Sangli News : दसरा मेळावा सोडला, पूर्वेश सरनाईक तातडीने सांगलीला, मुख्यमंत्र्यांच्या कार्यतत्परतेचे कौतुक
सांगलीच्या विवेक तेली (Vivek Teli) या तरुणाचा दसरा मेळाव्याला जाताना अपघाती मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक (Purvesh Sarnaik) यांनी दसरा मेळावा सोडून तातडीने सांगली (Sangli) गाठली
![Sangli News : दसरा मेळावा सोडला, पूर्वेश सरनाईक तातडीने सांगलीला, मुख्यमंत्र्यांच्या कार्यतत्परतेचे कौतुक Purvesh Sarnaik Yuva Sena leader visits sangli after accidental death of Shiv Sainik Vivek Teli who was travelling to Mumbai to attend Eknath Shinde Dasara Melava Sangli News : दसरा मेळावा सोडला, पूर्वेश सरनाईक तातडीने सांगलीला, मुख्यमंत्र्यांच्या कार्यतत्परतेचे कौतुक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/25/05eb6fa867d1361dc4cbbde9c6e68e951698214787873291_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सांगली : दसरा मेळाव्यासाठी मुंबईकडे निघालेल्या शिंदेंच्या शिवसैनिकाचा (Shiv Sena Dasara Melava) अपघाती मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तातडीने दखल घेतली. सांगलीच्या विवेक तेली (Vivek Teli) या तरुणाचा दसरा मेळाव्याला जाताना अपघाती मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक (Purvesh Sarnaik) यांनी दसरा मेळावा सोडून तातडीने सांगली (Sangli) गाठली आणि अपघातात मृत्यू झालेल्या शिवसैनिकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली. शिवाय जखमींची विचारपूस केली.
विवेक तेली आणि सहकारी काल सांगलीहून मुंबईकडे दसरा मेळाव्यासाठी निघाले होते. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईला निघालेल्या शिवसैनिकांच्या गाडीचा मंगळवारी पहाटेच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू तर चौघे जण जखमी झाले. अपघाताची माहिती समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, सचिव किरण साळी यांनी मुंबईतील दसरा मेळावा सोडून तातडीने कवठेमहांकाळला येऊन मृत विवेक तेलीच्या कुटुंबाचे सांत्वन करत आर्थिक मदत केली.
टँकरचालकावर कारवाईची मागणी
यावेळी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांशीही चर्चा करून ज्या टँकरने शिवसैनिकाच्या गाडीला धडक दिली त्या टँकर चालकास लवकरात लवकर अटक करण्याच्या सूचनाही दिल्या. त्याचबरोबर सांगलीतील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या जखमी शिवसैनिकांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीचीही चौकशी करण्यात आली. यावेळी मिलिंद कदम, रोहन जाधव, ठाणे विस्तारक नितीन लांडगे, युवासेना सांगली जिल्हाप्रमुख सचिन कांबळे, मिरज विधानसभा युवा सेना क्षेत्राध्यक्ष महादेव सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
दसरा मेळाव्यासाठी मुंबईला निघालेल्या शिवसैनिकांच्या गाडीचा अपघात
दरम्यान, मंगळवारी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईला निघालेल्या शिवसैनिकांच्या गाडीचा पहाटेच्या सुमारास अपघात झाला. अपघातात एक ठार तर चौघे जण जखमी झाले. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातून जाणाऱ्या रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील शिरढोण गावाजवळ ही घटना घडली.रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कवठेमहांकाळ हद्दीमध्ये दूध वाहतूक करणाऱ्या टँकरची चार चाकी वाहनाला पाठीमागून जोराची धडक दिल्याने अपघात घडला.
विवेक सुरेश तेली (वय 42, रा. विद्यानगर कवठेमहांकाळ) असे ठार झालेल्याचे नाव असून महेश शिवाजी सूर्यवंशी (वय 30, रा. कवठेमहांकाळ, संदीप शिंत्रे (वय 40), सुभाष कूनुरे (वय 55) दोघे रा. हिंगणगाव ता.कवठे महांकाळ, प्रसाद सूर्यवंशी रा. कवठे महांकाळ अशी जखमींची नावे आहेत हा अपघात पहाटे साडेचार वाजण्याच्या दरम्यान घडला. याची नोंद कवठेमहांकाळ पोलीसात झाली आहे.
संबंधित बातम्या
Sangli Accident: दसरा मेळाव्यासाठी निघालेल्या शिंदे गटाच्या शिवसैनिकांचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू, तिघे जखमी
Shahapur Bus Accident : दसरा मेळाव्याहून परतणाऱ्या शिंदे गटाच्या शिवसैनिकांच्या तीन बसचा भीषण अपघात, 25 जण जखमी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)