वीच मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष निर्माण झाल्याचे बघून समन्वयकांना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आल्या होत्या. तर मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊनच बीडमध्ये यावं, असा आक्रमक पवित्रा मराठा समाजाने घेतला. त्यावर या सभेत बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

Gangadhar Kalkute on Chhagan Bhujbal : भुजबळ यांच्या बुद्धीची कीव येते

मंत्री भुजबळ यांच्या बुद्धीची कीव येते. अतिशय खालच्या पातळीत माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला वर्णभेदावरून बोलणं शोभत नसल्याचे काळकुटे म्हणाले. वयाप्रमाणे त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे, त्यामुलं त्यांचे वर्तन असे होत आहे. केवळ मनोज जरांगे पाटील आणि मला शिव्या देण्याचा कार्यक्रम होता असे गंगाधर काळकुटे  म्हणाले. हा ओबीसी समाजाचा मेळावा नव्हता. फक्त शिव्या देण्याचा कार्यक्रम होता, त्यात ते यशस्वी झाले. त्यांची संस्कृती आज सर्वांनी पाहिली. मंत्री पदाचे लाभ घ्यायचे. पण मराठा ओबीसी असा वाद लावायचा. तुम्ही विरोध केला आम्ही देखील विरोध करणार मात्र लोकशाही मार्गाने असेल असेही काळकुटे म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report
Navneet Rana : पक्ष की पती? नवनीत राणांची कुणाशी सहमती? भाजप राणांना झापणार की जपणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
Embed widget