एक्स्प्लोर

MI vs PBKS IPL 2025: श्रेयसचा आत्मविश्वास, मुंबई खल्लास

MI vs PBKS IPL 2025: "आम्ही लढाई हरलो आहोत,युद्ध नाही" हे उद्गार होते कर्णधार श्रेयस याचे....बंगळूर विरुद्ध पराभव झाल्याने तो जखमी होता हे उघड होते...पण त्याचा आत्मविश्वास कुठे ही कमी झाला नव्हता.,.त्याची देहबोली ...आणि त्याची डौलदार चाल आहे तशीच होती. लिडरशिप वर व्याख्यान देताना सोनू शर्मा मोटिवेशनल स्पीकर एकदा म्हणाले होते की जंगलात हत्ती सगळ्यात मोठा प्राणी .उंच जिराफ. मग सिंह जंगलाचा राजा का? तर फक्त अटीटूड आणि बिलीफ ,सिस्टीम. सिंहाला असे वाटते की मी हत्तीला मारून टाकेल... त्याला असे वाटल्यावर मी हे करू शकतो याप्रमाणे त्याची होणारी कृती त्याला जंगलाचा राजा बनवते..श्रेयस हा आयपीएलच्या जंगलातील सिंह आहे... तीन वेगवेगळ्या फ्रॅंचाईजी मधून अंतिम फेरी खेळणारा तो एकमेव कर्णधार आहे...तो भले पंजाब कडून खेळत असेल पण त्याची ओरिजनल डीएनए मुंबई क्रिकेटचा आहे. कधीही हार न मानण्याची वृत्ती त्याला मुंबई क्रिकेटने दिलेली आहे.

काल सुद्धा महत्त्वाच्या सामन्यात नाणेफेक जिंकून त्याने मुंबईच्या तगडे गोलंदाजी समोर पाठलाग स्वीकारला..ही गोष्ट सोपी नाही आहे...पण त्याच्यातील आत्मविश्वास ,तो निर्णय घेतो आणि मग तो निर्णय बरोबर आहे हे सिद्ध करतो..
रोहित शर्मा याला स्टॉईनीसच्या गोलंदाजीवर सापळा रचून बाद केले...रोहित याला त्याच्या आवडत्या पूल च्या फटक्यावर फसविले... लक्षात घ्या स्टॉईनीस याने यापूर्वी स्पर्धेत फार कमी गोलंदाजी केली आहे.. रोहित याला बात केल्यावर त्याने कालच्या सामन्यात एकही षटक टाकले नाही...यावरून श्रेयस याचा गृहपाठ पक्का होता..आक्रमक सुरुवात करून देणारा रोहित याच्या कल्पनेतील संघातील जितेंद्र भाटवडेकर म्हणजेच ब्रेस्टो स्लो  बाउन्सर वर विजयकुमारच्या गोलंदाजीवर बाद झाला... तिलक आणि सूर्यकुमार यांनी ४२ चेंडूत ७२ धावांची भागीदारी करताना काही न येणार काही नयनरम्य फटके मारले...ज्या षटकात रोहित बाद झाला त्याच षटकात त्याने स्टोइनिस याला षटकार खेचून आपले इरादे स्पष्ट केले... चहल आल्या आल्या सूर्यकुमार यादव याने त्याचे स्वागत षटकाराने केले...पण सूर्यकुमार यादव आणि तिलक ३ चेंडूत बाद झाल्यावर मुंबई संघ ३०/४० धावा अधिक करण्यात अपयशी ठरला..शेवटी नमन याने अर्षदीप र्दीप याने दिलेली खिरापती वर फाइन लेग परिसरात चौकार वसूल करून मुंबई संघाला २०३ धावांचा टप्पा गाठून दिला.

गेल्या १८ वर्षात मुंबई संघाने २०० धावांचा बचाव  यशस्वीरित्या केला होता...त्यामुळे काल फक्त ऐतिहासिक कामगिरी मुंबई संघाला अंतिम फेरीपासून रोखू शकत होती....पण इतिहास नेहमी पहिल्यांदा घडतो..तो काल घडणार याची नांदी बुमरहा याच्या पहिल्याच षटकात वीस धावा ठोकून काढून इंग्लिस  याने केली..प्रियांश याच्यासोबत १८ चेंडूत ४२ धावांची भागीदारी करून सामन्याचा टोन सेट केला...पण नंतर ऐकायला मिळाली ती श्रेयस नावाच्या सिंहाची डरकाळी...आल्या आल्या आखूड टप्प्याच्या चेंडूवर नियंत्रित पूल खेळून केल्या...आणि तेराव्या षटकात आलेल्या टोपले याच्या गोलंदाजीवर सलग तीन षटकार खेचून आपणच अंतिम फेरीत खेळणार हे छाती ठोकपणे सांगितले... त्याला नेहल वडेरा याने उत्तम साथ दिली...डीप फाइन लेगवर त्याचा बोल्ट याने झेल सोडला आणि त्याने २९ चेंडूत ४८ धावा ठोकून काढल्या ..त्याच्या आणि श्रेयस यांच्यामधील भागीदारी मुळे सामना पंजाब संघाचा झाला .८७ धावांच्या खेळीत श्रेयस याने ८ षटकार मारून १९ व्या षटकात विजय मिळवून पंजाब संघाने दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. आक्रमक हातवारे करून क्षेत्ररक्षण लावणे म्हणजे नेतृत्व नाही... हे हार्दिक याला समजत असेल असे मानू या...कालच्या सामन्यात कर्णधार म्हणून त्याच्या मर्यादा स्पष्ट झाल्या...या वेळी विजेता हा ब्रँड न्यू असेल हे आता सिद्ध झालं.. बंगळूर आणि पंजाब यांच्यामधील अंतिम सामन्यात कोणीही विजय मिळवला तरी चहा ते नाराज होणार नाहीत... उत्सुकता फक्त आहे ती 18 वर्षानंतर प्रीतीसंगम होईल की महानायक आपल्या केबिन मधील कमतरता भरून काढतो.

संबंधित बातमी:

Shreyas Iyer IPL 2025: 2024 मध्ये दुखावला, पुन्हा लिलावात उतरला; धोनीसारखा कॅप्टन कूल, विराटसारखा चेस मास्टर, अनोखं रसायन श्रेयस अय्यर!

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Team India squad For T20 World Cup: शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
China Vs India : चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
Gold : शेअर बाजारापेक्षा सोन्यामुळं गुंतवणूकदार अधिक मालामाल, वर्षभरात 73 टक्के रिटर्न, 46 वर्षांचा विक्रम मोडला
शेअर बाजारापेक्षा सोन्यामुळं गुंतवणूकदार अधिक मालामाल, वर्षभरात 73 टक्के रिटर्न, 46 वर्षांचा विक्रम मोडला
Team India squad For T20 World Cup: शुभमन गिलला का संधी दिली नाही? निवड समितीच्या अजित आगरकरांनी फक्त एकाच वाक्यात हिशेब केला! तिकडून सूर्याही पाच शब्दातच सगळं बोलला...
शुभमन गिलला का संधी दिली नाही? निवड समितीच्या अजित आगरकरांनी फक्त एकाच वाक्यात हिशेब केला! तिकडून सूर्याही पाच शब्दातच सगळं बोलला...
ABP Premium

व्हिडीओ

T-20 WorldCup Team Announce : टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा, शुभमन गिलला वगळलं
Kopargaon NCP Vs BJP : कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ भाजप- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले
Sanjog Waghere Join BJP : संजोग वाघेरे भाजपात प्रवेश करणार, मुंबईकडे रवाना
Mumbai BJP And Shivsena Seat Sharing : मुंबईत जागावाटपात भाजप-शिवसेनेत जोरदार रस्सीखेच
Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India squad For T20 World Cup: शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
China Vs India : चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
Gold : शेअर बाजारापेक्षा सोन्यामुळं गुंतवणूकदार अधिक मालामाल, वर्षभरात 73 टक्के रिटर्न, 46 वर्षांचा विक्रम मोडला
शेअर बाजारापेक्षा सोन्यामुळं गुंतवणूकदार अधिक मालामाल, वर्षभरात 73 टक्के रिटर्न, 46 वर्षांचा विक्रम मोडला
Team India squad For T20 World Cup: शुभमन गिलला का संधी दिली नाही? निवड समितीच्या अजित आगरकरांनी फक्त एकाच वाक्यात हिशेब केला! तिकडून सूर्याही पाच शब्दातच सगळं बोलला...
शुभमन गिलला का संधी दिली नाही? निवड समितीच्या अजित आगरकरांनी फक्त एकाच वाक्यात हिशेब केला! तिकडून सूर्याही पाच शब्दातच सगळं बोलला...
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा धडाका सुरुच, नामांकित खासगी बँकेला दणका, तब्बल 62 लाखांचा दंड, कारण समोर
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा धडाका सुरुच,नामांकित खासगी बँकेला दणका, तब्बल 62 लाखांचा दंड, कारण समोर
Team India Squad Against New Zealand: रिंकू सिंग, इशान किशान IN, शुभमन गिल, जितेश शर्मा OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
रिंकू, इशान IN, शुभमन, जितेश OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
Kopargaon Nagarparishad Election 2025: कोपरगावमध्ये भाजप-राष्ट्रवादीत जोरदार राडा, पोलिसांसमोरच कार्यकर्ते भिडले, नेमकं काय घडलं?
कोपरगावमध्ये भाजप-राष्ट्रवादीत जोरदार राडा, पोलिसांसमोरच कार्यकर्ते भिडले, नेमकं काय घडलं?
T20 World Cup: टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, इशान किशनची एन्ट्री, शुभमन गिलला वगळलं, चकीत करणारी 15 जणांची टीम
टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, इशान किशनची एन्ट्री, शुभमन गिलला वगळलं, चकीत करणारी 15 जणांची टीम
Embed widget