एक्स्प्लोर

OBC Mahaelgar Melava : सांगलीत आज ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळावा, सभेआधीच प्रकाश शेंडगेंची मनोज जरांगेंवर जोरदार टीका; म्हणाले...

OBC Mahaelgar Melava : एकीकडे मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली सुरू आहे. तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रमधीलच सांगली जिल्ह्यात आज दुपारी ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळावा पार पडणार आहे.

सांगली : पश्चिम महाराष्ट्रात एकीकडे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची शांतता रॅली सुरू आहे. तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रमधीलच सांगली जिल्ह्यात आज दुपारी ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळावा (OBC Mahaelgar Melava) पार पडणार आहे.  या मेळाव्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून लाखो ओबीसी (OBC) बांधव सहभागी होणार आहेत.

या मेळाव्यास मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), पंकजा मुंडे (Pankaja Munde), प्रकाश शेंडगे (Prakash Shendge),  गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar), लक्ष्मण हाके (Laxman Hake) उपस्थित राहणार आहेत. या सभेतून छगन भुजबळ नेमकं काय बोलणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

प्रकाश शेंडगेंची मनोज जरांगेंवर टीका

सांगली येथील तरुण भारत स्टेडियम येथे दुपारी 2 वाजता हा मेळावा सुरू होणार आहे. मनोज जरांगेंची मराठा आरक्षण ओबीसीमधून मिळण्याची मागणी घटनेला धरून नाही. तसेच जरांगे दररोज आपल्या नवनवीन मागण्या बदलत गेल्यामुळे मराठा आंदोलनाची दिशा भरकटली आहे, असे ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी म्हटले आहे. तसेच मनोज जरांगेंनी विधानसभेत उमेदवार दिले तर ओबीसी देखील आपली ताकद दाखवून जे ओबीसी आरक्षणाला विरोध करतील त्यांना पाडण्याचं काम करेल आणि याची ट्रायल लोकसभेमध्ये झालेय, असं प्रकाश शेंडगे यांनी म्हटले आहे. आजच्या ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळाव्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

जरांगेंची शांतता रॅली आज पुण्यात

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) हे राज्यभरात जनजागृती शांतता फेरी काढत आहेत. सोलापूर आणि सांगलीनंतर आज (रविवारी) ही फेरी पुण्यात दाखल होणार आहे. त्या निमित्ताने स्वागताची मोठी तयारी करण्यात आली आहे. मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange) यांच्या उपस्थितीत फेरी काढण्यात येणार आहे. यामुळे पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहे. जरांगेंच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर शनिपार चौक ते कुमठेकर रस्ता, बेलबाग चौक ते लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, रमणबाग प्रशाला ते अप्पा बळवंत चौक, बुधवार चौक ते अप्पा बळवंत चैाक, जयंतराव टिळक पूल ते शनिवारवाडा, कुंभारवेस चौक ते गाडगीळ पुतळा, मंगला चित्रपटगृह ते प्रीमियर गॅरेज शिवाजी पुतळा चौक ते शिवाजीनगर न्यायालय, रेव्हेन्यू कॉलनी ते मॉडर्न चौक, झाशीची राणी पुतळा चौक ते सावरकर भवन, महात्मा फुले संग्रहालय ते झाशीची राणी पुतळा चौक या मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

Prakash Shendge : आगामी विधानसभा निवडणूक मराठा विरुद्ध ओबीसी अशी होणार, ती आम्हीच जिंकणार : प्रकाश शेंडगे

Prakash Shendge: 57 लाख बोगस कुणबी नोंदी रद्द करा, सगेसोयरेंच्या जीआरला विरोध; ओबीसी नेत्यांच्या बैठकीत विधानसभेच्या 288 जागा लढवण्याचा ठराव

