Sambhaji Bhide Guruji Dog Attack: संभाजी भिडेंवर भटक्या कुत्र्याचा हल्ला, पायाला कडकडून चावला, तातडीने रुग्णालयात नेलं
Bhide Guruji Dog attack: संभाजी भिडे यांच्यावर एका कुत्र्याने हल्ला केला. हा कुत्रा त्यांच्या पायाला चावल्याने भिडे गुरुजी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Sangli News: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे उर्फ भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी रात्री संभाजी भिडे (Sambhjai Bhide) हे एका धारकऱ्याच्या घरी भोजनाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. रात्री साधारण 11 वाजता ते हा कार्यक्रम संपवून घराबाहेर पडले. त्यावेळी माळी गल्ली परिसरातून जात असताना एका भटक्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला (Dog Attack) चढवला. या कुत्र्याने संभाजी भिडे यांच्या पायाला कडकडून चावा घेतला. यानंतर संभाजी भिडे यांना तातडीने सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबद्दल अद्याप कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही.
संभाजी भिडे यांचं वय सध्या 80 वर्षांपेक्षा जास्त आहे. ते सध्या सांगलीत वास्तव्याला असतात. 1980 च्या आसपास भिडे यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही संघटना स्थापन केली होती. सांगली, सोलापूर, सातारा, उत्तर कर्नाटकचा काही भाग, कोल्हापूर या भागात या संघटनेचे काम चालते. संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेकडून विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यांची दुर्गामाता दौड आणि गड-किल्ल्यांवरील उपक्रम अनेकदा चर्चेचा विषय ठरतात.
संभाजी भिडेंना चावणाऱ्या कुत्र्याला पकडण्यासाठी मोहीम
सांगलीमध्ये माळी गल्लीत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर रात्री कुत्र्याने हल्ला केला होता. ज्या माळी गल्लीत
कुत्र्याकडून भिडे गुरुजींवर हल्ला झाला त्या गल्लीत महापालिकेकडून कुत्री पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. सांगली महापालिकेच्या डॉग व्हॅन पथकाकडून ही मोहीम हाती घेण्यात आलीय. संभाजी भिडे गुरुजींवर कुत्र्याने हल्ला करत पायाचा चावा घेतला. सांगली शहरातील माळी गल्ली या ठिकाणी हा प्रकार घडला. जखमी झालेल्या भिडे गुरूजींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
आणखी वाचा
धनंजय मुंडेंचा राजीनामा, संभाजी भिडे म्हणाले, त्रिमूर्तींचं सरकार, बुद्धी चळणार नाही याची खात्री!
























