(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sangli News : सांगलीत 20 जानेवारीला ख्रिस्ती समाजाचा शांती महा मूक मोर्चा; समाजावरील आरोपाच्या निषेधार्थ मोर्चाचे आयोजन
ख्रिस्ती समाजावर होणारे धर्मांतराचे आरोप, हल्ले, खोट्या केसेस दाखल करणे या विरोधात आणि या सगळ्या गोष्टी थांबवाव्यात यासाठी 20 जानेवारी रोजी सांगलीत ख्रिस्ती समाजाचा शांती महा मूक मोर्चा निघणार आहे.
Sangli News : ख्रिस्ती समाजावर होणारे धर्मांतराचे आरोप, हल्ले, खोट्या केसेस दाखल करणे या विरोधात आणि या सगळ्या गोष्टी थांबवाव्यात यासाठी 20 जानेवारी रोजी सांगलीत ख्रिस्ती समाजाचा शांती महा मूक मोर्चा निघणार आहे. 20 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता विश्रामबाग चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. आरोप करणाऱ्यांवर कारवाई करावी, आटपाडी प्रकरणात दाखल केलेल्या गुन्ह्यांची शहानिशा करून गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी निघणाऱ्या मोर्चामध्ये समस्त ख्रिस्ती बांधवांनी सहभागी व्हावं, असे आवाहन संविधान बचाव ख्रिस्ती हक्क समितीकडून पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे.
या मोर्चात ख्रिस्ती समाजावर होणारे आरोप थांबवावेत, ख्रिस्ती समाजाची बदनामी करणाऱ्यावर कारवाई करावी, या मोर्चामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, मुंबई येथून ख्रिस्ती समाजाचे 15 ते 20 हजार ख्रिस्ती बांधव उपस्थित राहणार आहेत. या मोर्चामध्ये ख्रिस्ती समाजाच्या महिला, मुले मुली, धर्मगुरू सहभागी होणार आहेत. या मोर्चासाठी आरपीआच्या आठवले गट, बहुजन क्रांती मोर्चा, मातंग समाज, समस्त मुस्लिम समाज यांच्यासह विविध चळवळीतील संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
या मोर्चासाठी समस्त ख्रिस्ती समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही असे आवाहन संविधान बचाव ख्रिस्ती हक्क समितीकडून पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे.
बेकायदेशीर धर्मांतर आणि चर्च बांधकाम, संजय गेळेच्या संपत्तीची चौकशी करा
दुसरीकडे, आटपाडीत कथित ख्रिस्ती धर्म प्रसारक संजय गेळे आणि त्याची पत्नी अश्विनी यांनी भोंदूपणाचा कळस केल्यानंतर संतापाची लाट उसळली होती. वरद हाॅस्पिटलमध्ये धर्मांतराच्या उद्देशाने घुसून त्यांनी केलेल्या भोंदूपणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर या प्रकाराला वाचा फुटली. त्यानंतर संजयला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. धर्मांतर विरोधात आटपाडीत हिंदूत्ववादी संघटनांकडून मोर्चेही काढण्यात आले आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडून संजय गेळेच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी केली आहे.
संजय गोळे आणि त्याची पत्नी अश्विनी गोळे यांनी (दोघेही रा. आटपाडी, जि. सांगली) अंगी दिव्यशक्त असल्याचे भासवून तसेच जादूटोणा करण्याच्या उद्देशाने वरद हाॅस्पिटलमधील अतिदतक्षता विभागात रुग्णाचे नातेवाईक असल्याचे सांगून घुसले होते. यानंतर त्यांनी रुग्णाच्या डोक्यावर हात फिरवत टॅबमधील मजकूर वाचून दाखवला होता. तसेच बोटाने शस्त्रक्रिया करत असल्याचे भासवून भोंदूगिरी करण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत संपतराव नामदेव धनवडे यांनी फिर्याद दिली होती. धनवडे यांनी आटपाडीत बेकायदेशीर अंधश्रद्धा पसरवून धर्म परिवर्तन करण्याचे काम जाणून-बुजून सुरू असल्याचे म्हटले होते.
इतर महत्वाच्या बातम्या