(Source: Poll of Polls)
सांगलीत वंचित बहुजन आघाडीच्या सभेत टिपू सुलतानच्या फोटोला घातला हार, आंबेडकरांचं पोलिसांना खुलं आव्हान
प्रकाश आंबेडकरांनी टिपू सुलतानच्या (Tipu Sultan) फोटोला हार घालून सभेला सुरुवात केली. टिपू सुलतानच्या फोटोला हार घातला तर बघा असे काही जणांचे आदेश होते, असे आंबेडकर म्हणाले.
सांगली : सांगलीत वंचित बहुजन आघाडीची (Vanchit Bahujan Aghadi) सत्ता संपादन निर्धार सभा पार पडली. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी टिपू सुलतानच्या (Tipu Sultan) फोटोला हार घालून सभेला सुरुवात केली. टिपू सुलतानच्या फोटोला हार घातला तर बघा असे काही जणांचे आदेश होते. पण पोलिस खात्याला आवाहन आहे पाच वर्षानंतर निवडणुका येतात आणि सरकार बदलते.आतापर्यंत सत्तेत सहभागी होण्याचा आम्ही कधीच प्रयत्न केला नाही. पण आता सत्तेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न करणार असं आव्हान प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) दिले आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
एकीकडे विविध समाजांच्या आरक्षण मागणीवरुन राज्यात जाती जातीत तेढ निर्माण होण्याची परिस्थिती असताना आंबेडकरांच्या कृतीमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. कारण आज टिपू सुलतानच्या फोटोला हार घातला तर बघा असे काही जणांचे आदेश होते असे खुद्द प्रकाश आंबेडकर यांनीच भाषणात सांगितले. पण पोलिस खात्याला आव्हान आहे ; पाच वर्षातनंतर निवडणूका येतात आणि सरकार बदलते. आतापर्यंत सत्तेत सहभागी होण्यचा आम्ही कधीच प्रयत्न केला नाही, मात्र आता सत्तेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न करणार उद्याची सत्ता आपल्याला बदलायची आहे असे आंबेडकर यांनी म्हणत त्यांनी विरोध करणाऱ्यांना आव्हान दिले आहे. सांगलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणावर ही सभा पार पडली.
एकीकडे विविध समाजांच्या आरक्षण मागणीवरुन राज्यात जाती जातीत तेढ निर्माण होण्याची परिस्थिती असताना, दुसरीकडे काही अदृश्य ताकदी धर्माधर्मातील सौहार्द बिघडवण्याचा सुनियोजित प्रयत्न करतायेत का असा ही प्रश्न निर्माण होतोय. हा प्रश्न पडण्याचं एक कारण आहे.काही महिन्यांपूर्वी क्रुरकर्मा औरंगजेबाच्या स्टेटसवरुन पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगरमधील वातावरण बिघडलं. मग कोल्हापुरात परत टिपू सुल्तानच्या आक्षेपार्ह स्टेटसवरुन तणाव वाढला.
पुण्यातील भाजप कार्यकर्ते आक्रमक
ज्याने असंख्य हिंदूंची कत्तल केली ज्याने अनेक लोकांचे बळजबरी धर्मांतर करून त्यांचा अमानुष छळ केला अशा धर्मांध विकृती असलेल्या टिपू सुलतान ची जयंती महाराष्ट्रात साजरी केली जात असेल तर आम्ही गप्प बसणार नाही त्याचे उदात्तीकरण होऊ देणार नाही पोलिसांनी वेळीच असल्या प्रवृत्तीला आळा घालावा अन्यथा या प्रवृत्तीचा बिमोड करण्यास आम्ही समर्थ आहोत असा इशारा भारतीय जनता पार्टी चे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिला. पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन तातडीने अशी धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना शासन करण्याची मागणी केली.
हे ही वाचा :