एक्स्प्लोर

Jayant Patil : जयंत पाटलांनी इस्लामपूर आगारात एसटी चालवली अन् भाजपची सटकली! थेट पोलिसांकडे तक्रार दाखल

इस्लामपूर तहसील कार्यालयात स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्यासाठी आलेल्या आमदार जयंत पाटील यांनी इस्लामपूर आगाराची एसटी बस चालवली होती. यानंतर इस्लामपूर भाजप पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे.

Jayant Patil : इस्लामपूर तहसील कार्यालयात स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्यासाठी आलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी इस्लामपूर आगाराची एसटी बस चालवली होती. यानंतर इस्लामपूर भाजप पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. बेकायदेशीर एसटी बस चालवल्याप्रकरणी जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा याबाबत भाजप नेत्यांनी इस्लामपूर पोलिसात तक्रार दिली आहे. 

एसटी चालवण्याचा कोणताही अनुभव नसताना, किंवा जड वाहन चालक म्हणून आवश्यक असणाऱ्या परवाना किंवा, बॅच बिल्ला नसताना जड वाहन बेकायदेशीरित्या जयंत पाटील यांनी चालवलं असा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

जयंत पाटील यांनी इस्लामपूर आगाराची सजवलेली बस शहरातून स्वत: चालविली. त्याचे व्हिडिओ व फोटो सर्वत्र व्हायरल झाले. मात्र, इस्लामपूर भाजपने यावर आक्षेप घेत जयंत पाटील यांनी स्वत: प्रसिध्दीसाठी व कोणताही अनुभव नसताना बेकायदेशीर बस चालविली असून त्यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशीकांत चव्हाण यांच्याकडे केली.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरा होत असताना इस्लामपूर शहरातही नागरिकांची मोठी गर्दी होती. जयंत पाटील हे प्रसिध्दीसाठी वेगवेगळे प्रयोग करत असतात, बस चालविण्याचा प्रयोग हा बेजबाबदारपणाचे लक्षण असून त्यांच्याकडे बस चालविण्याचा कोणताही अनुभव नाही, दुर्दैवाने काही घटना घडली असती, तर मोठे नुकसान झाले असते. पोलिसांनी राजकीय दबावाला बळी न पडता लोकशाहीचा सन्मान करत गुन्हा दाखल करावा अशी मागणी वाळवा तालुका भाजपाचे अध्यक्ष धैर्यशील मोरे यांनी केली.

गुन्हा दाखल झाला ना,ही तर संपुर्ण इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्ते व नागरिक पोलिस ठाण्यावर मोर्चा काढतील असा इशाराही मोरे यांनी दिला.

