(Source: ECI/ABP News/ABP Majha)
RMNTU Exams : गृहकेंद्रावरील परीक्षेत गैरप्रकार, सहा विद्यार्थ्यांकडे आढळले मोबाईल
होम सेंटरवर सुरु असलेल्या विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये गैरप्रकार थांबत नसून दररोज भरारी पथकाच्यावतीने कारवाई करण्यात येत आहे. शुक्रवारी केलेल्या कारवाईत 6 विद्यार्थ्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहे.
नागपूरः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा सुरु आहे. यात विद्यार्थ्यांना स्वतःच्या महाविद्यालयातच पेपर देण्याची मुभा आहे. मात्र या परीक्षांमध्ये दररोज गैरप्रकार गैरप्रकार घडत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, परीक्षा विभागाच्या सतर्कतेमुळे गैरप्रकार उघडकीस येत आहेत. भरारी पथकाद्वारे महाविद्यालयाच्या तपासणीत प्रेरणा महाविद्यालयात 6 विद्यार्थ्यांकडे मोबाईल असल्याचे आढळले.
विद्यापीठाद्वारे परीक्षा निर्धोक पार पाडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यातून गृहकेंद्रावर परीक्षेत होणारी कॉपी रोखण्यासाठी विद्यापाठाचा परीक्षा विभाग दिवसरात्र एक करुन काम करत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने परीक्षेतील अनियमिततेची प्रकरणे समोर आल्यानंतर आता विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः परीक्षा केंद्रांवर लक्ष ठेवणे सुरु केले आहे. शुक्रवारी विद्यापीठाचे नियंत्रक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी कुही-मांढळ व इतर ग्रामीण भागातील 7 महाविद्यालयांची अचानक पाहणी केली. परीक्षा नियंत्रकांच्या पथकाला कोणतीही अनियमितता आढळली नाही. मात्र, नागपूर आणि इतर भागात कार्यरत असलेल्या भरारी पथकांनी प्रेरणा महाविद्यालयातील परीक्षार्थ्यांकडून मोबाईल जप्त केले आहेत. विशेष म्हणजे भरारी पथकाने 15च्यावर मोबाईल जप्त केले. मिळालेल्या माहितीनुसार, विद्यापीठाने आतापर्यंत एकूण 80 पेक्षा जास्त मोबाईल जप्त केले आहेत. आतापर्यंत 20 हून अधिक महाविद्यालयांमध्ये भरारी पथकांनी ही करावाई केली आहे.
व्हॉट्सअॅपवर प्रश्नपत्रिका फुटली
विशेष म्हणजे नागपूर विद्यापीठ विद्यार्थ्यांची परीक्षा त्यांच्या गृहकेंद्रांवर ऑफलाइन बहुपर्यायी प्रश्नपत्रिका पद्धतीने घेण्यात येत आहे. मात्र, यामुळे परीक्षेत मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. परीक्षेपूर्वीच व्हॉट्सअॅपवर प्रश्नपत्रिका फुटल्या आहेत. याप्रकरणी विद्यापीठाने पाचपावली येतील सिंधू महाविद्यालय, सदर येथील अटलांटा महाविद्यालयावर कारवाई केली आहे. विद्यापीठालाही काही पेपर रद्द करावे लागले आहेत. विद्यार्थ्यांचे स्मार्टफोन हे या परीक्षेत कॉपीचे प्रमुख साधन ठरत आहेत. अशा स्थितीत विद्यापीठाने थेट मोबाईल जप्तीची प्रक्रिया सुरू केली आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
Nagpur Covid Update : प्रवास करुन आलेलेच बाधित, अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 355वर
Nagpur : जिल्ह्यात उद्यापासून एक जुलैपर्यंत कृषी संजिवनी मोहिम
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI