एक्स्प्लोर

Rajat Patidar : विराट कोहलीसाठी जिंकणार, रजत पाटीदारनं शब्द दिला अन् पूर्ण केला, आरसीबीचं IPL विजेतेपदाचं स्वप्न अखेर पूर्ण

IPL 2025 : विराट कोहलीसाठी आयपीएल जिंकणार असा शब्द देऊन तो पूर्ण करुन दाखवण्याची कामगिरी रजत पाटीदारनं करुन दाखवलं

IPL 2025 Final RCB vs PBKS  : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्ज यांच्यात गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र स्टेडियमवर आयपीएलच्या 18 व्या हंगामाची फायनल पार पडली. आरसीबीनं पंजाब किंग्जला 6 धावांनी पराभूत करत 18 व्या आयपीएलचं विजेतेपद मिळवलं.  आरसीबीच्या विजयामुळ विराट कोहलीला आनंदाश्रू अनावर झाले. आरसीबीच्या विजेतेपदाचा शिलेदार आणि नेता म्हणून रजत पाटीदारची कामगिरी देखील महत्त्वाची ठरली. रजत पाटीदार यानं विराट कोहलीसाठी आयपीएलचं विजेतेपद मिळवणार असं म्हटलं होतं. ते त्यानं सांघिक कामगिरीच्या जोरावर करुन दाखवलं. 

रजत पाटीदार आरसीबीच्या विजयाचा नेता

रजत पाटीदारनं यंदा पहिल्या हंगामात आरसीबीचं नेतृत्त्व केलं. रजत पाटीदार काही सामन्यांमध्ये खेळला नव्हता मात्र क्वालिफायर आणि फायनलमध्ये रजत पाटीदारनं संघाचं नेतृत्त्व केलं. रजत पाटीदारनं आजच्या मॅचमध्ये वेळोवेळी गोलंदाजीमध्ये बदल करत पंजाबच्या फलंदाजांना खेळपट्टीवर जम बसवू दिला नाही. रजत पाटीदारनं स्पिन गोलंदाजी आणि वेगवान गोलंदाजी याचा योग्य पद्धतीनं वापर केला. 

रोमारिओ शेफर्डला गोलंदाजी देण्याचा निर्णय गेमचेंजर ठरला

पंजाब किंग्जचा कॅप्टन श्रेयस अय्यर चांगल्या फॉर्ममध्ये होता. गेल्या मॅचमध्ये त्यानं नाबाद 87 धावांची खेळी केली होती.  जोश हेझलवूडला गोलंदाजी मिळेल अशी शक्यता असताना रजत पाटीदारनं रोमारिओ शेफर्डला गोलंदाजी दिली आणि त्यानं श्रेयस अय्यरला 1 रनवर बाद केलं पंजाबच्या हातून मॅच निसटली. कृणाल पांड्याचा देखील रजत पाटीदारनं प्रभावी वापर केला. कृणाल पांड्यानं प्रभासिमरन सिंह आणि जोश इंग्लिसला बाद करत आरसीबीच्या विजयाच्या दिशेनं वाटचाल केलं.  

रजत पाटीदारनं शब्द खरा केला

रजत पाटीदार आयपीएल फायनल पूर्वी पत्रकार परिषदेत आम्ही प्रयत्न करु आणि विराट कोहलीसाठी जिंकू असं म्हटलं.  टीम इंडिया आणि आरसीबीसाठी त्यानं अनेक वर्ष खूप योगदान दिलं आहे, त्याच्यासाठी आयपीएल विजेतेपद मिळवायचं असं रजत पाटीदार म्हणाला होता. त्यानं त्याचा शब्द पूर्ण केला.  

 श्रेयस अय्यरननं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  आरसीबीनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 9 बाद 190 धावा केल्या.  विराट कोहलीनं आरसीबीसाठी सर्वाधिक 43 धावा केल्या. फिल सॉल्ट 16 धावा करुन बाद  झाला. विराट कोहलीनं मयंक अग्रवाल सोबत 38 धावांची भागीदारी केली.  मयंक अग्रवाल 24 धावा केल्या.  यानंतर आऱसीबीचा कॅप्टन रजत पाटीदार 26  धावा करुन बाद झाला. विराट सोबत त्यानं 40 धावांची भागीदारी केली.  विराट कोहलीला आझमतुल्लाह ओमरझाईनं बाद केलं. विराटनं 35 बॉलमध्ये 43 धावा केल्या. लियाम लिविंगस्टोननं 25 धावा केल्या.  जितेश शर्मानं 24 धावा केल्या.  अर्शदीप सिंह नं आरसीबीला 200 धावांच्या पार जाण्यापासून रोखलं. त्यानं शेवटच्या ओव्हरमध्ये तीन धावा देत तीन विकेट घेतल्या. रोमारियो शेफर्डनं 17  धावा  केल्या.  कुणाल पांड्यानं 4 धावा आणि भुवनेश्वर कुमारनं 1 रन केली. अर्शदीप सिंह आणि काइल जेमिसन या दोघांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. ओमरझाई, युजवेंद्र चहल  आणि विजयकुमार व्यशकनं एक विकेट घेतली. 

पंजाब किंग्जचा 6 धावांनी पराभव, शशांकची एकाकी झुंज

प्रियांश आर्या आणि प्रभासिमरन सिंग या दोघांनी 190 धावांचा पाठलाग करताना सावध सुरुवात केली होती. मात्र, अनावश्यक फटके मारत पंजाब किंग्जचे फलंदाज बाद झाले. फिल सॉल्टनं प्रियांश आर्याचा अप्रतिम कॅच घेतला. प्रियांश आर्यानं 24 धावा केल्या, प्रभासिमरन सिंगनं 26 धावा केल्या. जोश इंग्लिसनं 39 धावा केल्या. तर, शशांक सिंगनं नाबाद 61 धावा केल्या.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 

व्हिडीओ

Jayant Patil Sangli : भाजप नेते अन् Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीत वाद, जयंत पाटील काय म्हणाले?
Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
Embed widget