Tipu Sultan Controversy : टीपू सुलतानवरुन वक्तव्य, सपकाळ वादात, फडणवीस आक्रमक
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांकडून टिपू सुलतानची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी, नव्या वादाला तोंड, सपकाळांचं वक्तव्य निंदनीय, मुख्यमंत्र्यांकडून कठोर शब्दात निषेध
टिपू सुलतानबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय...सपकाळांनी टिपू सुलतानची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केलीय..ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी शौर्य आणि स्वराज्याचा विचार दिला त्याचप्रमाणे टिपू सुलतानानं काम केल्याची मुक्ताफळं सपकाळांनी उधळलीत..मालेगाव महापालिकेचे उपमहापौर शाने हिंद निहाल अहमद यांच्या दालनात भिंतीवर टिपू सुलतानचं तैलचित्र लावल्यानं मोठा गदारोळ झाला...टिपूचं तैलचित्र हटवण्याच्या मागणीसाठी शिवसेना नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन केलं...दरम्यान चहुबाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर दालनातील तैलचित्र हटवण्यात आलं...मात्र सपकाळांच्या वक्तव्यामुळे पुन्हा वादाला फोडणी मिळालीय...
राज्यात टिपू सुलतानवरून नवा वाद
'टिपू सुलतानला छत्रपती शिवरायांच्या समकक्ष बघितलं पाहिजे'
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मुक्ताफळं
काँग्रेस आणि भाजपकडून सपकाळांवर जोरदार टीका



















