निलेश राणे यांच्या ताफ्यावर चिपळूणमध्ये दगडफेक, भास्कर जाधवांच्या कार्यालयाबाहेर राडा
निलेश राणे (Nilesh Rane Guhagar) यांची आज गुहागरमध्ये जाहीर सभा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर गुहागरमध्ये दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले. या परिसरात प्रचंड तणाव आहे, त्यामुळे पोलिसांनी अश्रूधुराच्या कांड्या फोडून जमावाला हटवण्याचा प्रयत्न केला.
चिपळूण, रत्नागिरी : भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane Guhagar) यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचं वृत्त आहे. शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या चिपळूणमधील कार्यालयासमोर निलेश राणे यांचा ताफा आला. त्यावेळी ही दगडफेक झाल्याचं सांगण्यात येत आहे. निलेश राणे यांची आज गुहागरमध्ये (Nilesh Rane Guhagar Sabha) जाहीर सभा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर चिपळूणमद्ये दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले. या परिसरात प्रचंड तणाव आहे, त्यामुळे पोलिसांनी अश्रूधुराच्या कांड्या फोडून जमावाला हटवण्याचा प्रयत्न केला.
निलेश राणे यांची भास्कर जाधवांच्या (Bhaskar Jadhav) गुहागर (Guhagar) मतदारसंघात तळी (Tali) येथे सायंकाळी 5 वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली. भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावेळी नारायण राणे पिता पुत्रांवर तुफान टीका केली होती. त्याला उत्तर म्हणून निलेश राणे यांनी गुहागरमध्ये आज सभेचं आयोजन केलं आहे.
भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया
गुहागरमध्ये माझ्या विधानसभा मतदारसंघात सभा घेण्यासाठी येणार अशी जाहिरातबाजी केली होती. खूप मोठ्या प्रमाणात टिझर व्हायरल करुन लोकांना उचकावण्याचा प्रयत्न केला होता. माझ्या कार्यालयासमोर बॅनर लावले होती. हिशेब चुकते करणार, गुन्ह्याला माफी नाही असे आव्हानात्मक बॅनर लावले होते. झेंडे लावले होते. पण चिपळूणची संस्कृती आहे, कोणाच्या झेंड्याला, बॅनरला हात लावायचा नाही. आम्ही कुणीही त्यांच्या झेंड्याला हात लावला नाही. परंत सुभा गुहागरला होती, निलेश राणे मुंबईतून आले. वास्तविक पाहता त्यांनी डायरेक्ट गुहागरला जाऊन सभा घेणं आवश्यक होतं, पण ते जाणीवपूर्वक चिपळूणमध्ये आले, असं भास्कर जाधव म्हणाले.
कोकणात वाद शिगेला
कोकणात नारायण राणे आणि भास्कर जाधव यांचा वाद शिगेला पोहचला आहे.त्यातच माजी खासदार निलेश राणे यांची गुहागर येथे सभा होणार आहे. त्यापूर्वीच आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना धमकीचे फोन आणि मेसेज आल्याने त्यांच्या कार्यालय बाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रत्नागिरी पोलिस अलर्ट मोडवर आहे.
वादाची पार्श्वभूमी
काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कणकवली सभा झाली होती. या सभेत भास्कर जाधवांनी राणेंवर जहरी टीका केली होती. भास्कर जाधव म्हणाले होते की, नेपाळी वॉचमनचा मुलगा दम देतो,. शिवाय भास्कर जाधवांनी नारायण राणेंचा नाव न घेता कोंबडी चोर असा उल्लेख केला होता. ज्यांनी उद्धव ठाकरेंना धोका दिला त्यांना धडा शिकवा, असेही भास्कर जाधव म्हणाले होते.
नाऱ्याचे दोन चंगू मंगू, तो एक नेपाळी वॉचमनच्या पोरासारखा दिसतो, सकाळ संध्याकाळी टीव्ही चालू केला की हे घाणेरडं तोंडाचं समोर येतं. दुसरीकडे नेत्याच्या डोक्यावर पीक आलंय (नारायण राणेंचं विग). निलेश राणे म्हणजे चरशी असं भास्कर जाधव म्हणाले होते.
संबंधित बातम्या
भास्कर जाधवला चोप देणार, मी असं कुणाला सोडत नाही : नारायण राणे
Nilesh Rane : चुकीला माफी नाही! हिशेब चुकता करायला मी येतोय; निलेश राणेंच्या सभेची जोरदार पोस्टरबाजी