Palghar Chemical Tanker Accident : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर केमिकल वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात
Palghar Chemical Tanker Accident : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर केमिकल वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघातमुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर केमिकल वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात . पालघरच्या मेंढवण घाटा जवळ अपघात . टँकर मधून मोठ्या प्रमाणावर धूर निघू लागल्याने स्थानिकांमध्ये भीतीच वातावरण . जवळच नागरी वस्ती असल्याने नागरिक भीतीच्या छायेखाली . अपघातग्रस्त टॅंकर मधून केमिकल खुलेआम दुसऱ्या टँकरमध्ये भरलं जात असताना धुराचे लोळ . योग्य खबरदारी घेतली जात नसल्याचा स्थानिकांचा आरोप .
हे ही वाचा..
: मुंबई उपनगरातील घाटकोपर परिसरात असणाऱ्या नामांकित मॉलमध्ये सोमवारी सकाळी एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना घडली. मृत व्यक्तीचे नाव दीपक जोशी (वय 38) असे होते. दीपकने नामांकित मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. या घटनेनंतर पार्कसाईट (Parksite) पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करुन दीपकचा मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणाचा पुढील तपास सध्या पोलिसांकडून सुरु आहे.
या मॉलमध्ये सोमवारी सकाळी घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. दीपक दोशी तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडल्यानंतर त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. हे दृश्य पाहून मॉलमधील दुकानदार आणि ग्राहकांना धक्का बसला. या घटनेवेळी मॉलमध्ये उपस्थित असणाऱ्या प्रत्यदर्शीने 'मिड-डे'ला सांगितले की, सकाळी 11.30 च्या सुमारास या मॉलच्या मुख्य लॉबीमध्ये अचानक स्फोट झाल्यासारखा आवाज आला. त्यामुळे लोक प्रचंड घाबरले. मात्र, थोड्यावेळातच सगळा प्रकार लक्षात आला. आम्हाला लॉबीत एक तरुण जमिनीवर पडलेला दिसला. त्या तरुणाचं डोकं फुटलं होतं आणि त्यामधून रक्तस्राव सुरु होता. त्यानंतर पोलिसांनी येऊन त्याचा मृतदेह ताब्यात घेतला, अशी माहिती या प्रत्यक्षदर्शी तरुणाने दिली.























