ट्रम्पचा एक फोन येताच मोदींनी जी हुजूर शरणागती पत्करली, भाजप आरएसएसचा हाच इतिहास, स्वातंत्र्यांपासून यांना शरणागतीची चिट्टी लिहिण्याची सवय; राहुल गांधींचा हल्लाबोल
Rahul Gandhi on PM Modi : राहुल म्हणाले की ट्रम्प यांनी फोन केला आणि नरेंद्रजींनी लगेच आत्मसमर्पण केले. ते म्हणाले की, इतिहास साक्षी आहे, भाजप-आरएसएसचे हे चारित्र्य आहे. ते नेहमीच झुकतात

Rahul Gandhi on PM Modi : मंगळवारी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये राहुल गांधी यांनी ऑपरेशन सिंदूर आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. राहुल म्हणाले की ट्रम्प यांनी फोन केला आणि नरेंद्रजींनी लगेच आत्मसमर्पण केले. ते म्हणाले की, "इतिहास साक्षी आहे, भाजप-आरएसएसचे हे चारित्र्य आहे. ते नेहमीच झुकतात. अमेरिकेच्या धमकीनंतरही भारताने 1971 मध्ये पाकिस्तान तोडला. काँग्रेसचे बब्बर शेर आणि सिंहीणी महासत्तेविरुद्ध लढतात, कधीही झुकत नाहीत."
राहुल यांनी इंदिरा गांधी यांना पुष्पांजली वाहिली. राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यालयाबाहेर माजी पंतप्रधान आणि त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांना पुष्पांजली वाहिली. यावेळी त्यांनी बूट घातले होते. यावर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी राहुल गांधींवर टीका केली. ते म्हणाले की, राहुल गांधींनी आजी इंदिरा गांधींना पुष्पांजली वाहताना त्यांचे बूट काढले नाहीत. हे आपल्या संस्कृतीच्या विरुद्ध आहे. त्यांनी थोडी. तरी सावधगिरी बाळगली पाहिजे.
ट्रंप का एक फोन आया और नरेंद्र जी तुरंत surrender हो गए - इतिहास गवाह है, यही BJP-RSS का character है, ये हमेशा झुकते हैं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 3, 2025
भारत ने 1971 में अमेरिका की धमकी के बावजूद पाकिस्तान को तोड़ा था। कांग्रेस के बब्बर शेर और शेरनियां Superpowers से लड़ते हैं, कभी झुकते नहीं। pic.twitter.com/RhdQWdRBtV
राहुल गांधी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर
राहुल गांधी मंगळवारी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर होते. त्यांनी संघटना निर्मिती मोहीम सुरू केली. ही मोहीम राज्यात 10 जून ते 30 जूनपर्यंत चालेल. राहुल गांधी यांनी सहा तासांत चार वेगवेगळ्या सभा घेतल्या. राहुल गांधींनी कार्यकर्त्यांना सांगितले की, "घोडे तीन प्रकारचे असतात. शर्यतीचा घोडा, लग्नाचा घोडा आणि लंगडा घोडा. शर्यतीचा घोडा धावतो आणि पुढे जातो. लग्नाचा घोडा फक्त लग्नापर्यंत चालू शकतो. तिसरा घोडा लंगडा आहे ज्याचा काही उपयोग नाही. आपल्याला शर्यतीचा घोडा बनायचे आहे. आपल्याला धावायचे आहे आणि पुढे जायचे आहे." यावर भाजप प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्मा यांनी खिल्ली उडवली की गाढवांच्या मेळाव्यात घोड्यांची चर्चा कशी झाली. मध्य प्रदेशातील लोकांना जाणून घ्यायचे आहे की शर्यतीचा घोडा कोण आहे आणि लग्नाचा घोडा कोण आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























