एक्स्प्लोर

Dhananjay Munde : देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली

Dhananjay Munde On Devendra Fadnavis : देवाभाऊंनी आतापर्यंत आपल्याला जे काही दिलं त्याबद्दल धन्यवाद, पण आमच्या मनातील इच्छा त्यांना माहीत आहे असं वक्तव्य माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं. 

बीड : देवाभाऊ म्हणजे कामधेनू आहेत, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत आहेत अशा शब्दात धनंजय मुंडेंनी बीडमधल्या कार्यक्रमात आपल्या भावना मांडल्या. त्यांना आपल्या मनातील इच्छा माहीत असल्याने जास्त बोलू नको असा निरोप मुख्यमंत्र्यांनी दिल्याची पुष्टीही धनंजय मुंडेंनी जोडली. विशेष म्हणजे धनंजय मुंडेंनी हे वक्तव्य केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या डोक्यात टपली मारली. त्यामुळे मुंडेंच्या या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे.

परळीतील महापशुधन एक्सपोच्या निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी परळीत आले होते. याच व्यासपीठावर पंकजा मुंडेही उपस्थित होत्या. त्यावेळी भाषण करत असताना धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणीस यांचा उल्लेख कामधेनू असा केला.

देवाभाऊंना मनातील इच्छा माहीत

आपल्या भाषणाच्या शेवटी मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची स्तुती केली. ते म्हणाले की, मी त्यांना आधीच कामधेनू म्हटलं आहे, म्हणजे आमच्या मनातल्या इच्छा तुम्हाला माहीत आहेत. म्हणून जास्त बोलू नको असा त्यांचा निरोप आला. त्यांनी आतापर्यंत आपल्याला जे दिलं त्याबद्दल त्यांचे आभार. आमच्या मनातल्या इच्छा तुम्हाला माहीत आहेत.

मुख्यमंत्र्यांसमोर केलेल्या धनंजय मुंडेंच्या या वक्तव्यानंतर आता तर्क-वितर्क लावले जात आहेत. इतकेच नाही तर धनंजय मुंडेंचे भाषण संपल्यावर बसत असताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या डोक्यात टपली मारल्याचं दिसून आले.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडला अटक करण्यात आली आहे. त्यावेळी धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर धनंजय मुंडे हे आता त्यांच्या पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळेच धनंजय मुंडे यांनी केलेलं हे वक्तव्य अतिशय बोलकं ठरतंय. 

राधा म्हशीची पाहणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडमधील परळीतील महापशुधन एक्स्पोला भेट दिली. त्यावेळी त्यांनी 83.8 सेंटीमीटर या सर्वात लहान उंचीच्या राधा म्हशीची पाहाणी केली. राधा म्हशीची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Rathod : वसंतराव नाईकांच्या वाटेवर चालणं माझं ध्येय, समाजाचं भलं होईल; मंत्री संजय राठोडांचं वक्तव्य
वसंतराव नाईकांच्या वाटेवर चालणं माझं ध्येय, समाजाचं भलं होईल; मंत्री संजय राठोडांचं वक्तव्य
धक्कादायक! खते आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर काळाचा घाला, भीषण अपघातात जागीच मृत्यू, बीडच्या केजमध्ये घडली घटना
धक्कादायक! खते आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर काळाचा घाला, भीषण अपघातात जागीच मृत्यू, बीडच्या केजमध्ये घडली घटना
सुरतहून छत्रपती संभाजीनगरकडे निघालेल्या ट्रॅव्हल्सला पुराचा वेढा, सर्व प्रवाशी टपावर, परळीतील दोन जण अडकले
सुरतहून छत्रपती संभाजीनगरकडे निघालेल्या ट्रॅव्हल्सला पुराचा वेढा, सर्व प्रवाशी टपावर, परळीतील दोन जण अडकले
बीडमध्ये विद्यार्थ्यास NEET मध्ये 95 गुण; हायकोर्टाचे एनटीएला नोटीस, उत्तरपत्रिका कोर्टात जमा करण्याचे आदेश
बीडमध्ये विद्यार्थ्यास NEET मध्ये 95 गुण; हायकोर्टाचे एनटीएला नोटीस, उत्तरपत्रिका कोर्टात जमा करण्याचे आदेश

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
Embed widget