जयंत पाटील यांची महाराष्ट्र राज्य परीवहन मंडळाकडे चालक म्हणुन नियुक्ती नाही. त्यांच्याकडे आरटीओ या सक्षम अधिकार्‍यांचे बस चालविण्याचा बॅच बिल्ला नसताना, जड वहान चालक म्हणुन आवश्यक असणारे लायसन्स नसताना इस्लामपूर शहरातून बस चालविली गेली. शहरात गर्दी होती, दुर्घटना घडली असती, तर मोठे नुकसान झाले असते, सरकारी व सार्वजनिक वापराचे वहान चालविणे ही गंभीर बाब आहे. हे लक्षात घेऊन 3/180, 5/181 या कलमातंर्गत गुन्हा दाखल करावा व चौकशी अंती इतर योग्य कलमातंर्गत गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी भाजपकडून निवेदनात केली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Citizens Residing Illegally In US : ट्र्रम्प सरकार 18 हजार अवैध भारतीयांना हद्दपार करणार; व्यापार युद्धाच्या भीतीने केंद्र सरकारचा सुद्धा मोठा निर्णय!
ट्र्रम्प सरकार 18 हजार अवैध भारतीयांना हद्दपार करणार; व्यापार युद्धाच्या भीतीने केंद्र सरकारचा सुद्धा मोठा निर्णय!
वाल्मिक कराडची कोठडी संपली, कोर्टात पुन्हा हजेरी; सुरक्षेच्या कारणामुळे पोलीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
वाल्मिक कराडची कोठडी संपली, कोर्टात पुन्हा हजेरी; सुरक्षेच्या कारणामुळे पोलीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Jaykumar Gore: 'सगळ्याची औषधे सगळ्याकडे असतात...',पालकमंत्री होताच जयकुमार गोरेंचा अप्रत्यक्षपणे मोहिते पाटलांना गर्भित इशारा, नेमकं काय म्हणाले?
'सगळ्याची औषधे सगळ्याकडे असतात...',पालकमंत्री होताच जयकुमार गोरेंचा अप्रत्यक्षपणे मोहिते पाटलांना गर्भित इशारा, नेमकं काय म्हणाले?
Virginity Test on Honeymoon : 'सुहागरात्री सासरच्यांनी माझी व्हर्जिनिटी तपासली, अमानवी मार्गांचा वापर केला', विवाहित तरुणीनं पोलिस स्टेशन गाठलं अन्....
'सुहागरात्री सासरच्यांनी माझी व्हर्जिनिटी तपासली, अमानवी मार्गांचा वापर केला', विवाहित तरुणीनं पोलिस स्टेशन गाठलं अन्....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil : दुर्लक्ष करा जरा,गाड्या चालू द्या; वाळू माफियांना अप्रत्यक्ष अभय?Uday Samant on Shivsena : एकनाथ शिंदे पु्न्हा ठाकरेंना धक्का देणार? उदय सामंतांचा सर्वात मोठा दावाWalmik Kard Wife Property : बीडच्या मांजरसुंबा इथे कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावे 9 एकर जमीनABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 22 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Citizens Residing Illegally In US : ट्र्रम्प सरकार 18 हजार अवैध भारतीयांना हद्दपार करणार; व्यापार युद्धाच्या भीतीने केंद्र सरकारचा सुद्धा मोठा निर्णय!
ट्र्रम्प सरकार 18 हजार अवैध भारतीयांना हद्दपार करणार; व्यापार युद्धाच्या भीतीने केंद्र सरकारचा सुद्धा मोठा निर्णय!
वाल्मिक कराडची कोठडी संपली, कोर्टात पुन्हा हजेरी; सुरक्षेच्या कारणामुळे पोलीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
वाल्मिक कराडची कोठडी संपली, कोर्टात पुन्हा हजेरी; सुरक्षेच्या कारणामुळे पोलीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Jaykumar Gore: 'सगळ्याची औषधे सगळ्याकडे असतात...',पालकमंत्री होताच जयकुमार गोरेंचा अप्रत्यक्षपणे मोहिते पाटलांना गर्भित इशारा, नेमकं काय म्हणाले?
'सगळ्याची औषधे सगळ्याकडे असतात...',पालकमंत्री होताच जयकुमार गोरेंचा अप्रत्यक्षपणे मोहिते पाटलांना गर्भित इशारा, नेमकं काय म्हणाले?
Virginity Test on Honeymoon : 'सुहागरात्री सासरच्यांनी माझी व्हर्जिनिटी तपासली, अमानवी मार्गांचा वापर केला', विवाहित तरुणीनं पोलिस स्टेशन गाठलं अन्....
'सुहागरात्री सासरच्यांनी माझी व्हर्जिनिटी तपासली, अमानवी मार्गांचा वापर केला', विवाहित तरुणीनं पोलिस स्टेशन गाठलं अन्....
Mahakumbh Mela 2025 Fire Tragedy : खलिस्तानी संघटनेचा दावा, महाकुंभात स्फोट घडवून आणला, ईमेल पाठवून घेतली जबाबदारी; म्हणाले, हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला
खलिस्तानी संघटनेचा दावा, महाकुंभात स्फोट घडवून आणला, ईमेल पाठवून घेतली जबाबदारी; म्हणाले, हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला
Bengaluru Crime: बंगळुरुच्या के आर मार्केटमध्ये धक्कादायक घटना, बसची वाट पाहणाऱ्या महिलेवर सामूहिक अत्याचार, दोघांना अटक
बसची वाट पाहणाऱ्या महिलेला फसवून आडोशाला नेलं, अंधार सामूहिक अत्याचार, बंगळुरु हादरलं
Radhakrishna Vikhe Patil: काल कृषीमंत्री म्हणाले योजनेत दोन-चार टक्के भ्रष्टाचार चालतो, आता विखे-पाटील म्हणतात वाळूचे ट्रक आपल्याच लोकांचे, नव्या वादाला तोंड फुटलं
काल कृषीमंत्री म्हणाले योजनेत दोन-चार टक्के भ्रष्टाचार चालतो, आता विखे-पाटील म्हणतात वाळूचे ट्रक आपल्याच लोकांचे, नव्या वादाला तोंड फुटलं
Justice Krishna S Dixit on Constitution : कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणाले, संविधान निर्मितीत ब्राह्मणांचे योगदान; रामाची पूजा करत आलो आहोत, त्यांची मूल्ये राज्यघटनेत समाविष्ट
कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणाले, संविधान निर्मितीत ब्राह्मणांचे योगदान; रामाची पूजा करत आलो आहोत, त्यांची मूल्ये राज्यघटनेत समाविष्ट
Embed widget