एक्स्प्लोर

Maratha OBC Reservation: विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळांना पाडण्याची भाषा केलीत तर आम्ही 160 मराठा आमदार पाडू; प्रकाश शेंडगेंचा मनोज जरांगेंना इशारा

Maharashtra Assembly Elections 2024: राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी सांगली जिल्ह्यात ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळावा पार पडला. प्रकाश शेंडगेंची जरांगे पाटलांवर टीका.

सांगली: आगामी विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील हे छगन भुजबळ यांना पाडण्याची भाषा करणार असतील तर ओबीसी समाजदेखील राज्यभरात मराठा आमदारांना पाडण्याची भूमिका घेईल, असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी दिला. ते रविवारी सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी  आरक्षण बचाव महाएल्गार मेळाव्याच्या (OBC Maha elgar Melava) व्यासपीठावरुन बोलत होते. यावेळी प्रकाश शेंडगे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भुजबळांवरील टीकेला प्रत्युत्तर दिले. जर भुजबळ यांना पाडण्याची भाषा केली जात असेल तर 160 मराठा आमदार पाडण्याची भूमिका ओबीसी समाजाने घेतली आहे. सरकारने सगेसोयरेचा जीआर काढला तर  सरकारचे सर्व आमदार पाडू. राज्य सरकारने नव्याने वाटप करण्यात आलेले  कुणबी दाखले रद्द करावेत, अशी मागणी प्रकाश शेंडगे यांनी केली.

ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण गेले आहेच. आता राहिलेल्या आरक्षणावरही डल्ला मारण्याचा प्रयत्न केला जातो आहे. मनोज जरांगे शिवीगाळ करतात, शिव्याचा उगम भटक्या वस्त्यावाड्यांवर होतो. मनोज जरांगे दररोज नवनवीन मागण्या करत आहेत. मनोज जरांगे यांनी ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षणाचा अट्टहास केला तर मात्र आमचा विरोध कायम असेल, असे प्रकाश शेंडगे यांनी म्हटले. शेंडगे यांच्या या टीकेला आता मनोज जरांगे काय प्रत्युत्तर देतात, हे पाहावे लागेल. मनोज जरांगे सध्या मराठा शांतता रॅलीच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सांगलीत पार पडलेल्या ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळाव्यासाठी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), पंकजा मुंडे (Pankaja Munde), प्रकाश शेंडगे (Prakash Shendge),  गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar), लक्ष्मण हाके (Laxman Hake) आदी नेते उपस्थित होते.

मनोज जरांगे पाटील दररोज आपल्या नवनवीन मागण्या बदलत गेल्यामुळे मराठा आंदोलनाची दिशा भरकटली आहे. मनोज जरांगेंनी विधानसभेत उमेदवार दिले तर ओबीसी देखील आपली ताकद दाखवून जे ओबीसी आरक्षणाला विरोध करतील त्यांना पाडण्याचं काम करेल , याची ट्रायल लोकसभा निवडणुकीत झाली आहे, असेही प्रकाश शेंडगे यांनी म्हटले होते.

मनोज जरांगे यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार

मनोज जरांगे पाटील यांना रविवारी पुण्यातील शांतता रॅलीनंतर भोवळ आली होती. यानंतर त्यांना उपचारासाठी सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर कालपासून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ते सकाळी 11 च्या सुमारास अहिल्यानगरकडे रवाना होतील.

आणखी वाचा

मराठ्यांत माझ्यासकट 150 उमेदवार आहेत, मनोज जरांगेंनी शड्डू ठोकला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Multibagger Stock : 50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...

व्हिडीओ

Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance  : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Multibagger Stock : 50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
Embed widget