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'ओ अनिलबाबू....चार वर्षांपूर्वीची घटना नाही, ते तुमचे कर्म', अनिल देशमुखांवर भाजपचा हल्लाबोल
'ओ अनिलबाबू....चार वर्षांपूर्वीची घटना नाही, ते तुमचे कर्म', अनिल देशमुखांवर भाजपचा हल्लाबोल
Amol Mitkari: महायुतीत खटका... ''आजच्या घटनेमुळे शिंदे गट बदनाम झालाय''; अमोल मिटकरींची शिवसेनेला इशारा
महायुतीत खटका... ''आजच्या घटनेमुळे शिंदे गट बदनाम झालाय''; अमोल मिटकरींची शिवसेनेला इशारा
Vegan Leather : नांदेड विद्यापीठाने लावला शाकाहारी चामडीचा शोध; नेमकं काय आहे विगन लेदर?
नांदेड विद्यापीठाने लावला शाकाहारी चामडीचा शोध; नेमकं काय आहे विगन लेदर?
Flower Market: महालक्ष्मी गणपतीसाठी फुलबाजारात तेजी, झेंडूसह फुलांना किलोमागे किती रुपये द्यावे लागताहेत?
महालक्ष्मी गणपतीसाठी फुलबाजारात तेजी, झेंडूसह फुलांना किलोमागे किती रुपये द्यावे लागताहेत?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Thane : Ladki Bahin : मुख्यमंत्र्यांकडून 'लाडकी बहीण योजनेच्या' लाभार्थींना भेटNagpur Sanket Bawankule News : नागपूर अपघात प्रकरण; अपघातानंतर कारसह तिघांनी केलं पलायनBaramati News : पोलिसांनी शिवसेनेच्या सुरेंद्र जेवरे यांना घेतलं ताब्यात, नेमकं प्रकरण काय?CM Shinde : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना भेटतायेत मुख्यमंत्री, किसन नगर भागात शिंदेंचा दौरा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'ओ अनिलबाबू....चार वर्षांपूर्वीची घटना नाही, ते तुमचे कर्म', अनिल देशमुखांवर भाजपचा हल्लाबोल
'ओ अनिलबाबू....चार वर्षांपूर्वीची घटना नाही, ते तुमचे कर्म', अनिल देशमुखांवर भाजपचा हल्लाबोल
Amol Mitkari: महायुतीत खटका... ''आजच्या घटनेमुळे शिंदे गट बदनाम झालाय''; अमोल मिटकरींची शिवसेनेला इशारा
महायुतीत खटका... ''आजच्या घटनेमुळे शिंदे गट बदनाम झालाय''; अमोल मिटकरींची शिवसेनेला इशारा
Vegan Leather : नांदेड विद्यापीठाने लावला शाकाहारी चामडीचा शोध; नेमकं काय आहे विगन लेदर?
नांदेड विद्यापीठाने लावला शाकाहारी चामडीचा शोध; नेमकं काय आहे विगन लेदर?
Flower Market: महालक्ष्मी गणपतीसाठी फुलबाजारात तेजी, झेंडूसह फुलांना किलोमागे किती रुपये द्यावे लागताहेत?
महालक्ष्मी गणपतीसाठी फुलबाजारात तेजी, झेंडूसह फुलांना किलोमागे किती रुपये द्यावे लागताहेत?
Nanded: काँग्रेसकडून उमेदवार ठरला! नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणूकीत  दिवंगत वसंत चव्हाणांच्या चिरंजीवाचीच शिफारस
काँग्रेसकडून उमेदवार ठरला! नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणूकीत दिवंगत वसंत चव्हाणांच्या चिरंजीवाचीच शिफारस
'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने'चे सुधारित निकष, GR निघाला, 31 ऑक्टोबरपर्यंतच मुदत; असा करा अर्ज
'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने'चे सुधारित निकष, GR निघाला, 31 ऑक्टोबरपर्यंतच मुदत; असा करा अर्ज
ठाकरेंना दे धक्का! मराठवाड्यातील माजी आमदार साथ सोडणार; विधानसभेपूर्वीच घेतला निर्णय
ठाकरेंना दे धक्का! मराठवाड्यातील माजी आमदार साथ सोडणार; विधानसभेपूर्वीच घेतला निर्णय
Eknath Khadse: माझ्या भाजप प्रवेशाला दिल्लीचा हिरवा कंदील पण राज्यातील नेत्यांचा विरोध, एकनाथ खडसेंनी सांगितलं वाट रोखणाऱ्या नेत्यावर म्हणाले..
माझ्या भाजप प्रवेशाला दिल्लीचा हिरवा कंदील पण राज्यातील नेत्यांचा विरोध, एकनाथ खडसेंनी सांगितलं वाट रोखणाऱ्या नेत्यावर म्हणाले..
Embed widget