एक्स्प्लोर

Sadabhau Khot : कोण अडवतोय तेच बघतो, ऊस भंगाराच्या भावात घ्यायचा आहे का? सदाभाऊ खोतांचाही शिंदे फडणवीस सरकारला थेट इशारा 

ज्यातील ऊस बाहेरील राज्यात घालण्यास राज्य सरकारकडून बंदी घालण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांसह शेतकरी संघटनांमध्ये संतापाची लाट आहे. अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी याबाबत आदेश काढले आहेत.

सांगली : येत्या गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्याला यावर्षी उसाच्या कांड्याला सोन्याचा भाव मिळणार आहे. परंतु, राज्य सरकारला शेतकऱ्याचा ऊस भंगाराच्या भावात खरेदी करायचा आहे का? दोन पैसे शेतकऱ्याला मिळायला लागलं की सरकारच्या पोटात दुखायला लागते, अशा शब्दात माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राज्य सरकावर हल्ला चढवला आहे. राज्यातील ऊस बाहेरील राज्यात घालण्यास राज्य सरकारकडून बंदी घालण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांसह शेतकरी संघटनांमध्ये संतापाची लाट आहे. अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी याबाबत आदेश काढले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. 

साखर आयुक्त कार्यालय जाळून टाकू 

ते पुढे म्हणाले की, "पुण्यातील सहकार आयुक्त कार्यालय हे शेतकऱ्यांना, ऊस उत्पादकांना लुटण्याचं कोठार आहे. आम्हाला लुटणार असाल, तर साखर आयुक्त कार्यालय सुद्धा आम्ही जाळून टाकू. लवकरात लवकर हा आदेश मागे घ्यावा ही विनंती राज्याचे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना करत आहे. नाही तर महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी या गळीत हंगामामध्ये रस्त्यावर तर उतरेल पण आम्ही कर्नाटकामध्ये वाजत गाजत ऊस घेऊन जाऊ. बघू आम्हाला कोण अडवण्यासाठी येते." 

राष्ट्रवादीच्या वळूबाईला ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही 

सदाभाऊ खोत म्हणाले की, "सहकार आयुक्त कार्यालयाने कर्नाटकामध्ये शेतकऱ्याला ऊस घालण्यासाठी मनाई केली आहे. शेतकऱ्यांवरती हा मोठा अन्याय आहे. आमच्या बापानं, आम्ही लेकरा बाळांनी कष्ट करून पिकवलेला ऊस राज्यातील साखर कारखान्याला द्यावा की, कर्नाटकाला द्यावा की, गुजरातला द्यावा याचा अधिकार शेतकऱ्यांना आहे. परंतु, दोन पैसे शेतकऱ्यांन मिळायला लागलं की सरकारच्या पोटात दुखायला लागते. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना आदरणीय देवेंद्रजींना मी आव्हान करतो की, राष्ट्रवादीची ही वळू बैल शेतकऱ्यांच्या शेतावर या वळूबाईला सोडू नका, नाहीतर महाराष्ट्राचा ऊस उत्पादक शेतकरी या राष्ट्रवादीच्या वळूबाईला ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही." 

आदेशाला ऊसाच्या सरीत गाडून टाकू

दुसरीकडे, राजू शेट्टी यांनीही राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. "राज्यातील सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व मानून विकासाभिमुख काम करत आहेत असा त्यांचा दावा आहे. त्या मोदी सरकारने वन नेशन वन मार्केटचे धोरण अवलंबले आहे, त्याला शेतीतील कोणतीही शेती उत्पादने व पीक अपवाद नाही. मग महाराष्ट्रातील ऊस शेजारच्या राज्यात निर्यात करणार नाही, अशी भुमिकाच कशी ट्रिपल इंजिन राज्य सरकारने घेतली?" राज्य सरकारला शेजारच्या राज्यात ऊस पाठवू नये असे सांगण्याचा नैतिक अधिकार नाही. या आदेशाला आम्ही ऊसाच्या सरीत गाडून टाकून आम्हाला ज्या ठिकाणी चांगला भाव मिळेल तिथे आम्ही पाठविणार हिम्मत असेल तर तुम्ही आडवून दाखवा, असे आव्हान राजू शेट्टी यांनी दिले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

SSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्तSaif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?Navi Mumbai : नवी मुंबईत दोन तास जड वाहनांवर बंदी, कोल्ड प्ले कॉन्सर्टमुळे वाहतुकीत मोठे बदलMakarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Embed widget