Maharashtra Live blog: कल्याणमध्ये शिंदे गटाच्या माजी नगरसेवकावर हल्ला
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
LIVE

Background
Maharashtra Live blog: कल्याणमधील धक्कादायक घटना. शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या गाडीवर हल्ला. कार्यालयासमोर भांडण सोडवुन जखमी इसमाला रुग्णालयात नेत असताना अज्ञात इसमांकडून हल्ला. हल्ल्यात माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्यासह ज्ञानेश्वर सपाट ,ओंकार सपाट दोघे जखमी. कल्याण महात्मा फुले पोलिसांचा तपास सुरु. ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा.
भिंतीचे बांधकाम ओले असतानाच JCBचा धक्का लागला; ढिगाऱ्याखाली दबून दोन महिला कामगारांचा मृत्यू
Daund Accident News: दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसीतील मेलझर केमिकल प्रा. लि. कंपनीत बांधकाम सुरू असताना एक दुर्दैवी घटना घडली आहे. यात सुरक्षा भिंत कोसळून दोन महिला कामगारांचा मृत्यू झाला असून एक महिला जखमी झाली आहे. ही घटना 16 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. जयकुमार रामचंद्र मुंडफणे आणि अक्षय भानुदास मोरे असे गुन्हा दाखल असल्यांची नावे आहेत.
नवी दिल्लीतील खासदारांच्या इमारतीत लागली आग; सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही
नवी दिल्ली : खासदारांच्या इमारतीत लागली आग
ब्रह्मपुत्र या इमारतीला आज दुपारी आग लागली होती
नवी दिल्ली महापालिकेच्या अग्निशमन दलाने वेळीच हस्तक्षेप करून आगीवर नियंत्रण मिळवले आहे
सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही
























