एक्स्प्लोर
Advertisement
Shahapur Bus Accident : दसरा मेळाव्याहून परतणाऱ्या शिंदे गटाच्या शिवसैनिकांच्या तीन बसचा भीषण अपघात, 25 जण जखमी
Shahapur Bus Accident : दसरा मेळावा आटोपून आपापल्या गावी परतणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या तीन बसचा भीषण अपघात झाला आहे.
Shahapur Bus Accident : दसरा मेळावा (Dasara Melava) आटोपून आपापल्या गावी परतणाऱ्या शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाच्या (Shinde Group Shivsainik) कार्यकर्त्यांच्या तीन बसचा भीषण अपघात (Bus Accident) झाला आहे. दसरा मेळाव्यानंतर (Shinde Dasara Melava) आपापल्या गावी परतणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांचा मुंबई-आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra Higway) शहापूर जवळ विचित्र असा भीषण अपघात झाला आहे. मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारासची ही घटना असून यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी (Traffic Jam) ही झाल्याचं बघायला मिळत आहे.
भीषण अपघातात 25 जण जखमी
दसरा मेळाव्यावरून परतणाऱ्या शिंदे गटाच्या तीन बसचा शहापूरजवळ कळंभे गावाजवळ अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात 25 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. शिंदे गटाचे शिवसैनिक मुंबईहून सिल्लोडला जात असताना हा भीषण अपघाथ घडला. एका बसला ट्रकने मागून धडक दिली, त्याच वेळी धडक देणाऱ्या ट्रकला पाठी मागून येणाऱ्या दुसऱ्या बसने मागून धडक दिल्याने बस पलटी झाली. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस शहापूर केंद्राचे कर्मचारी, शहापूर पोलीस मदतीला घटनास्थळी दाखल झाले. सध्या जखमींवर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नेमका अपघात कसा झाला?
एक ट्रक आणि मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या सिल्लोड (Sillod) - सोयगाव (Soygaon) विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते प्रवास करत असलेल्या परिवहन महामंडळाच्या बसमध्ये अपघात झाला. त्यानंतर मागून येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या इतर दोन बसेसही एकमेकांवर धडकल्या. यात ट्रक आणि एक बस थेट उड्डाणपुलावरील साईड डिव्हायडर तोडून उड्डाणपुलाखालील रस्त्यावर कोसळल्या तर, इतर दोन बसचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. रस्त्यावर काचांचा खच पडला आहे. या विचित्र अपघातात अनेक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून काहींना गंभीर इजाही पोहोचली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य आणि वाहने हटवण्याचे काम केलं जातं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement